Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिनसाखरेचा चहा-कॉफी पिऊनही वजन घटत नाही कारण ‘ही’ बेचव चूक करते घात, हलतच नाही वजनाचा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2025 19:08 IST

Weight Loss Tips: वजन घटविण्यासाठीही तुम्हीही बिनासाखरेचा चहा किंवा कॉफी घेत असाल तर डाॅक्टरांनी दिलेला सल्ला एकदा ऐकायलाच हवा.(benefits of having tea and coffee without sugar)

ठळक मुद्दे जे लोक दिवसाला २ ते ३ कप चहा किंवा कॉफी घेतात त्यांच्या शरीरात चहा- काॅफीच्या माध्यमातून जास्तीतजास्त २ ते ३ चमचे साखर जाते.

वाढत्या वजनाच्या समस्येमुळे सध्या अनेकजण हैराण आहेत. बैठ्या कामाचं स्वरुप, बदललेली आहारपद्धती, व्यायामाचा अभाव याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. त्यामुळे मग वजन वाढत जातं. वजन घटविण्यासाठी नेहमीच वेगवेगळे ट्रेण्ड येत असतात. सध्या असाच एक ट्रेण्ड आला असून यामध्ये अनेकजणांनी बिनासाखरेचा चहा आणि काॅफी घ्यायला सुरुवात केली आहे. चहा आणि कॉफीमधली साखर बंद केली तर कमालीचा वेटलॉस दिसून येतो, असा त्यांचा समज आहे. पण हे अतिशय चुकीचं असून यामुळे तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो ते पाहा...(benefits of having tea and coffee without sugar)

 

वजन घटविण्यासाठी बिनासाखरेचा चहा, कॉफी प्यायल्यास काय होते?

याविषयीची माहिती डॉक्टरांनी drmalharganla या पेजवर शेअर केली आहे. यामध्ये डॉक्टर सांगतात जे लोक दिवसाला २ ते ३ कप चहा किंवा कॉफी घेतात त्यांच्या शरीरात चहा- काॅफीच्या माध्यमातून जास्तीतजास्त २ ते ३ चमचे साखर जाते. त्यातून जास्तीतजास्त ३० ते ४० कॅलरीज मिळतात.

कॅल्शियमसाठी दुधाचाच आग्रह कशाला? दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ५ पदार्थ खा, हाडं राहतील बळकट

एवढ्या कॅलरी शरीरासाठी हानिकारक नाहीत. पण वजन कमी करायचं म्हणूनच फक्त एवढंच करत असाल आणि तेल, कार्ब्स या गोष्टी किती प्रमाणात खात आहात, याचा काही हिशेब करत नसाल तर मात्र फक्त चहा आणि काॅफीमधली साखर बंद करून काहीही उपयोग नाही. त्यामुळे तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही.

 

वजन जर कमी करायचंय असेल तर सगळ्यात पहिले तेल आणि कार्बोहायड्रेट्स यांच्या खाण्यावर नियंत्रण आणा. तसेच चहा- काॅफीमधली साखरेव्यतिरिक्त जे कित्येक गोड पदार्थ तुम्ही अनावश्यकपणे दिवसभर खात असता ते थांबवा.

हिवाळ्यात करून खा प्रोटीन रिच मेथी पनीर पराठा- मुलांचा डबा, नाश्त्यासाठी खमंग, खुसखुशीत बेत

कारण त्यामुळे एकेकावेळी एकदम १०० किंवा त्यापेक्षाही जास्त कॅलरी तुमच्या शरीरात जातात आणि ते वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे. वजन घटवायचं असेल तर चहा- कॉफीमधली साखर सोडण्यापेक्षा तेल, कार्ब्स आणि इतर गोड पदार्थ खाणं कमी करा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Stop sugar-free tea/coffee for weight loss; it's not enough!

Web Summary : Cutting sugar from tea/coffee alone won't significantly reduce weight. Focus instead on controlling oil, carbohydrates, and other sweets. A doctor advises prioritizing diet changes for effective weight loss.
टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नव्यायाम