तुम्ही अनेकदा घरातल्या लहानांसह मोठ्यांनाही चणे खाताना पाहिलं असेल. चणे कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. चण्यांचे नियमित सेवन केल्यानं शरीराच्या बऱ्याच समस्या दूर होतात. चण्यांमध्ये प्रोटीन, फायबर्स, फॉस्फरस, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जिंक, कॉपर, व्हिटामीन बी-३ यांसारखे पोषक तत्व असतात. याव्यतिरिक्त यात एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी बॅक्टेरिअल गुणसुद्धा असतात. ज्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. चणे खाल्ल्यानं शरीराला कोणते फायदे मिळतात याशिवाय दिवसाला किती चणे खाणं फायदेशीर ठरतं समजून घेऊ. (Does Eating Soaked Grams Reduce weight)
भिजवलेल्या चण्यांनी वजन वाढतं की कमी होतं?
भिजवलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन, फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पोट बराचवेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी होण्यासही मदत होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आपल्या आहारात चण्यांचा समावेश नक्की करा.
पचनक्रिया चांगली राहते
ज्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी नियमित चण्यांचे सेवन करायला हवे. चण्यांमधील फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवतात. पोटातून टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त तर तुम्हाला गॅसेसची समस्या असेल तर चण्यांचे सेवन फायदेशीर ठरू शकते. ज्यामुळे सहज पोट साफ होण्यासही मदत होते.
हृदयाचे आरोग्यही चांगले राहते
चण्यांमधील एंटी ऑक्सिडेंट्स, एंथोसायनिन आणि फायटोन्युट्रिएंट्स गुण ब्लड वेसल्स मजबूत बनवतात. याशिवाय हृदयाचे आरोग्यही चांगले ठेवतात ज्यामुळे आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होण्यासही चणे मदत करतात.
रक्त वाढण्यास मदत होते
ज्या लोकांना रक्ताच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे त्यांनी चण्यांचे सेवन आवर्जून करावे. चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते. ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन लेव्हल वाढवण्यास मदत होते आणि एनिमियासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
एका दिवसांत किती चणे खावेत?
रोज एका व्यक्तीनं ३० ते ५० ग्रॅम भिजवलेले चणे खावेत. एका निरोगी व्यक्तीसाठी हे प्रमाण उत्तम मानले जाते. याबाबतची माहिती आयुर्वेदीक डॉक्टर सलिम जैदी यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरून दिली आहे.
