>आहार -विहार > सकाळच्या नाश्त्याला कुणी चाट खातं का? हा शेंगदाण्याचा चाट खा, माॅर्निंग प्रोटीन डोस  

सकाळच्या नाश्त्याला कुणी चाट खातं का? हा शेंगदाण्याचा चाट खा, माॅर्निंग प्रोटीन डोस  

सकाळच्या वेळी खाता येणारा पौष्टिक आणि चटपटीत चाट म्हणजे शेंगदाणा चाट. महिलांच्या आरोग्यासाठी शेंगदाणा चाट अतिशय फायदेशीर असून तो आठवड्यातून किमान 3 वेळा सकाळी खायलाच हवा असं आहारतज्ज्ञ सांगतात. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 08:22 PM2022-01-20T20:22:15+5:302022-01-20T20:31:12+5:30

सकाळच्या वेळी खाता येणारा पौष्टिक आणि चटपटीत चाट म्हणजे शेंगदाणा चाट. महिलांच्या आरोग्यासाठी शेंगदाणा चाट अतिशय फायदेशीर असून तो आठवड्यातून किमान 3 वेळा सकाळी खायलाच हवा असं आहारतज्ज्ञ सांगतात. 

Does anyone eat chaat for breakfast? Eat this peanut chaat for morning protein dose | सकाळच्या नाश्त्याला कुणी चाट खातं का? हा शेंगदाण्याचा चाट खा, माॅर्निंग प्रोटीन डोस  

सकाळच्या नाश्त्याला कुणी चाट खातं का? हा शेंगदाण्याचा चाट खा, माॅर्निंग प्रोटीन डोस  

Next
Highlightsमूठभर शेंगदाणा चाटमुळे ढीगभर पोषक घटक शरीरात जातात.  महिलांच्या आरोग्यासाठी  सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक पदार्थ. शेंगादाणा पौष्टिक आहे. चटपटीत लागतो, झटपट बनवता येतो आणि पटपट संपतोही.

चाट म्हणजे संध्याकाळचं खाणं. बाहेर गाड्यावर मिळणारा चाट सगळ्यांनाच आवडतो. पण सकाळी नाश्त्याला चाट खा असं म्हटलं तर? एकतर नाश्त्याला सकाळी कोणी चाट खातं का? हा सामान्य ज्ञान तपासणारा प्रश्न उपस्थित होतो. आणि दुसरं म्हणजे घरचा चाटला कुठे गाड्यावरच्या चाटची मजा. हे दोन्ही प्रश्नांचं उत्तर म्हणजे सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक आणि चटपटीत शेंगदाण्याचा चाट. शेंगदाण्याचा हा आरोग्यदायी चाट बाहेर गाड्यावर मिळणार नाही. हा चाट घरीच बनवून खायचा असतो. सकाळच्या नाश्त्याला शेंगदाणा चाट खाल्ला तर त्याचा फायदा होतो. 

Image: Google

दिल्लीतील फोर्टिस हाॅस्पिटल येथील आहारतज्ज्ञ सिमरन सैनी शेंगदाण्याच्या चाटचं महत्त्वं सांगतात. सिमरन म्हणतात, की एक वाटी किंवा मूठभर शेंगदाण्याचा चाट खाल्ला तरी आरोग्यास पोषक घटक मिळतात. शेंगदाण्याच्या चाटमधून पोटॅशियम, तांबं, कॅल्शियम, लोह आणि सेलेनियम हे महत्त्वाचे घटक  मिळतात. हे घटक कंबरेचं दुखणं, पाठीचं दुखणं, संधिवातामुळे होणाऱ्या वेदना कमी होण्यासाठी, या समस्या उद्भवूच नये यासाठी महत्त्वाचे असतात. सिमरन म्हणतात, की महिलांच्या आरोग्यासाठी शेंगदाणा चाट खूपच फायदेशीर असतात,  आठवड्यातून किमान तीन दिवस सकाळी नाश्त्याला हा चाट आवर्जून खाण्याचा सल्ला सिमरन देतात. हा चाट नुसता पौष्टिक असतो असं नाही तर तो चवीला इतर चाटच्या इतकाच चटपटीत लागतो. फक्त हा चाट तयार करताना लिंबाचा रस आणि टमाटा हे दोन घटक वापरायलाच हवेत. कारण केवळ शेंगदाण्यामुळे बध्दकोष्ठतेचा त्रास होतो. 

Image: Google

कसं करायचा शेंगदाण्याचा चाट?

शेंगदाण्याचा चटपटीत आणि पौष्टिक चाट करण्यासाठी 1 मोठी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे , 1 बारीक चिरलेला कांदा,  1 बारीक चिरलेला टमाटा, 2 बारीक कापलेली हिरवी मिरची, 1 छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा काळं मीठ, 1 छोटा चमचा लाल तिखट,  1 छोटा चमचा चाट मसाला आणि  1 चमचा लिंबाचा रस घ्यावा. 

चाट तयार करताना आधी शेंगदाणे खरपूस भाजावेत. एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टमाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सर्व नीट एकत्र करावं. नंतर यात भाजलेले शेंगदाणे घालावेत. शेंगदाणे नीट मिसळून घ्यावेत. नंतर यात काळं मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला घालावा. भांड्यातलं जिन्नस चमच्यानं नीट एकत्र करावं.  शेवटी लिंबाचा रस घालून  हे चाट नीट हलवून घ्यावा.

Image: Google

हा चाट शेंगदाणे उकडूनही करता येतो. यासाठी 3 वाट्या शेंगदाणे घ्यावेत. ते निवडावेत. कुकरच्या भांड्यात 3 वाटी शेंगदाणे आणि 5 वाट्या पाणी घालावं. त्यात थोडी हळद आणि मीठ घालावं. कुकरला 5 शिट्या घेवून शेंगदाणे उकडावेत. कुकरची वाफ गेल्यावर शेंगदाणे रोळीत काढून त्यातील पाणी काढून घ्यावं. हे पाणी वाया जाऊ न  देता रश्याच्या भाजीला वापरावं. उकडलेले शेंगदाणे समजा 3 वाटी घेतल्यास 2 मोठे चमचे लिंबाचा रस घालावा. बाकी जिन्नस भाजलेल्या शेंगदाण्याचा चाट करताना वापरलं तितकंच वापरावं.

Image: Google

इतक्या सोप्या पध्दतीने तयार होणारा हा शेंगदाणे चाट घाई असेल तर डब्यात भरुन सोबत न्यावा. वेळ मिळाला की खाऊन टाकावा. चालता-बोलता, काम करता करता खाता येणारा हा पदार्थ आहे. यापेक्षा सोपं आणि पौष्टिक आणखी काय असू शकेल?  

Web Title: Does anyone eat chaat for breakfast? Eat this peanut chaat for morning protein dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Cholesterol Control Drink : उन्हाळ्यात शरीरातलं घातक कॉलेस्टेरॉल बाहेर काढतील ४ 'सुपर ड्रिंक्स'; आजपासूनच प्यायला लागा - Marathi News | Cholesterol Control Drink : Cholesterol lowering drinks for summer green tea oats milk tomato juice soy milk | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात शरीरातलं घातक कॉलेस्टेरॉल बाहेर काढतील ४ 'सुपर ड्रिंक्स'; आजपासूनच प्यायला लागा

Cholesterol Control Drink : शरीरातल्या बॅड कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवलं नाही तर जीवघेणे आजार वाढत्या वयात उद्भवू शकतात. ...

Tomato Flu Prevention : टोमॅटो फ्लूपासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी; लक्षणं, बचावाचे उपाय माहीत करून घ्या - Marathi News | Tomato Flu Prevention : Tomato Flu symptoms, treatment, precautions here | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : टोमॅटो फ्लूपासून बचावासाठी 'अशी' घ्या काळजी; लक्षणं, बचावाचे उपाय समजून घ्या

Tomato Flu Prevention : टोमॅटो फ्लू संसर्गजन्य असल्याने, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित व्यक्तीशी जवळचा संपर्क टाळला पाहिजे. ...

केसांच्या ५ तक्रारी सांगतात तुमच्या बिघडलेल्या तब्येतीची लक्षणं, दुर्लक्ष करणं पडतं महागात - Marathi News | 5 hair problems can be the symptoms of your poor health and indicates several internal health issues | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केसांच्या ५ तक्रारी सांगतात तुमच्या बिघडलेल्या तब्येतीची लक्षणं, दुर्लक्ष करणं पडतं महागात

केसांच्या ५ तक्रारी सांगतात तुमच्या बिघडलेल्या तब्येतीची लक्षणं, दुर्लक्ष करणं पडतं महागात ...

Tutti Frutti Recipe: मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर  - Marathi News | Food And Recipe: How to make tutti frutti from water melon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी आता झटपट करा घरीच, टरबुजाच्या सालाचा बघा खास वापर 

Tutti Frutti Recipe: आईस्क्रिम, केक यामध्ये दिसणारी आणि जवळपास सगळ्याच लहान मुलांना आवडणारी टुटीफ्रुटी घरच्याघरी करणं अगदीच सोपं आहे.. बघा ही खास रेसिपी ...

आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही - Marathi News | Worried about weight gain and heat problem by eating mango? 7 special tips, weight and heat both will get controlled | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबा खाऊन वजन वाढण्यासह उष्णतेचा त्रास, पोट बिघडण्याची भीती वाटते? ७ उपाय, आंबा बाधणार नाही

Proper Method of Eating Mango: दररोज आंबा खाऊनही वजन (weight) आणि शरीरातील उष्णता (heat) दोन्हीही कंट्रोलमध्ये राहू शकतं... त्यासाठीच या काही खास टिप्स ...