lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > गारेगार फ्लेवर्ड पाण्याचा हा सुंगधी प्रयोग करुन पहा, तहानही भागेल आणि मूडही बदलेल !

गारेगार फ्लेवर्ड पाण्याचा हा सुंगधी प्रयोग करुन पहा, तहानही भागेल आणि मूडही बदलेल !

‘फ्लेवर’ पाण्याचा हा सुंगधी प्रयोग. छान गार शांत वाटेल, पित्तही कमी होईल आणि पाण्यालाही वेगळा फ्लेवर मिळेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 03:06 PM2021-05-07T15:06:30+5:302021-05-07T15:08:40+5:30

‘फ्लेवर’ पाण्याचा हा सुंगधी प्रयोग. छान गार शांत वाटेल, पित्तही कमी होईल आणि पाण्यालाही वेगळा फ्लेवर मिळेल.

flavoured water summer experiment, good for acidity & dehydration | गारेगार फ्लेवर्ड पाण्याचा हा सुंगधी प्रयोग करुन पहा, तहानही भागेल आणि मूडही बदलेल !

गारेगार फ्लेवर्ड पाण्याचा हा सुंगधी प्रयोग करुन पहा, तहानही भागेल आणि मूडही बदलेल !

निकिता बॅनर्जी

उन्हाळा आणि गारेगार पेय यांचं एक नातं आहेच. नुसतं पाणी पीत राहिलं तरी पोट डब्ब होतं, मग भूक लागत नाही. अनेकदा जीव पाणी पाणी करतो पण सतत किती पाणी पिणार असंही वाटतं. आणि आता कोरोनाकाळात तर जास्तीत जास्त बॉडी हायड्रेट ठेवा असंही डॉक्टर्स सांगतात. कोरोनातून बरे झाल्यावरही पाण्याचं प्रमाण पुरेसं आहे ना, ते पहा असं म्हणतात. पाण्यासोबत पातळ पदार्थ, सूप, सरबतं ( अर्थात फ्रीजमधली गार नको) प्या म्हणतात.
आणि उरली बाकीची वर्क फ्रॉम होमवाली गरीब जनता, त्यांना तर काम करुन करुन घाम फुटला अशी स्थिती आहे. त्यामुळे काही अवघड पदार्थ करा. शहाळी आणा,असं त्यांना सांगणंही अवघड कारण गर्दीत जाणे नको वाटते.
त्यात उन्हाळा हा नैसर्गिक डिटॉक्ससाठी महत्वाचा असतो. या काळात घाम खूप येतो.  तहान खूप लगते. पाणी डिटॉक्ससचं काम करतच असते. 
पाणी तर प्यावंच पण नारळ पाणी,  ताक, साखर न घालता लिंबू मीठ पाणी या काळात पिणंही लाभदायक.  शरीरातील उष्णता कमी करून शरीराचे तापमान समतोल राखण्यास ताक मदत करते.
उन्हाळ्यात प्रामुख्याने कलिंगड, टरबूज, संत्री, मोसंबी, आंबा, अंजीर ही फळे मोठ्या प्रमाणात मिळतात. फळांमध्ये पाण्याचा अंश असतोच. ती फळंही खावी. ही फळं रसदार त्यामुळे, त्यांचा रस न काढता नुसती खाणंच उत्तम.
मात्र पाण्याचा हा प्रयोग त्यासोबत करुन पहा.
छान गार शांत वाटेल, पित्तही कमी होईल आणि पाण्यालाही वेगळा फ्लेवर मिळेल.

कसं करायचं हे प्लेवर पाणी..

१. बाटलीभर पाणी घ्या. त्यात काकड़ीच्या चकत्या, लिबांच्या चक्त्या, आल्याचे छोटे तुकडे (आवडीप्रमाने) , पुदिन्याची दोन-तीन पानं घालायची. आणि दिवसभर ते पाणी प्यायचं.
२. पाण्यात मोगरा आणि वाळाही घालता येईल.
३. अजून तिसरा प्रकार म्हणजे लिंबू, दालचीनी, काकड़ी- डाळींब हे एकत्र किंवा वेगवेगळं घालूनही पिता येईल.
४.संत्री, मोसंबीची साल, किंवा अगदी लिंबाचं वाळवलेलं साल टाकूनही हे पाणी करता येतं.
५. आपला आवडता प्लेवर ठरला की पाणी प्यायचाही छान गारेगार आनंद अनुभवता येतो.


 

Web Title: flavoured water summer experiment, good for acidity & dehydration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न