सध्याच्या काळात प्रत्येकाला फिट आणि स्लिम फिगर हवी असते, परंतु वाढलेले वजन ही बहुतेकजणांची मोठी समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत, वजन कमी करण्यासाठी (Sanya Malhotra transformation) आपण एक्सरसाइज व डाएटसोबतच इतर अनेक उपायही करुन पाहतो. वाढत्या वजनाची चिंता जवळपास प्रत्येकालाच सतावते. आपली लाईफस्टाईल, कामाचे स्वरूप आणि आहार यातील लहान चुकाच या समस्येसाठी जबाबदार असतात. यावर उपाय म्हणून अनेकजण जिममध्ये जातात, डाएट करतात, पण सातत्य राखू शकत नाहीत(Sanya Malhotra weight loss secrets).
अनेकदा सोशल मीडियावर अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि फिटनेस ट्रेनर वजन कमी करण्यासंबंधीच्या टिप्स शेअर करत असतात.अशातच नुकतेच, बॉलीवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या दमदार अभिनयासोबतच आता फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत आली आहे. केवळ ३ महिन्यांत सान्याने आपल्या शरीरात जबरदस्त बदल घडवून आणले असून तिच्या फिटनेस ट्रेनरने या ट्रान्सफॉर्मेशनमागील सिक्रेट शेअर केले आहे. सान्या सध्या पूर्वीपेक्षा अधिक टोंड, एनर्जेटिक आणि कॉन्फिडंट दिसत आहे. अभिनेत्री सान्या मल्होत्राची वेटलॉस जर्नी कशी होती आणि तिने कोणते फिटनेस नियम पाळले, याबद्दल माहिती घेऊयात.
अभिनेत्री सान्या मल्होत्राच्या फिटनेस ट्रेनर त्रिदेव यांच्या म्हणण्यानुसार, सान्याचे वजन सुरुवातीला ५६ किलो होते. परंतु, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यांच्या मदतीने तिने आपले बरेच वजन कमी केले आणि आता ती पूर्वीपेक्षाही जास्त फिट आणि स्लिम झाली आहे. फिटनेस ट्रेनर त्रिदेव यांच्या मते, त्यांनी सान्याच्या फॅट लॉससाठी ३ महिन्यांचे ध्येय निश्चित केले होते. यासोबतच त्यांनी सान्याला काही ॲक्टिव्हिटीज शिकण्याचा देखील सल्ला दिला होता.
डार्क सर्कल्सचा रंग सांगतो शरीरातील पोषक तत्वांची कमतरता! दुर्लक्ष करणे पडते महागात...
स्वत:ला पूर्वीपेक्षाही अधिक फिट करण्यासाठी सान्याने तिच्या आहारातही बरेच बदल केले होते. तिच्या फिटनेस ट्रेनरच्या म्हणण्यानुसार, सान्या आधीपासूनच घरी तयार केलेलं साधं जेवण खात होती. परंतु, या ट्रान्सफॉर्मेशनदरम्यान तिने केवळ घरीच तयार केलेले अन्नपदार्थ खाण्यावर अधिक भर दिला. सान्याच्या फिटनेसचे सिक्रेट जंक फूड टाळून साधे आणि घरगुती जेवण खाण्यात दडले आहे.
आहारसोबतच तिने तिच्या वर्कआऊटवर देखील तितकेच लक्ष केंद्रित केले. ट्रेनर त्रिदेव यांनी सांगितले की, या वेटलॉस दरम्यान सान्याने अनेक वेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकून घेतल्या. सान्या पुश अप्स (Push Ups), सपोर्टेड हँडस्टँड्स (Supported Handstands), पुल अप्स (Pull Ups) असे वर्कआऊट न चुकता रोज करते. या हाय इंटेन्स वर्कआऊटमुळे सान्याला शरीरातील चरबी कमी करण्यास आणि स्नायूंना टोन्ड व मजबूत करण्यास मोठी मदत झाली. आपली फिगर मेंटेन्ड ठेवण्यासाठी तसेच फिटनेस उत्तम राखण्यासाठी सान्या नेहमी जिममध्ये वर्कआऊट करताना दिसते. तिच्या वर्कआउट रूटीनमध्ये, स्किपिंग, वेट लिफ्टिंग, स्ट्रेंथनिंग, किकबॉक्सिंग, स्क्वॉट्स या वर्कआऊटचा समावेश करते.
सान्या मल्होत्राला भारतीय पारंपरिक पदार्थ खायला खूप आवडतात. वरण-भात आणि सोबत तूप, दही-भात आणि खिचडी हे तिच्या आवडत्या पदार्थांपैकी आहेत. सान्याचे स्पष्ट मत आहे की, रातोरात आपल्या शरीरात लगेच काहीही बदल होत नाही. जर तुम्हाला फॅटपासून फिट व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. सान्याच्या मते, एकाग्रता आणि सातत्य या दोन गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमचे शरीर फिट करु शकता.