वाढत्या वजनामुळे हैराण झालेले अनेक लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी बऱ्याच लोकांचा फोकस डाएटिंग करण्यावर असतो. डाएट करताना तुम्हाला काही विशिष्ट पदार्थ किंवा विशिष्ट फळं खाणं अजिबात चालत नाही. या फळांमध्ये सगळ्यात पहिलं नाव घ्यावं लागेल ते केळीचं. वजन कमी करायचं असेल तर काही दिवस केळीला बाय- बाय म्हणावं लागेल असं आपण आजवर अनेकदा ऐकत आलेलो आहोत. पण खरंच केळीमुळे वजन खरंच खूप वाढतं का? (Can You Eat Bananas If You Are On A Weight Loss Diet?) ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी केळी खाणं पूर्णपणे बंदच करावं का? (health benefits of banana) बघा यासारख्या प्रश्नांची आहारतज्ज्ञांनी दिलेली उत्तरं...(Does banana really responsible for weight gain?)
वजन कमी करायचं असेल तर केळी खाणं बंद करावं का?
वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठी केळी खाणं कितपत योग्य आहे याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी amitagadre या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी केळी खाण्यासाठी पूर्ण परवानगी दिलेली आहे. त्यामागची काही कारणंही त्यांनी नमूद केली आहेत. ती नेमकी कोणती ते बघूया...
दीपिका पदुकोन म्हणते- आई झाल्यावर खूप गोष्टी बदलल्या आणि 'या' गोष्टीचा त्रास होऊ लागला..
१. केळीमध्ये ११० कॅलरीज असतात. जर तुम्हा थोडीशी भूक लागली असेल तर एक केळी खाऊन तुम्ही तेवढ्या कॅलरीज मिळवल्या तर त्याने वजनावर फार काही परिणाम होत नाही.
२. जर केळी आणि त्यासोबत थोडेसे पीनट बटर खाल्ले तर या मिश्रणातून तुमच्या शरीराला चांगले फॅट्स पुरेशा प्रमाणात मिळतात. त्यामुळे शक्य झाल्यास केळी आणि पीनट बटर हे मिश्रण खा.
केस झाडूसारखे ड्राय झाले? जावेद हबीब सांगतात 'या' पद्धतीने तेल लावा, रेशमासारखे मऊ होतील
३. जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा व्यायाम, वॉकिंग या माध्यमातून अधिकच्या शारीरिक हालचालीही होत असतात. यामधून तुमच्या शरीरातली मॅग्नेशियमची पातळी कमी होत जाते. ती भरून काढण्याचं काम केळीद्वारे केलं जातं. त्यामुळे वेटलॉस करत असलात तरीही योग्य प्रमाणात केळी खाण्यास हरकत नाही असं तज्ज्ञ सांगतात.