Join us

वजन भरभर कमी करायचं असेल तर नाश्त्याचं काय करावं? नाश्त्याचं महत्त्वाचं सिक्रेट वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2024 17:43 IST

Breakfast: Can a Morning Meal Help You Lose Weight? : वजन कमी करण्याच्या नादात नाश्ता करणंच सोडलंय?

राजासारखा नाश्ता (Breakfast) करावा, ही गोष्ट आपण ऐकलीच असेल. पण काही जण वेट लॉस करण्याच्या नादात ब्रेकफास्ट स्किप करतात. पण ब्रेकफास्ट केल्यानं वेट लॉस होऊ शकतं का? (Lose Weight) अनेक जण घाईगडबडीत असतात. कुणाला कॉलेजला जायचं असतं, तर कुणाची ऑफिसला जाण्याची घाई असते. पण नाश्ता वगळल्यानं गंभीर आजारांचा धोका वाढतो.

सकाळचा नाश्ता स्किप केल्यानं शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. ज्यामुळे शरीराभोवती विविध आजार विळखा घालतात. सकाळचा नाश्ता स्किप केल्यानं नक्की काय होतं? याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो?(Breakfast: Can a Morning Meal Help You Lose Weight?).

सकाळचा नाश्ता न केल्यानं कोणत्या आरोग्य समस्या उद्भवतात?

साखरेची पातळी वाढते

सकाळचा नाश्ता स्किप केल्यानं रक्तातील साखरेच्या पातळीत चढ - उतार होऊ शकते. तर, सकाळी नाश्ता केल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सकस आहाराने केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो आणि त्याच्याशी संबंधित आजारही दूर राहतात.

जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा; वजन, बॅड कोलेस्टेरॉल आणि ब्लड प्रेशर राहील नियंत्रणात; दिसाल फिट

वजन वाढते

नाश्ता वगळल्यानेही वजन वाढण्याचा धोका वाढतो. सकाळचा नाश्ता न केल्यावर, आपण दुपारचं जास्त प्रमाणात खातो. त्यामुळे वजन वाढते. त्यामुळे सकाळचा नाश्ता स्किप करू नये.

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत

नाश्ता वगळणे म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत होणे. रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये ७-८ तासांचे अंतर असते. अशा स्थितीत नाश्ता वगळल्याने पेशींना नुकसान होऊ लागते. त्यामुळे रोगप्रतिकारक पेशींना निरोगी ठेवायचे असेल तर नाश्ता जरूर करा.

२ मिनिटांत प्रेशर कुकरमध्ये करा कुरकुरीत फुटाणे; वाळूची गरज भासणारच नाही..

चयापचय मंद

सकाळचा नाश्ता वगळल्यानं चयापचय मंदावण्यास सुरुवात होते. नाश्ता केल्यानं चयापचय वाढते. जर नाश्ता स्किप केले तर, नक्कीच चयापचय मंद होईल. ज्यामुळे कमी कॅलरीज बर्न होतील. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स