वजन कमी करणे किंवा फिट रहायचं म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात ते जिममधील अवघड, कठीण व्यायामप्रकार आणि तासंतास गाळलेला घाम. आजकाल वजन वाढणे, पोटाची चरबी आणि फिटनेसची चिंता अनेकांना सतावते. आपले डेली बिझी रुटीन, ऑफिसची धावपळ किंवा वेळेअभावी जिमला जाणं प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. मात्र फिट राहण्यासाठी महागडी मेंबरशिप किंवा तासंतास वर्कआऊट करणं आवश्यकच असतं असं नाही. आपल्या रोजच्या घरगुती कामांमधूनही सहजपणे कॅलरीज बर्न करता येतात, हे अनेकांना माहिती नसतं. आपलं शरीर फक्त वर्कआऊट करतानाच नाही, तर बसलेले असताना, काम करताना आणि अगदी झोपेतही कॅलरीज जाळत असतं. गरज असते ती फक्त आपल्या शरीराच्या या नैसर्गिक 'फॅट-बर्निंग' प्रक्रियेला थोडी गती देण्याची...(Burn 500 to 800 calories daily without workout).
न्यूट्रिशनिस्ट निकीता बार्डिया यांच्या मते, शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यासाठी दरवेळी जिममध्ये जाण्याची किंवा कडक डाएट फॉलो करण्याची गरज नसते. आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये छोटे पण महत्त्वाचे बदल करून, आपण कोणतीही जास्तीची मेहनत न घेता दिवसाला ५०० ते ८०० कॅलरीज सहज बर्न करू शकतो. ही पद्धत केवळ सोपी नसून वेटलॉस करण्यासाठी दीर्घकाळासाठी अत्यंत फायदेशीर ठरु शकते. दिवसाला तब्बल ५०० ते ८०० कॅलरीजपर्यंत बर्न करण्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरजही लागत नाही...फक्त आपल्या डेली रुटीनकडे फिटनेसच्या नजरेतून पाहण्याची गरज आहे. जिमशिवायही (how to burn calories without gym) घरबसल्या अॅक्टिव्ह राहून वजन नियंत्रणात ठेवण्याची ही (daily activities that burn calories) सोपी आणि फायदेशीर ट्रिक नेमकी काय आहे, ते पाहूयात...
घरबसल्या अॅक्टिव्ह राहून वजन नियंत्रणात ठेवण्याच्या सोप्या ट्रिक्स...
१. थंड खोलीत झोपणे (१८-२०°C) :- थोड्या थंड तापमानात झोपल्यामुळे शरीराला आपले मूळ तापमान (Core Temperature) टिकवून ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. या प्रक्रियेमुळे शरीरातील 'ब्राऊन फॅट' अॅक्टिव्ह होते, जे चरबी जाळण्याचे काम करते. यामुळे रात्रभरात १०० ते २०० अतिरिक्त कॅलरीज बर्न होऊ शकतात.
२. योग्य पद्धतीने थंड पाणी पिणे :- जेव्हा आपण थंड पाणी पितो, तेव्हा शरीर ते गरम करण्यासाठी ऊर्जा खर्च करते. दिवसभरात ८ ते १० ग्लास थंड पाणी पिण्याने सुमारे ७० ते १०० अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. हा बदल अतिशय छोटा पण परिणामकारक आहे.
३. NEAT मेटाबॉलिझमचे खरे सिक्रेट :- NEAT म्हणजे Non-Exercise Activity Thermogenesis. फोनवर बोलताना उभे राहणे, कुणाचीही वाट पाहत असताना फेऱ्या मारणे किंवा जमिनीवर बसणे या सर्व अतिशय छोट्या - मोठ्या (burn calories at home naturally) हालचाली आहेत. व्यायाम न करताही या सवयी दिवसभरात सुमारे ३०० ते ५०० अतिरिक्त कॅलरीज जाळण्यास मदत करू शकतात.
४. नाश्त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवा :- प्रोटीन पचवण्यासाठी आपल्या शरीराला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते, ज्याला Thermic Effect of Food असं म्हणतात. १०० कॅलरी प्रोटीन खाल्ल्यावर त्यातील २० ते ३० कॅलरी केवळ पचन प्रक्रियेतच खर्च होतात. सोबतच, यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते, परिणामी सारखी भूक लागत नाही इतकंच नाही तर वारंवार होणारे क्रेविंग्स देखील कमी होण्यास मदत मिळते.
५. सकाळी कोवळे ऊन घेणे :- सकाळी अंथरुणातून उठल्यावर पुढील ६० मिनिटांच्या आत कोवळ्या ऊन्हात उभं राहून ऊन घेणं वजन कमी करण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. सकाळचा नैसर्गिक सूर्यप्रकाश शरीरातील 'कोर्टिसोल रिदम' (Cortisol Rhythm) सुधारतो. जर का आपल्या शरीरात असंतुलित कोर्टिसोलचे प्रमाण जास्त असेल तर पोटाच्या घेऱ्याभोवती चरबी साठून राहते. याउलट, जर 'कोर्टिसोल रिदम' योग्य असेल तर शरीरातील फॅट बर्निंग होण्यास मदत होते.
६. डिसिजन फटीग (Decision Fatigue) कमी करा :- सततचा मानसिक ताण आणि जास्त निर्णय घेण्याच्या ओझ्यामुळे शरीरातील कोर्टिसोलचे प्रमाण वाढते, जे चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला (Fat Oxidation) रोखते. मानवी मेंदू शरीरातील एकूण ऊर्जेच्या सुमारे २०% ऊर्जा वापरतो. त्यामुळे कामाचे नियोजन करा आणि प्रत्येक वेळी दिवसभरातील छोटे निर्णय घेण्याचे टाळा तसेच टेंन्शन, ताण कमी करा.
७. लो - इंटेंसिटी ॲक्टिव्हिटीमध्ये नाकाने श्वास घ्या :- चालणे किंवा हलक्या अॅक्टिव्हिटी करताना तोंडाने श्वास घेतल्यास फॅट बर्निंग कमी होते. नाकाने श्वास घेतल्यामुळे शरीर जास्त काळ 'फॅट-बर्न झोन'मध्ये राहते.
