केळी हे स्वस्तात मस्त फळ. हे फळ सर्वसामान्यांना घेऊन खाणं अगदी सहज परवडण्यासारखं आहे. शिवाय केळी कुठेही, कधीही मिळते. अगदी बाराही महिने तुम्ही केळी खाऊ शकता. कोणतंही महागडं फळ जेवढे फायदे देणार नाही, त्यापेक्षा जास्त फायदे केळी देते. पण तरीही आपण तिला कधी कधी आपल्यापासून दूर ठेवतो. कारण केळी खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते असं आपण कित्येक लोकांकडून ऐकलेलं असतं. शिवाय केळी खाल्ल्याने वजन वाढतं हे देखील सांगितलं जातं. त्यामुळे केळीविषयी कित्येकांच्या मनात खूपच संभ्रम आहेत. हेच गैरसमज दूर करणारी पोस्ट सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.(Benefits of Eating Banana Every Day)
केळी खाण्याविषयी ऋजुता दिवेकर सांगतात...
१. केळीविषयी जी पोस्ट ऋजुता दिवेकर यांनी शेअर केली आहे, तिचं फोटो कॅप्शनच खूप मस्त दिलं आहे. 'no i don't raise your blood sugars' असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. यावरूनच असं दिसून येतं की केळी खाल्ल्याने शुगर वाढते, वजन वाढते एवढाच विचार करू नये. केळी जर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ली तर नक्कीच तिचे खूप सारे फायदे शरीराला मिळतात.
गुढीपाडवा स्पेशल: केशर- बदाम श्रीखंड रेसिपी, फक्त १० मिनिटांत श्रीखंड तयार- घ्या झटपट रेसिपी
२. बहुतांश महिलांना पाळी येण्याच्या आधी पोटऱ्यांमध्ये गोळे येण्याचा त्रास होतो. हात- पाय ओढल्यासारखे होतात. रात्रीच्यावेळी हा त्रास जास्त वाढतो. हा त्रास कमी करायचा असेल तर रोज १ केळ खा. कारण केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं आणि ते हा त्रास कमी करण्यासाठी मदत करतं.
३. ज्या लोकांना खूप अशक्तपणा आलेला असतो, थकून गेल्यासारखं, गळून गेल्यासारखं वाटतं त्या लोकांनीही सकाळी नाश्त्यामध्ये १ केळ खायलाच हवं. कारण केळीमधून भरपूर प्रमाणात एनर्जी मिळते ती पुढे बराच वेळ टिकून राहाते.
उन्हात फिरून चेहरा काळा पडला? घरीच फक्त २० रुपयांत करा हायड्रा फेशियल, त्वचा चमकेल
४. मज्जा संस्थेच्या कार्यासाठीही केळी खाणं उत्तम आहे.
५. केळीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. त्या जोकांना नेहमीच कॉन्स्टीपेशन, अपचनाचा त्रास होतो, त्यांनी रोज १ केळ तरी खायलाच हवं.
Web Summary : Bananas are affordable, nutritious, and available year-round. Rujuta Diwekar dispels myths about bananas causing weight gain and raising blood sugar. Eating a banana daily can alleviate leg cramps, boost energy, aid digestion, and support the nervous system.
Web Summary : केले किफायती, पौष्टिक और साल भर उपलब्ध हैं। रुजुता दिवेकर केले के वजन बढ़ाने और ब्लड शुगर बढ़ाने के मिथकों को दूर करती हैं। रोजाना एक केला खाने से पैर के दर्द से राहत, ऊर्जा में वृद्धि, पाचन में सहायता और तंत्रिका तंत्र को समर्थन मिलता है।