वयाच्या चाळीशी नंतर वजन कमी करणे हे अनेकींसाठी खूप मोठं चॅलेंज असत. एकदा का वयाची चाळीशी ओलांडली की, आपल्या शरीरात अनेक महत्त्वाचे बदल सुरू होतात. या वयात मेटाबॉलिझमचा वेग मंदावतो, हार्मोनल बदल सुरू होतात आणि स्नायूंची ताकदही हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे आहारातील छोट्या - छोट्या चुका देखील वजन वाढवण्याला कारणीभूत ठरतात. अशा परिस्थितीत, अनेक प्रयत्न करूनही वजन कमी करणे कठीण वाटू लागते. विशेषतः पोटावरची चरबी कमी करणे हे एक मोठे आव्हानच असते. परंतु चिंता करु नका, वजन कमी करणे थोडे कठीण असले तरी अशक्य नाही. यासाठीच, चाळीशी नंतर वजन कमी करताना विशेषतः आहाराकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते, आणि यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपला सकाळचा नाश्ता!(best breakfast for weight loss over forty).
सकाळचा नाश्ता हा दिवसाची ऊर्जा वाढवणारा आणि चयापचयाला गती देणारे दिवसांतील पहिला आहार असतो. योग्य नाश्ता निवडल्यास वजन नियंत्रणात राहते, पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते आणि दिवसभर अनावश्यक भूकही लागत नाही. आपला सकाळचा नाश्ता कसा आहे, यावरच दिवसभराचा मूड, एनर्जी लेव्हल आणि वजन कमी करण्याचा वेग अवलंबून असतो. चाळीशीनंतर शरीराला पोषक तत्त्वे पुरवणारे आणि वजन कमी करण्यास मदत करणारे खास नाश्त्याचे पदार्थ कोणते आहेत, जे आपण रोजच्या आहारात समाविष्ट करू शकता ते पाहूयात. चाळीशी नंतर वजन कमी करण्यासाठी आपण नाश्त्यामध्ये काही (weight loss breakfast for 40s) बदल करू शकता याबद्दल दिव्या गांधीं डाएट अँड न्यूट्रिशन (breakfast ideas for women over 40) क्लिनिकच्या डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट दिव्या गांधी यांनी काही आहारासंबंधी टिप्स सांगितल्या आहेत.
वयाच्या चाळीशीनंतर वेटलॉस करण्यासाठी नाश्त्यात कोणते पदार्थ हवेत?
१. केळी :- केळी हा फायबरचा चांगला स्रोत आहे, पण त्यात कॅलरीज खूप कमी असतात. आपण केळीचा देखील नाश्त्यामध्ये समावेश करु शकता. विशेष करून वयाच्या चाळीशी नंतर केळी आपण सकाळच्या नाश्त्यात खाऊ शकता. एनसीबीआयच्या (NCBI) एका अहवालातून हे सिद्ध झाले की, नाश्त्यामध्ये भाज्या आणि फळांमधून मिळणाऱ्या फायबरचा समावेश केल्यास वयाच्या चाळीशी नंतर वजन कमी करण्यात मदत होते.
२. दही :- चाळीशीनंतर वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात आपण दह्याचा देखील आवर्जून समावेश करु शकता. तज्ज्ञांच्या मते, दही हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. एनआयएचच्या (NIH) एका अहवालानुसार, जेव्हा आपण वजन कमी करण्यासाठी नियमितपणे एक्सरसाइज करता आणि आहारात दह्याचा समावेश करता, तेव्हा त्यामुळे वजन कमी करण्यास खूप मदत मिळते. नाश्त्यात दही समाविष्ट केल्याने पुरेशा प्रमाणात प्रोटीन देखील मिळतात.
हिवाळ्यात आहारात हवेच असे ६ फूड - कॉम्बिनेशन! कडाक्याच्या थंडीतही राहाल हेल्दी, ठणठणीत...
३. फळं आणि भाज्यांच्या स्मूदी प्या :- हळूहळू थंडी वाढत आहे. या दिवसांमध्ये आपल्या आहारात स्मूदीचा समावेश करणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरु शकते. खरंतर, स्मूदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कस्टमाइज करू शकता. यात वेगवेगळ्या भाज्या, फळे घालून तयार करु शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हंगामी आजारांपासून बचाव होतो. तसेच, भाज्यांपासून बनवलेल्या स्मूदी प्यायल्यास शरीरातील फायबरचे प्रमाण वाढते. यामुळे दीर्घकाळ आपले पोट भरलेले रहाते. त्याचबरोबर, आपण ओव्हर इटिंग करण्याची वाईट सवय सोडून देतो, जे वजन कमी करण्यास मदत करते.
सततच्या ॲसिडिटीने नको जीव केलाय? करपट ढेकर, जळजळही? ‘हे’ चमचाभर मिश्रण चघळा, पटकन वाटेल बरं...
४. चिया सीड्स :- जर तुमचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुमच्या नाश्त्यामध्ये चिया सीड्सचा नक्की समावेश करा. चिया सीड्स हे उत्तम सप्लिमेंट आहेत ते फायबर आणि प्रोटीनचा देखील चांगला स्रोत आहेत. चिया सीड्सचा नाश्त्यात समावेश केल्याने घ्रेलिन हार्मोनची (Ghrelin Hormone) पातळी कमी होते. हे हार्मोन भूक नियंत्रित करण्याचे काम करते. चिया सीड्स खाल्ल्याने भूक नियंत्रणात ठेवता येते, ज्यामुळे आपण जास्त खाण्यापासून वाचता.
५. ओटमील :- वयाच्या चाळीशीनंतर वजन कमी करण्यासाठी आहारात ओटमीलचा समावेश करा. ओट्समध्ये खूपच कमी कॅलरीज असतात आणि फायबर तसेच प्रोटीन देखील भरपूर प्रमाणात असतात. तज्ञांच्या मते, ओटमील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. नाश्त्यात ओट्स खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते, भूक नियंत्रित होते आणि वजन कमी करण्यासही मदत मिळते.
