Join us

वेटलॉससाठी दुधीचा रस पिताय? पण खरंच या उपायाने वजन कमी होत का? न्यूट्रिशनिस्टचा खास सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 14:15 IST

how to drink bottle gourd juice for weight loss : can drinking bottle gourd juice empty stomach help in reducing weight : दुधीभोपळ्याचा रस खरंच वजन कमी करण्यात मदत करतो का आणि तो कसा व किती प्रमाणात घ्यावा ते पाहा...

वाढत्या वजनाने आजकाल सगळेचजण खूप हैराण आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारे वजन नेमके कसे कमी करायचे असा प्रश्न कित्येकदा आपल्याला पडतो. वजन कमी करण्याच्या नैसर्गिक व घरगुती उपायांमध्ये दुधीभोपळ्याचा रस खूपच लोकप्रिय आहे. अनेकजण हा दुधीभोपळ्याचा रस म्हणजे वेटलॉससाठी 'जादुई पेय' मानतात, ज्यामुळे सहजपणे वजन घटवता येते. पण खरंच दुधीभोपळ्याचा रस पिऊन वजन कमी करणे शक्य आहे का? दुधीभोपळ्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर व पाण्याचे प्रमाण जास्त असते. या गुणधर्मांमुळे हा रस भूक नियंत्रित ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी दुधीभोपळ्याचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, पचन सुधारतं आणि मेटाबॉलिझमचा वेग वाढतो, जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते(how to drink bottle gourd juice for weight loss).

अशा परिस्थितीत, मनात नक्कीच प्रश्न येतो की, सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस पिण्याने खरंच वजन कमी होण्यास मदत मिळते का? या दाव्यामागील सत्य काय आहे, हे Divya Gandhi's Diet & Nutrition Clinic च्या डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट दिव्या गांधी यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. दुधीभोपळ्याचा रस खरंच वजन कमी करण्यात (how to drink bottle gourd juice for weight loss) मदत करतो का आणि तो कसा व किती प्रमाणात घ्यावा ते पाहूयात... 

सकाळी उपाशी पोटी दुधीचा रस पिण्याने खरंच वजन कमी होते का?

न्यूट्रिशनिस्ट दिव्या गांधी सांगतात, "सकाळच्या वेळी दुधीचा रस पिणे खूप फायदेशीर ठरते. हा रस फक्त शरीराला हायड्रेटेड ठेवणारा आणि फायबरयुक्तच नाही, तर यात कॅलरीज देखील कमी प्रमाणात असतात. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी तो खूप चांगला मानला जातो."

दिव्या गांधी पुढे स्पष्ट करतात, "जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस पिता, तेव्हा त्यात असलेल्या फायबरमुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही आणि तुमचे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. यामुळे तुम्ही वारंवार होणाऱ्या अनावश्यक खाणे टाळता, जे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते."

फॅटी लिव्ह न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ उपाय. लिव्हरचं  काम सुधारेल - वेटलॉसही होईल झरझर...   

वजन कमी करण्यासाठी दुधीचा रस आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट केला जाऊ शकतो, यात शंका नाही. परंतु, जर तुम्हाला वेगाने वजन कमी करायचे असेल, तर केवळ आहारावर अवलंबून न राहता नियमितपणे व्यायाम करणे अधिक चांगले आहे, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

उपाशी पोटी दुधीचा रस पिण्याचे फायदे... 

१. वेटलॉस :- दुधीच्या रसामध्ये कॅलरीज फारच कमी असतात आणि त्यात फॅट्सचे प्रमाण अजिबात नसते. यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे किंवा शरीराचे वजन नियंत्रित ठेवायचे आहे, ते लोक हा रस आपल्या आहारात समाविष्ट करू शकतात.

२. बॉडी डिटॉक्स :- दुधीच्या रसामध्ये फायबर फार मोठ्या प्रमाणात असते.  ज्यामुळे बराच वेळ पोट भरलेलं राहाते अशा प्रकारे तुम्हाला तुमची भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि तुम्ही अनहेल्दी अन्नपदार्थ खाणे टाळता. फायबर हे पचनसंस्थेसाठी खूप चांगले असते, आपल्या आहारात दुधीचा रस समाविष्ट केल्यास, शरीरातील सर्व विषारी व टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे शरीराबाहेर टाकले जातात.

३. मेटाबॉलिज्मचा वेग वाढवणे :- दुधीच्या रसामध्ये असे घटक देखील असतात,जे मेटाबॉलिज्मचा वेग नैसर्गिकरित्या वाढवण्यास मदत करतात. जेव्हा मेटाबॉलिज्म चांगले असते, तेव्हा शरीर अधिक कॅलरीज बर्न करते, ज्यामुळे वजन झटपट कमी होण्यास मदत मिळते. 

दुधीचा रस पिण्याचे नुकसान... 

रिकाम्या पोटी दुधीचा रस पिण्याचे काही विशेष तोटे नाहीत, पण जर तुम्ही असा दुधीचा रस प्यायला जो खराब झाला आहे तर त्यामुळे गंभीर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या (पोट आणि आतड्यांसंबंधी समस्या) होऊ शकतात. या समस्यांमध्ये उलटी, पोटदुखी, अतिसार आणि अंतर्गत रक्तस्राव यांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, जर एखाद्या व्यक्तीला किडनीशी संबंधित आजार असेल किंवा दुधीची ॲलर्जी असेल, तर त्यांनी देखील दुधीचा रस पिणे टाळावे. 

लघवीत भरपूर फेस दिसतो ? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट सांगतात ७ उपाय - वेळीच द्या लक्ष, किडनी होईल खराब...

दुधीचा रस कधी पिऊ नये ? 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तसे पाहता दुधीचा रस सगळ्यांसाठीच फायदेशीर असतो. तरीसुद्धा, याला आपल्या आहाराचा भाग बनवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, "नक्कीच दुधीचा रस पिणे चांगले आहे, परंतु या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही की जर कोणाला पोटाशी संबंधित समस्या असेल, तर त्यांच्यासाठी हा रस विषारी पदार्थ ठरु शकतो. "जर दुधीच्या रसाची चव कडू असेल, तर लगेच समजून जा की तो खराब झाला आहे आणि असा दुधीचा रस पिणे शक्यतो टाळावे.रिपोर्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, "दुधीचा रस बनवण्यापूर्वी त्याची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे आणि त्याच्या स्वच्छतेकडे देखील दुर्लक्ष करू नये. चुकीच्या पद्धतीने तयार केलेला रस पिणे योग्य नाही. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते."

English
हिंदी सारांश
Web Title : Bottle Gourd Juice for Weight Loss: Does It Really Work?

Web Summary : Bottle gourd juice, low in calories and high in fiber, aids weight loss by controlling appetite and improving digestion. Nutritionist Divya Gandhi suggests it can be beneficial when consumed on an empty stomach, but a balanced diet and exercise are crucial for effective weight management.
टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स