Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कंबर आणि मागचा भाग काही केल्या कमी होत नाही? ४ उपाय-काही दिवसात दिसेल फरक...

कंबर आणि मागचा भाग काही केल्या कमी होत नाही? ४ उपाय-काही दिवसात दिसेल फरक...

Smart Technique To Reduce Hip Fat & Achieve Slim Look : 4 Ways to Lose Hip Fat : How to Get Rid of Hip Fat : Best Ways To Reduce Hips Fat & Tone Up : effective ways to lose lower back and hip fat : कंबरे खालचा भाग कमी करण्यासाठी फक्त चालणेच पुरेसे नाही, सोबत करा 'हे' सोपे ४ उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2025 14:01 IST2025-02-15T13:40:36+5:302025-02-15T14:01:40+5:30

Smart Technique To Reduce Hip Fat & Achieve Slim Look : 4 Ways to Lose Hip Fat : How to Get Rid of Hip Fat : Best Ways To Reduce Hips Fat & Tone Up : effective ways to lose lower back and hip fat : कंबरे खालचा भाग कमी करण्यासाठी फक्त चालणेच पुरेसे नाही, सोबत करा 'हे' सोपे ४ उपाय...

effective ways to lose lower back and hip fat Smart Technique To Reduce Hip Fat & Achieve Slim Look 4 Ways to Lose Hip Fat | कंबर आणि मागचा भाग काही केल्या कमी होत नाही? ४ उपाय-काही दिवसात दिसेल फरक...

कंबर आणि मागचा भाग काही केल्या कमी होत नाही? ४ उपाय-काही दिवसात दिसेल फरक...

सतत वाढत जाणारे वजन कमी करण्यासाठी सगळेचजण अनेक प्रकारचे प्रयत्न करतात. काहीवेळा या प्रयत्नांना यश येऊन वजन कमी होते देखील, परंतु कंबरेखालील भागाचे म्हणजेच हिप्सच्या भागाचे (4 Ways to Lose Hip Fat) वजन काही केल्या कमी होतच नाही. प्रामुख्याने महिलांमध्ये ही समस्या फार मोठ्या (How to Get Rid of Hip Fat) प्रमाणांत जाणवते. अनेकदा शरीराचा वरचा भाग हा योग्य शेपमध्ये किंवा मापात असतो, परंतु खालचा भाग बेढब, आणि जाड असतो. याचा एकूणच व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो(Smart Technique To Reduce Hip Fat & Achieve Slim Look).

अशावेळी आपण आपल्या शरीराच्या खालच्या भागातील (Best Ways To Reduce Hips Fat & Tone Up) म्हणजेच कंबर, मांड्या या भागातील फॅटस कमी करण्यासाठी अनेक उपाय करतो. पण शरीराच्या खालच्या भागाला शेपमध्ये आणणे इतके सहजसोपे नसते. कंबरेखालील भागाला शेपमध्ये आणण्यासाठी अनेक उपाय करताना आपण चालण्याचा एक्सरसाइज तर नक्की करतोच, परंतु कंबरे खालचा भाग कमी करण्यासाठी फक्त चालणेच पुरेसे नसते. यासाठी चालण्यासोबतच इतरही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, त्या नेमक्या कोणत्या ? तसेच कंबरेखालचा भाग झटपट कमी  करण्यासाठी आपण नक्की कोणत्या उपायांचा वापर करु शकतो ते पाहा(effective ways to lose lower back and hip fat).

१. पॉवर वॉकिंग :- 'पॉवर वॉकिंग' हा वेगवान पद्धतीने चालण्याचाच एक प्रकार आहे. ज्यामुळे मांड्या, कमरेकडील भागातील चरबी किंवा फॅट्स झपाट्याने बर्न होतात. यासाठी पॉवर वॉकिंग करताना ६ ते ७ किमी प्रतीतास या वेगाने चाला. वेगाने चालण्या दरम्यान तुमचे दोन्ही हात हलवत चाला जेणेकरून मेटाबॉलिझमचा वेग वाढण्यास अधिक मदत होईल. आठवड्यातून किमान ५ दिवस ३० ते ४० मिनिटे पॉवर वॉक करा. पॉवर वॉकिंग केल्याने   कंबरेव्यतिरिक्त, संपूर्ण शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत मिळते. चालण्या दरम्यान हृदयाची गती वाढवून कॅलरीज बर्न करण्यास मदत करते. स्नायू तंदुरुस्त होतात आणि शरीराचा खालचा भाग योग्य त्या शेप आणि आकारात येतो. 

वर्कआऊट केल्यानंतर चुकूनही खाऊ नयेत ‘हे’ ७ पदार्थ, मेहनत जाते वाया-तब्येतही बिघडते...

२. चालण्यासोबत स्ट्रेचिंग करा :- हिप्सची चरबी झटपट कमी करण्यासाठी फक्त चालणेच पुरेसे नाही. यासाठी वॉकिंगच्या आधी आणि नंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणे देखील तितकेच आवश्यक आहे. वॉकिंगच्या आधी आणि नंतर ५ ते १० मिनिटे स्ट्रेचिंग करा. हिप ब्रिज, स्क्वॉट, लंजेस सारख्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा. स्ट्रेचिंग करताना खोलवर श्वास घ्या आणि शरीराचे योग्य पोश्चर ठेवा. स्ट्रेचिंगमुळे कंबर आणि मांड्यांमधील चरबी झपाट्याने कमी होते. स्नायूंवरील ताण कमी करून एक्सरसाइज करताना दुखापतीचा धोका कमी होतो. रक्ताभिसरणाचा वेग वाढते, ज्यामुळे फॅट बर्न लगेच होतात आणि वजन कमी  करायला मदत होते.

३. इनक्लाइन वॉकिंग करा :- सपाट - सरळ पृष्ठभाग असणाऱ्या रस्त्यावर चालण्यापेक्षा चढ असणाऱ्या रस्त्यावर चाला. यामुळे कंबर आणि मांड्यांमधील चरबी जलद गतीने कमी होण्यास अधिक जास्त मदत होते. जिममध्ये ट्रेडमिलवर १० ते १२ % इनक्लाइन म्हणजेच चढ सेट करून चाला. बाहेर रस्त्यावर चालत असाल, तर वरच्या दिशेने चढ असलेला मार्ग निवडा. ४ ते ५ किमी प्रतीतास या मध्यम गतीने सातत्याने चाला. इनक्लाइन वॉकिंगमुळे कंबरेवरील चरबी लवकर बर्न होते. याचबरोबर, स्नायूंना टोन्ड करण्यास मदत करते तर पाय आणि कंबरेचे स्नायू मजबूत होतात.

४. निरोगी - पौष्टिक आहार :- फक्त एक्सरसाइज आणि चालण्याने कंबरेच्या खालच्या भागातील चरबी कमी होणार नाही, तर यासाठी योग्य आणि निरोगी आहार घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. यासोबतच अंडी, डाळी आणि कडधान्ये यांसारख्या प्रथिनयुक्त आहार घ्या. ओट्स, हिरव्या भाज्या आणि फळे यासारखे फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणांत खा. दिवसभरात कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या. याचबरोबर, तळलेले अन्नपदार्थ आणि जंक फूड टाळा. साखर आणि जास्त कार्ब्स असलेले पदार्थ कमी खा तसेच सोडा आणि कोल्ड्रिंक्सपासून दूर रहा.

'छावा' साठी विकी कौशलने केले प्रोटीन रिच डाएट, पाहा त्यानं नेमकं काय काय खाल्ल...

जर तुम्हाला कंबरेखालील भाग म्हणजेच हिप्स वरील चरबी कमी करायची असेल तर फक्त चालणे उपयोगी ठरणार नाही. तुमच्या फिटनेस रूटीनमध्ये पॉवर वॉकिंग, इनक्लाइन वॉकिंग आणि स्ट्रेचिंगचा समावेश करणे आवश्यक आहे. यासोबतच, संतुलित आहार घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, तरच तुमचे शरीर योग्य शेपमध्ये राहील.

Web Title: effective ways to lose lower back and hip fat Smart Technique To Reduce Hip Fat & Achieve Slim Look 4 Ways to Lose Hip Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.