गोड चेहरा आणि मोहक हास्य अशी जेनेलिया डिसुझाची ओळखच आहे. कधीही, कुठेही तुम्ही तिला पाहिलंत किंवा तिचे व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओ बघितले तरी त्यातून एक गोष्ट अगदी ठळकपणे दिसून येते आणि ती म्हणजे तिच्यामध्ये भरभरून असणारी एनर्जी.. म्हणूनच तर ती नेहमीच एवढी कशी उत्साही, आनंदी आणि फिट असते, असा प्रश्न तिच्या चाहत्यांनाही नेहमीच पडतो. जेनेलियाच्या बाबतीत असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ती १४ ते १५ वर्षांपुर्वी आलेल्या चित्रपटांमध्ये जशी दिसायची, तशीच ती आजही दिसते (Genelia D'Souza's weight loss diet plan). स्वत:चं सौंदर्य, फिटनेस तिने कशा पद्धतीने एवढा सांभाळून ठेवला असावा (fitness and weight loss tips by Genelia D'Souza), असा प्रश्न पडला असेल तर तिने सांगितलेल्या या काही गोष्टी वाचायलाच हव्या..(how to maintain fitness like Genelia D'Souza?)
एका पॉडकास्टदरम्यान जेनेलियाची एक मुलाखत घेण्यात आली. यामध्ये डॉ. प्रिती यांनी तिला तिच्या फिटनेसविषयी काही प्रश्न विचारले. यामध्ये ती म्हणाली की २०१७ पासून जेनेलिया पुर्णपणे शाकाहारी झाली. त्यानंतर काही दिवसांतच तिने दूध आणि दुग्धजन्य पदार्थही सोडले. प्लांट बेस डाएट करण्यावर तिचा भर आहे.
आईच्या प्रेमाला तोड नाही! जावयाचे प्राण वाचविण्यासाठी सासुबाईंनी केलं असं काही की....
एवढंच नाही तर साधारण महिनाभर आधीच तिचा पुढच्या महिन्याचा डाएट प्लॅन तयार असतो आणि तो ठरवताना प्रोटीन आणि इतर पौष्टिक पदार्थ कसे जास्तीतजास्त मिळतील यावर भर दिला जातो. तिचा यावर विश्वास आहे की तुमचं डाएट हेल्दी असायलाच हवं. पण ते हेल्दी आहे म्हणजेच बेचव आहे, ते खाण्याचा कंटाळा येतो, अशा पद्धतीचं मात्र मुळीच नसावं. तुमचं डाएट तुम्हाला छान एन्जॉय करत घेता आलं पाहिजे, असं तिला वाटतं.
उदाहरणार्थ टोफूला पनीरसारखी चव नसते. पण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करून, योग्य मसाले वापरून ती पनीर एवढ्याच आवडीने चवदार टोफू करून खाते. तिच्यामते शाकाहारी पदार्थांमधून प्रोटीन्स मिळत नाहीत हा एक मोठा गैरसमज आहे.
हृदयाचं आरोग्य बिघडतंय हे सांगणारी ७ लक्षणं- हार्ट ॲटॅक येण्याआधी शरीरात होतात 'हे' बदल..
योग्य पदार्थांची निवड करून तुम्ही शरीरातली प्रोटीन्सची कमतरता नक्कीच भरून काढू शकता. शेवटी जेनेलियाने सगळ्यांनाच असा सल्ला दिला आहे की तुम्ही शाकाहारी, मांसाहारी किंवा वेगन डाएट करणारे असाल तरी जेवण करताना mindful eating ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.. ती देखील तेच करते..