Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना महागडे जिम, ना फॅन्सी डाएट! नेहमीचा दुधाचा चहाही करतो वजन कमी,डॉक्टरांचा सल्ला- पाहा चहा पिण्याची योग्य वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2025 14:48 IST

milk tea for weight loss: tea diet tips: healthy tea habits: आहारतज्ज्ञ म्हणतात आरोग्याच्या काळजी घ्यायची असेल तर चहा सोडण्याची गरज नाही. पण काही गोष्टी लक्षात ठेवणं देखील महत्त्वाचं आहे.

वजन कमी करायचं म्हटलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर येते ते महागडी जिम मेंबरशिप, डाएट प्लान, प्रोटीन पावडर.(milk tea for weight loss) पण खरं सांगायचं झालं तर या धावपळीच्या जगात आपल्याकडे इतका वेळ नसतो, ना खर्च करण्यासाठी पैसे. रोजची कामे, ऑफिसची धावपळ, कुटुंबाची जबाबदारी या सगळ्यांमध्ये आपलं वजन कमी होईल असं अनेकांना वाटतं, पण काही केलं तरी वजन कमी होत नाही.(tea diet tips) पण रोज प्यायला जाणारा चहा आपलं वजन नक्की कमी करु शकतो.(healthy tea habits)आपल्यापैकी अनेकांना चहा आवडतो.(weight loss without gym) अगदी दिवसाची सुरुवात झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकजण चहा पितात. पण या चहामुळे आपलं वजन देखील कमी होऊ शकते. वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा अनेकजण चहा सोडण्याचा विचार करतात.(milk tea benefits) पण आहारतज्ज्ञ म्हणतात आरोग्याच्या काळजी घ्यायची असेल तर चहा सोडण्याची गरज नाही. पण काही गोष्टी लक्षात ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. जाणून घेऊया पोषणतज्ज्ञ शिखा शर्मा यांच्याकडून.

थंडीत रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा 'ही' क्रीम, डार्क सर्कल- सुरकुत्या होतील कमी, चेहरा दिसेल कायम तरुण

पोषणतज्ज्ञ म्हणतात दूध आणि साखर असलेल्या एक कप चहामध्ये अंदाजे ६० कॅलरीज असते. फुल फॅट दुधाऐवजी टोन्ड मिल्क आणि साखरेऐवजी स्टीव्हियासारख्या नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर आपण करु शकतो. साखरेशिवाय चहा प्यायल्याने कॅलरीज कमी होतात. 

आपल्यापैकी अनेकांना चहासोबत स्नॅक्स खाण्याची सवय आहे. चहासोबत आपण बिस्कीट आणि इतर मैद्याचे पदार्थ खाणे टाळा. यासारखे अस्वास्थ्यकर स्नॅक्स खाल्ल्याने वजन वाढू शकते. ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्याऐवजी आपण मूठभर काजू, भाजलेले चणे किंवा मखाणे खाऊ शकतो. 

पोषणतज्ज्ञ म्हणतात सकाळी रिकाम्या पोटी चहा कधीही न पिण्याचा सल्ला देतात. यामुळे आपल्याला आम्लपित्त, छातीत जळजळ आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. जेवणानंतर लगेच आणि झोपण्यापूर्वी चहा पिणे टाळा. रोज एक किंवा दोन कपपेक्षा जास्त चहा पिणे टाळा. जास्त कप चहा प्यायल्याने वजन वाढते, स्ट्रेस आणि निद्रानाशाचा त्रास होतो. तसेच चहा पिण्यापूर्वी वारंवार गरम करणे टाळा.  

English
हिंदी सारांश
Web Title : Lose weight with regular milk tea: Doctor's advice and right time

Web Summary : Weight loss doesn't require expensive gyms or diets. Milk tea can help, but avoid full-fat milk, excess sugar, and unhealthy snacks. Nutritionists advise against drinking tea on an empty stomach or right before bed. Limit intake to one or two cups daily.
टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स