भारतीय खाद्यसंस्कृती ही अतिशय आरोग्यदायी मानली जाते. कारण आपल्या जेवणाच्या पारंपरिक ताटामध्ये जे काही पदार्थ वाढले जातात ते केवळ चव आणि रंग, रूप यातच वेगवेगळे नसतात. तर त्यांच्यातून कित्येक वेगवेगळे पौष्टिक घटक मिळत असतात. पण हल्ली आपण आपल्या जेवणाच्या ताटातच बदल करून टाकला आहे. आपले पारंपरिक पदार्थ त्यातून बाहेर जाऊन कित्येक नवनविन पदार्थ त्यात येऊन बसले आहेत. शिवाय आता बैठ्या कामाचं स्वरुप वाढलं आहे. व्यायामाला वेळच नसतो. त्यामुळे मग वाढलेलं वजन, कोलेस्टेरॉल, मधुमेह, ट्रायग्लिसराईड असे त्रास घरोघरी दिसत आहेत (Home Hacks For Reducing Weight). हे त्रास जर कमी करायचे असतील तर एक सोपा घरगुती उपाय तुम्ही करून शकता (how to lose belly fat?).. तो नेमका कसा करायचा ते पाहूया..(home remedies to control cholesterol and blood sugar level)
वजन कमी करण्यासाठी उपाय
वजन कमी करण्यासह इतरही अनेक आजार कमी करण्यासाठी नेमका काय उपाय करावा याविषयी डॉ. वरुण शर्मा यांनी दिलेली माहिती askhealthguru and dr_varun_ayurveda या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
परीक्षा, इंटरव्ह्यूचं टेन्शन? घ्या उपाय- ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस जाईल- एन्झायटी कमी होईल
यामध्ये डॉक्टर असं सांगत आहेत की रोज रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा मेथी दाणे, १ चमचा बडिशेप, १ चमचा ओवा आणि एक इंच दालिचिनीचा तुकडा घाला. हे पाणी झाकून ठेवा.
दुसऱ्यादिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि उपाशीपोटी प्या. हा उपाय जर रोज नियमितपणे केला तर पोटावरची चरबी तर कमी होईलच पण वजन कमी होण्यासही मदत होईल. कारण हा उपाय केल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. चयापचय क्रिया चांगली होते. त्यामुळे शरीरावर चरबी साचून राहण्याचे प्रमाणही कमी होते.
हा उपाय केल्याने मिळणारे इतर फायदे
१. डॉ. शर्मा असं सांगतात की हा उपाय केल्यामुळे मधुमेह कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
२. याशिवाय कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते.
लोणचं, साखरआंबा नेहमीचाच, वर्षभर टिकणारी कैरीची चटपटीत चटणी करून पाहा- रेसिपी सोपी
३. हल्ली अनेक जणींना पीसीओडी, पीसीओएस हा त्रास वाढ आहे. तो कमी करण्यासाठीही हे पाणी उपयुक्त ठरतं.
४. फ्रायब्रॉईडचा त्रासही अनेक जणींना असतो. तो कमी करण्यासाठीही हे पाणी पिणे फायद्याचे ठरते.