शितल मोगल
Dietitian and workout planner
8605243534
भारतीय संस्कृतीत सण म्हणजे केवळ आनंदी उत्सव नाही तर जीवनशैलीला दिशा देणारा एक सखोल विचार असतो गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो तो संस्कार नवचैतन्य आणि सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. प्रत्येक वर्षी येणारा हा सण आपल्याला नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा देतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी घरा बाहेर उभारली जाणारी गुढी ही विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक आहे पौराणिक मान्यतेनुसार यांनी या दिवशी सृष्टीची निर्मिती केली त्यामुळे हा दिवस सृष्टीचा आरंभाचा मानला जातो तसेच रावणावर विजय मिळवून आयोध्या त परतल्याचा आनंद या दिवशी साजरा करण्यात आला इतिहासाच्या पानात पराक्रमाची आणि विजयाची आठवण यातून जपली जाते .
गुढीपाडव्याच्या सणात एक विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक *श्रीखंड पुरी *अनेकांना हा केवळ चवीचा आनंद वाटत असला तरी त्यामागे आरोग्यशास्त्राचा सुंदर विचार दडलेला आहे श्रीखंड हे दह्यापासून तयार केले असल्याने ते शरीराला थंडावा देते उन्हाळ्याची सुरुवात होत असताना शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यासाठी हा पदार्थ अत्यंत उपयुक्त असतो यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते,
पुरी हा पदार्थ उर्जादाई असल्याने शरीराला त्वरित शक्ती मिळते. श्रीखंडाच्या थंड गुणधर्म सोबत पुरीची ऊर्जा मिळाल्याने शरीरात संतुलन राखले जाते गोड आणि तुपकट चवीचा हा संगम केवळ जिभेचा चव वाढवीत नाही तर शरीराला आवश्यक पोषण देतो.
याचबरोबर या दिवशी कडू गोड पदार्थ खाण्याची परंपरा आहे .कडुलिंबाच्या पानांचा समावेश आहारात केल्याने शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते .गोड ,कडू तिखट आणि आंबट अशा सर्व रसांचा समावेश हा आयुर्वेदाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे .
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेकदा पारंपारिक आहार आणि सणांचा खरा अर्थ विसरतो परंतु गुढीपाडवा आपल्याला आठवण करून देतो की सण साजरे करताना त्यामागील विज्ञान आणि आरोग्यदायी विचार समजून घेणे आवश्यक आहे श्रीखंड पुरीसारखे पदार्थ पारंपरिक पदार्थ केवळ परंपरेचा भाग नसून ते आपल्या आरोग्याचे रक्षण करणारे आहेत
गुढीपाडवा हा सण आपल्याला सांगतो नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक विचाराने संतुलित आहाराने आणि उत्तम आरोग्याच्या संकल्पनाने करावे .परंपरा जपत आधुनिक ते कडे वाटचाल करताना अशा सणांचे महत्त्व अधिकच वाढते.
चला तर मग, या गुढीपाडव्याला केवळ साजरा न करता त्यामागील संदेश समजून घेऊन आपल्या जीवनात रुजवू या..
