Join us

चपाती खाल्ल्याशिवाय जमतच नाही? पण वजन वाढण्याचं टेन्शन येतं? दिवसभरात 'इतक्या' चपाती खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2024 19:51 IST

Chapati for Weight Loss – What Do The Experts Say? : वजन वाढू नये म्हणून दिवसभरात 'इतक्या' पोळ्या खा; इंचभरही वाढणार नाही वजन..

भारताच्या विविध भागांमध्ये चपाती (Chapati) खाल्ली जाते. भारतीय थाळीमध्ये पोळी हमखास असते (Wheat Flour). पोळीशिवाय जेवण अपूर्ण आहे (Food). गव्हाची चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत. गव्हाच्या पोळीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन आढळते. मात्र, काहींसाठी नियमित चपाती खाणं आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ठरू शकणार नाही.

आपल्यापैकी बहुतांश लोकांचं बसून काम असतं. त्यावेळी शारीरिक हालचाल होत नाही. ज्यामुळे वजन वाढत जातं. अशावेळी गव्हाची पोळी खाल्ल्यानं वजन अधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या कामानुसार आहार घ्यावा. जास्त प्रमाणात ग्लुटेन किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणं टाळावे. वजन वाढू नये (Weight Loss), म्हणून दिवसभरात नेमकं किती चपाती खाव्या? पाहा(Chapati for Weight Loss – What Do The Experts Say?).

जास्त प्रमाणात चपाती खाण्याचे तोटे

वजन वाढते

गव्हाच्या पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. जर आपण नियमित गव्हाची पोळी खात असाल तर, शरीरात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण वाढू शकते. गव्हातील ग्लूटेनचे जास्त प्रमाण शरीरातील चरबी वाढवू शकते. त्यामुळे जर वजन कमी करायचं असेल तर. चपाती खाण्याचे प्रमाण कमी करा.

युट्यूबर आशिष चंचलानीने घटवलं ४० किलो वजन, तो सांगतोय १ सिक्रेट-कसं कमी झालं वजन

पोटाचा त्रास

चपाती पचायला जड असते. अनेकदा चपाती खाल्ल्यानंतर पोटात जडपणा जाणवतो. पोट फुगायला लागते. यामुळे पोटात गॅस, ॲसिडिटी किंवा पचनाच्या इतर समस्या होतात. म्हणून ज्यांना पोटाचा त्रास आहे, त्यांनी चपाती कमी प्रमाणात खावी.

रक्तातील साखरेची पातळी वाढते

जास्त प्रमाणात पोळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. गव्हात कार्बोहायड्रेट्स असल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे गव्हापासून बनवलेले पदार्थ खाऊ नये.

थकवा

गव्हाची पोळी खाल्ल्याने उर्जा मिळत असली तरी, काही वेळांनंतर थकवा आणि आळस जाणवतो. याचे कारण म्हणजे ब्रेडमध्ये आढळणारे कार्बोहायड्रेट. जास्त कर्बोदके खाल्ल्याने शरीरात आळस वाढतो. त्यामुळे चपाती कमी प्रमाणात खावी.

कंबर, मांड्या - थुलथुलीत पोट कमीच होत नाही? कोमट पाण्यात घाला 'या' फळाचा रस; वजन घटेल - दिसाल सुडौल

दिवसभरात किती चपाती खावी?

दिवसभरात ५- ६ चपात्या खाऊ नये. ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्या महिलेने ४ पेक्षा जास्त पोळ्या खाऊ नये. चपातीऐवजी मर्यादित प्रमाणात भात खावे.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स