Join us  

सकाळी कोमट पाण्यात मिसळून २ गोष्टी प्या, वजन घटेल भरभर- पोटही होईल सपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 5:25 PM

Honey Lemon Water: An Effective Remedy for Weight loss : व्यायाम करायला वेळ नसेल तर, न चुकता सकाळी '१' वेट लॉस ड्रिंक प्या-दिसेल फरक

वजन वाढीच्या (Weight Loss) समस्येने बरेच जण त्रस्त आहे. वजन वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. काही वेळेला वजन बिघडलेली जीवनशैली, खाण्याची अयोग्य पद्धत, व्यायामाचा अभाव, याकारणामुळे वजन वाढत जाते. वजन कमी करण्याचे बाजारात अनेक फंडे उपलब्ध आहे. जिम, योग, डाएट यासह काही औषधांचा वापर करून लोक वेट लॉस करतात (Fitness). पण या सगळ्या गोष्टी करूनही वेट लॉस होईलच असे नाही. जर आपल्याला नैसर्गिक पद्धतीने वेट लॉस करायचं असेल तर, उकळत्या पाण्यात २ गोष्टी घालून प्या. या नैसर्गिक उपायांमुळे वेट लॉससाठी नक्कीच मदत होईल.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, 'उकळत्या पाण्यात आपण लिंबू आणि मध मिसळू शकता. लिंबू आपल्या शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करते. लिंबासोबत मधामध्ये असलेले अमिनो ॲसिड, फ्लेव्होनॉइड्स आणि फ्रक्टोज सारखे घटक असतात. यामुळे प्रतिकारशक्ती देखील वाढवतात. ज्यामुळे इतर रोगांचा धोका कमी होतो, आणि आरोग्यही सुदृढ राहील'(Honey Lemon Water: An Effective Remedy for Weight loss).

रोगप्रतिकारशक्ती वाढेल

मध आणि लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म प्रतिकारकशक्ती वाढवण्याचे काम करतात. ज्यामुळे आजारांशी सहजपणे लढण्यात मदत होते. हे बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीजन्य संसर्गापासून आराम देतात.

विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर..

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत

जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, सकाळी रिकाम्या पोटी उकळत्या पाण्यात मध आणि लिंबू घालून प्या. कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून प्यायल्याने वाढलेले वजन लवकर कमी होते. मध चयापचय वाढवते. ज्यामुळे कॅलरीज जलद बर्न होतात.

उर्जा मिळेल

कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने शरीरात उर्जा वाढते. मधामध्ये कार्बोहायड्रेट्स, फ्रक्टोज, ग्लुकोज आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे शरीरातील उर्जेची पातळी वाढवण्यास मदत करते. यामुळे दिवसभरातील थकवा आणि आळस कमी होतो.

व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते

लिंबू हे व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत आहे. हे पोषक घटक शरीराला संक्रमणाशी लढण्यास मदत करतात. शिवाय त्वचेच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

थुलथुलीत पोट वाढतच चाललं आहे? जिऱ्याचे पाणी 'या' पद्धतीने प्या; पोट होईल सपाट-दिसाल सुडौल

पचन सुधारते

कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. लिंबाचा आंबटपणा पाचक एंझाइमांना उत्तेजित करते. तर, मध प्री-बायोटिक म्हणून काम करते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास, अपचन, ॲसिडिटी आणि गॅसेसचा त्रास दूर होण्यास मदत होते. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स