Join us  

आरोग्यासाठी लाभदायक ठरतं या ८ धातुंच्या ताटात जेवणं; आयुर्वेदाचार्यांनी सांगितले गुणकारी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 1:47 PM

Healthiest utensil to eat food : अजूनही अनेक ठिकाणी झाडाच्यां पानांवर तर कुठे मातीच्या भांड्यांमधून खाल्लं जातं.

ठळक मुद्दे पितळाच्या भांड्यात जेवण जास्तवेळ गरम राहतं. पितळाच्या भांड्यात जेवल्यानं शरीराचं पीएच लेव्हल नियंत्रणात राहतं. तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. कारण यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. जे पाण्यामधून बॅक्टेरिया काढून टाकतात.

आपण आहारात काय खातो आणि कोणत्या ताटात खातो या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी महत्वाच्या असतात.  सध्या लोक चीनी माती आणि स्टीलच्या भांड्यांचा वापर जेवणासाठी जास्त करतात. सणासुदीला किंवा पाहूणे आल्यानंतर आपण जेवणाची ताटं पारंपारिक आणि रोजच्यापेक्षा थोडी वेगळी ठेवतो. अजूनही अनेक ठिकाणी झाडाच्यां पानांवर तर कुठे मातीच्या भांड्यांमधून खाल्लं जातं. मेडिकल कॉलेजचे सहायक प्रोफेसर डॉ. भारत भूषण आणि आयुर्वेदाचार्य डॉ. राहुल चतुर्वेदी यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना आयुर्वेदानुसार कोणत्या भांड्यांमध्ये जेवल्यानं शरीराला फायदे मिळतात याबाबत सांगितले आहे. 

तज्ज्ञ काय सांगतात?

डॉ. भारत भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रामध्ये नमुद केले आहे की, राजा-महाराजा लोक हे नेहमी सोन्या चांदीच्या थाळीतच जेवायचे. कारण त्यांना शुत्रूंकडून जेवणात विष मिसळण्याची भीती असायची. विष चांदीमध्ये एकत्र झाल्यानंतर त्याची चव आणि खाण्याचा रंग दोन्ही बदलायचं. आयुर्वेदात दिलेल्या माहितीनुसार कांस्याच्या भांड्यात जेवायला हवं. तांब्याच्या भांड्याचा वापर खाण्यासाठी करू नये कारण ते सिट्रिस फूडसह रिएक्ट होते. सिट्रिस फूड खाल्ल्यानं जेवणाचा रंग बदलतो. पाणी नेहमी तांब्याच्या भांड्यातून प्यायाला हवं ते लाभदायक ठरतं. पण तांब्याच्या थाळीत जेवल्यानं अपनाची समस्या निर्माण होऊ शकते.  

कोणत्या प्रकारच्या थाळीत जेवल्यानं काय फायदे मिळतात?

1) सोन्याचं ताट-

सध्या सोन्याच्या ताटात जेवताना कोणीही फारसं दिसून येत नाही. राजा महाराजांच्या काळात सोन्याच्या थाळीचा जेवणासाठी वापर केला जात होता.  तज्ज्ञांच्यामते  शरीरातील धातू 65 अकार्बनिक पदार्थ आणि 35 टक्के कार्बनिक वस्तूंपासून तयार झालेले असतात. या धातुंमुळे शरीराला मिळणारे फायदे वाढवण्यासाठी सोनं फायद्याचं ठरतं. एंटी बायोटीकप्रमाणे आजारांना दूर ठेवण्याचे काम या धातूद्वारे केले जाते.

२) पितळाचं ताट

आयुर्वेदानुसार पितळाचं ताट बुद्धी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पितळाच्या भांड्यात जेवण जास्तवेळ गरम राहतं. पितळाच्या भांड्यात जेवल्यानं शरीराचं पीएच लेव्हल नियंत्रणात राहतं. या ताटात जेवल्यानं अन्नातील सर्व पौष्टिक घटकांचे मूल्य वाढवते. डाळीतील प्रोटिन्स पुरेपूर मिळण्यास मदत होते. पितळाच्या ताटात अन्न खाल्ल्यास गॅसचा त्रास होत नाही. पचनक्रिया चांगली राहते. 

३) चांदीचं ताट

डॉ. राहुल चतुर्वेदी म्हणतात की चांदी रक्ताचे शुद्धीकरण करते आणि शरीराची उष्णता थंड करते. म्हणून, चांदीच्या ताटात खाणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.  

४) तांब्याचे ताट

तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. कारण यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात, जे पाण्यामधून बॅक्टेरिया काढून टाकतात, परंतु तांब्यामध्ये खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते. कारण तांबे विशिष्ट पदार्थांसह प्रतिक्रिया देतो आणि विषारी बनते. 

५) अल्यूमिनियम

अल्यूमिनियमचा दूर दूरपर्यंत काही उपयोग नाही. बाकीचे धातू महाग आहेत, म्हणून लोक अॅल्युमिनियम आणि स्टील वापरतात. जर आपण अ‍ॅल्युमिनियम व स्टीलमध्ये अन्न शिजवले तर फक्त १३ टक्के गुणवत्ता उरते. बाकीचे गुण निघून जातात. 

६) मातीची भांडी

आयुर्वेदात मातीच्या प्लेटमध्ये खाणे सर्वात फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदाचार्य राहुल चतुर्वेदी म्हणतात की मातीच्या ताटात खाल्ल्याने मातीत गुणधर्म शरीराल मिळतात. मातीच्या भांड्यात स्वयंपाक आणि जेवण दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.

७) केळ्याचे पान

उत्तर भारतातील पिंपळाच्या पानांमध्ये आणि दक्षिण भारतात केळीच्या पानात अन्न देण्याची प्रथा आजही प्रचलित आहे. या पानांमध्ये अन्न खाल्ल्यास आरोग्यास अनेक फायदे होतात. केळीच्या पानात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. जे बर्‍याच रोगांपासून संरक्षण करतात. त्यात अन्न खाल्ल्यास आरोग्यास बरेच फायदे मिळतात.  

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यअन्न