सतत वाढणारे वजन कमी करणे हेच सध्या आपल्यापैकी बहुतेकांचे उद्दिष्ट आहे. जिममध्ये तासंतास घाम गाळण्यासोबतच, आहारातील लहान बदल देखील खूप मोठा फरक घडवून आणू शकतात. वजन कमी करण्यासाठी आपण जिम, डाएट यांसोबतच अनेक लहान - सहान घरगुती उपाय देखील करून पाहतो. वेटलॉस करण्यासाठी घरगुती उपायांमध्ये आपण मेथी दाणे, चिया सीड्स, अळशी यांसारख्या वेगवेगळ्या बियांचा रोजच्या डाएटमध्ये समावेश करतो. वजन कमी करण्यासाठी असाच एक नैसर्गिक आणि सोपा उपाय आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या बडीशेपपासून करता येऊ शकतो. साधारणपणे आपल्याकडे जेवणानंतर माऊथ फ्रेशनर म्हणून खाल्ली जाणारी ही छोटयाशा दाण्यांची बडीशेप वेटलॉससाठी देखील फायदेशीर ठरु शकते. बडीशेप फक्त पचनच सुधारत नाही, तर वाढलेले वजन कमी करण्यातही ती एखाद्या 'सुपरफूड' प्रमाणे काम करते. बडीशेप भूक नियंत्रित करते, मेटाबॉलिज्मचा वेग वाढवते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते(Benefits of fennel seeds for weight loss).
बडीशेपमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि मेटाबॉलिझम वाढवणारे गुणधर्म असतात ज्यामुळे शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते. विशेष म्हणजे बडीशेप विविध पद्धतीने खाल्ल्यास वजन कमी होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते. बडीशेप फक्त तोंडात टाकून चघळल्याने वजन कमी होते असे नाही, तर वेटलॉस करण्यासाठी बडीशेपचा योग्य वापर कसा करायचा? ती कोणत्या वेगवेगळ्या प्रकारे खाल्ली पाहिजे याकडे देखील विशेष लक्ष देणे गरजेचे असते. बडीशेप खाण्याच्या काही खास आणि सोप्या पद्धती पाहूयात ( how to use saunf for weight loss) ज्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास वजन नैसर्गिकरित्या आणि वेगाने कमी होऊ लागेल.
वेटलॉस करण्यासाठी बडीशेप कशी फायदेशीर...
१. मेटाबॉलिज्म वाढवते :- बडीशेपमध्ये असे कंपाऊंड्स असतात जे चयापचय क्रियेचा वेग वाढवू शकतात. यामुळे शरीरातील फॅट अधिक चांगल्या प्रकारे बर्न करण्यास मदत मिळते.
२. भूक लागण्याचे प्रमाण कमी होते :- बडीशेपमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आपले पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. यामुळे अनावश्यक होणारे फूड क्रेविंग कमी करण्यास आणि जास्त खाण्याच्या सवयीपासून वाचण्यास मदत मिळू शकते.
३. पचन सुधारते :- बडीशेपमध्ये असे डायजेस्टिन एंजाइम असतात की, ज्यामुळे डायजेशन चांगले होते आणि पोट हलके राहते. जर तुमचे डायजेशन चांगले असेल तर तुमचे वजनही नियंत्रणात राहते.
४. वॉटर रिटेंशन कमी करते :- बडीशेपमध्ये हलके डाययुरेटिक (Diuretic) गुणधर्म असतात, जे लघवी होण्याचे प्रमाण वाढवून शरीरातून अतिरिक्त फ्लुईड बाहेर काढण्यास मदत करतात. ज्यामुळे सूज कमी होते आणि शरीर हलके राहते.
५. भरपूर पोषक तत्व मिळतात :- बडीशेप अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सयुक्त असते, ज्यामुळे आपले संपूर्ण आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत होते, जे लठ्ठपणाचे मूळ कारण आहे.
वेटलॉससाठी बडीशेपच्या दाण्यांचा वापर कसा करावा ?
१. जेवण झाल्यावर एक चमचा बडीशेपचे दाणे चघळणे हा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे. हे फक्त अन्न पचवण्यासाठीच नाही, तर तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासही मदत करते.
२. एक चमचा बडीशेप जवळपास १० मिनिटे गरम पाण्यात टाकून उकळून घ्या आणि नंतर ते पाणी प्या.
३. एक चमचा बडीशेप रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या.
