Join us

बिनसाखरेच्या चहा, कॉफीमुळे वजन कमी होतं? डॉक्टर सांगतात साखरेमुळे नाही 'या' पदार्थामुळे वाढतं वजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2025 14:36 IST

Can Giving Up Sugar Help Lose Weight?: वजन कमी करण्यासाठी अनेक जण चहा- कॉफीमध्ये साखर घालणं बंद करतात. पण त्यामुळे खरंच वजन कमी होतं का?(benefits of giving up sugar)

ठळक मुद्देचहा- कॉफीच्या माध्यमातून दिवसातून २ ते ३ टीस्पून साखर खात असाल तर ते ठीक आहे. त्याने उलट मेंदूला चालना मिळून अंगात तरतरी येते.

हल्ली वाढत्या वजनाची समस्या अनेकांना भेडसावते आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि कमी झालेल्या शारिरीक हालचाली यामुळे वजन वाढतं. वाढतं वजन कमी करण्यासाठी तुमचा आहार आणि रोजचा व्यायाम व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे. आता आहाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही लोक वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी बिनसाखरेचा चहा किंवा कॉफी घ्यायला सुरुवात करतात. तुमच्या दिवसभराच्या चहा- कॉफीतून जास्तीतजास्त २ ते ३ टीस्पून साखर तुमच्या पोटात जात असेल. तेवढी साखर कमी केल्याने खरंच तुमच्या वजनामध्ये, तब्येतीमध्ये काहीही फरक पडत नाही (Can Giving Up Sugar Help Lose Weight?). वजन कमी करायचं असेल (real cause of weight gain) तर त्यासाठी दुसरीच एक गोष्ट अतिशय कमी खाण्याची गरज आहे आणि ती नेमकी कोणती ते पाहूया...

 

बिनसाखरेचा चहा, कॉफी घेतल्याने वजन कमी होतं का?

चहा- कॉफीमध्ये साखर न घातल्याने खरच वजनावर काही परिणाम होतो का याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ तज्ज्ञांनी drmalharganla या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

पावसाळ्यात तुमच्याही डॉगीच्या अंगाचा कुबट वास येतो? दुर्गंधी कमी करण्यासाठी ५ सोपे उपााय

ते डाॅक्टर असून ते सांगतात की रोज मी असे कित्येक पेशंट बघतो जे चहामध्ये साखर घालणं बंद तर करतात पण चहासोबत बिस्किटे, खारी असे पदार्थ मात्र हमखास खातात. डिप फ्राय केलेले चिवडा, शेव, आलुभुजिया असे पदार्थ त्यांच्या आहारात नेहमीच असतात. एवढंच नाही तर पिझ्झा, बर्गर अशा पदार्थांसोबतच वडापाव, सामोसा, पुऱ्या असे तेलकट पदार्थही ते आवडीने खातात.

 

जर तुम्ही हे एवढे सगळे पदार्थ खात असाल तर तुमची चहा- कॉफीतली साखर कमी करून काहीच उपयोग नाही. जर खरोखरच आहारातल्या कॅलरी कमी करायच्या असतील, वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात आधी जेवणातलं तेलाचं प्रमाण कमी करा.

पपईचं फक्त १ पान खुलवेल तुमचं सौंदर्य! टॅनिंग जाऊन त्वचा उजळेल, चेहऱ्यावरचे डाग, ॲक्नेही जातील

डिप फ्राय केलेले पदार्थ खाणं टाळा. असं केलं तरच तुमचं वजन घटेल. डॉक्टर असंही सांगतात की चहा- कॉफीच्या माध्यमातून दिवसातून २ ते ३ टीस्पून साखर खात असाल तर ते ठीक आहे. त्याने उलट मेंदूला चालना मिळून अंगात तरतरी येते. पण त्यापेक्षा जास्त मात्र साखरेचे प्रमाण वाढायला नको, याकडेही लक्ष द्यावे. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यव्यायामअन्न