आपल्या स्वयंपाक घरात कित्येक प्रकारचे मसाले असतात. हे मसाले पदार्थाची चव खुलविण्यासाठी उपयुक्त ठरतात हे तर आपल्याला माहितीच आहे. पण त्या प्रत्येक मसाल्यातून शरीराला कोणते ना कोणते पौष्टिक घटक हमखास मिळत असतात. त्यामुळे आपल्या रोजच्या स्वयंपाकातही मसाल्यांचा थोडासा वापर रोजच करायला हवा. त्यापैकीच एक सुगंधी पदार्थ म्हणजे दालचिनी. सूप, पंजाबी भाज्या किंवा चहामध्ये आपण दालचिनी घालतो (weights loss tips). पण तिचा शरीराला खऱ्या अर्थाने लाभ होण्यासाठी ती कोणत्या पद्धतीने खायला हवी ते पाहूया..(Benefits of Dalchini or Cinnamon Powder)
दालचिनीचे शरीराला होणारे फायदे
१. दालचिनीमध्ये असणारे काही घटक चयापचय क्रिया आणखी चांगली करतात. त्यामुळे शरीरावर चरबी साचून राहात नाही. म्हणूनच वेटलॉस करण्यासाठी दालचिनी नियमितपणे खायला हवी. यासाठी सकाळी कोमट पाण्यात दालचिनीची पावडर घालून तुम्ही ते रिकाम्या पोटी पिऊ शकता.
पांढरे केस काळे होतीलच, पण डोक्यांतला कोंडाही कमी होईल- घ्या कमालीचा 2 in 1 उपाय...
२. एक कप पाण्यात दालचिनीचा एक छोटासा तुकडा घाला आणि ते पाणी काही मिनिटे चांगलं उकळवून घ्या. नंतर ते पाणी गाळून घ्या आणि कोमट असतानाच प्या. जेवणानंतर किंवा रात्री झोपण्यापुर्वी तुम्ही अशा पद्धतीचा दालचिनीचा काढा घेऊ शकता. यामुळे पचनक्रिया चांगली होते. यामुळे झोप चांगली येते. झोप चांगली येण्यासाठी तुम्ही कपभर गरम दुधात दालचिनीची पावडर घालूनही ते पिऊ शकता.
३. दालचिनीची पावडर चहा, सूप, भाज्या, आमटी अशा वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून घेत असाल तर ते ही चांगलेच आहे. कारण त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होते.
Weight Loss Tips: महिलांचं वजन वाढवतात ‘या’ २ गोेष्टी, वजन वाढत असेल तर १०० % तुम्ही ‘हेच’ करताय..
शिवाय शुगर क्रेव्हिंगही कमी होते. त्यामुळे ज्यांना सतत गोड खावं वाटतं त्यांनी दालचिनीचे वरील उपाय करून पाहावे. पण दालचिनीचे एवढे सगळे फायदे असले तरीही तिचा अतिरेक टाळायला हवा. १ टीस्पून दालचिनी एका दिवसाला पुरेशी आहे, अशी माहिती वेटलॉस एक्सपर्टनी miraclesmastery या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
