Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > 'या' पिठाच्या पोळ्या खा, वजन राहील कंट्रोलमध्ये- केस दाट आणि त्वचाही होईल सुंदर...

'या' पिठाच्या पोळ्या खा, वजन राहील कंट्रोलमध्ये- केस दाट आणि त्वचाही होईल सुंदर...

Weight Loss Tips: हे कोणतं पीठ आणि त्यामुळे शरीराला नेमके कोणकोणते फायदे होतात ते पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2026 15:38 IST2026-03-09T15:37:23+5:302026-03-09T15:38:24+5:30

Weight Loss Tips: हे कोणतं पीठ आणि त्यामुळे शरीराला नेमके कोणकोणते फायदे होतात ते पाहूया...

benefits of chestnut flour or shingada atta, which is the best flour for making chapati, which flour chapati is best for weight loss and weight control | 'या' पिठाच्या पोळ्या खा, वजन राहील कंट्रोलमध्ये- केस दाट आणि त्वचाही होईल सुंदर...

'या' पिठाच्या पोळ्या खा, वजन राहील कंट्रोलमध्ये- केस दाट आणि त्वचाही होईल सुंदर...

Highlightsतुम्ही पुढे सांगितलेल्या एका पिठाच्या पोळ्या आठवड्यातून २ वेळा तरी करून खाऊ शकता.. ते पीठ नेमकं कोणतं ते पाहा...

रोजच्या जेवणात पोळी, भाकरी किंवा पराठा पाहिजेच असतो. नाही म्हणायला एखाद्या दिवशी आपण खिचडी किंवा भात खाऊन वेळ मारून नेतो. पण तरीही भात- खिचडी खाऊन पोट भरल्यासारखं वाटत नाही. काही वेळानंतर लगेच भूक लागते. त्यामुळेच तर आपल्या रोजच्या जेवणात पोळी, पराठा, भाकरी यापैकी काही ना काही तरी असतंच. आता भाकरी अनेकांना आवडत नाही. आणि गव्हाच्या चपात्यांमध्ये असणाऱ्या ग्लुटेनमुळे अनेकांना वजन वाढण्याची, शुगर वाढण्याची भीती वाटते. आता तर बरेच एक्सपर्टही गव्हाच्या पोळ्या खाण्याचं प्रमाण कमी करा म्हणून सुचवतात. अशावेळी तुम्ही पुढे सांगितलेल्या एका पिठाच्या पोळ्या आठवड्यातून २ वेळा तरी करून खाऊ शकता.. ते पीठ नेमकं कोणतं ते पाहा...(benefits of chestnut flour or shingada atta)

 

वजन कमी करण्यासाठी कोणतं पीठ उत्तम?

वजन कमी करायचं असेल तर शिंगाड्याचं पीठ आपल्या आहारात नियमितपणे असायला हवं. आपण ते फक्त उपवासाच्या दिवशीच खातो. पण एरवीही आवर्जुन शिंगाड्याच्या पिठाच्या भाकरी, पराठे खायला हवेत. आयुर्वेदानुसारही शिंगाड्याचं पीठ अतिशय आरोग्यदायी मानलं गेलं आहे.

फ्रिजमधून कुबट- सडका वास येतो? ३ गोष्टी करून पाहा- दुर्गंधी जाऊन फ्रिज होईल स्वच्छ

त्यामध्ये फायबर भरपूर असतात. त्यामुळे पचनाला आणि पर्यायाने वजन नियंत्रित ठेवण्यासाठी हे पीठ अतिशय उपयोगी ठरतं. शिवाय त्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६, मँगनिज, प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात असतात आणि कॅलरी खूप कमी असतात. कॅल्शियम असल्याने ते हाडांसाठी चांगलं असतं, तर लोहामुळे ते अशक्त व्यक्तींसाठी खूप उर्जादायी ठरतं. शिवाय एचबी वाढविण्यासाठीही मदत होते. 

 

शिवाय शिंगाड्याच्या पिठामध्ये असणारे काही घटक केस आणि त्वचा यांच्यासाठीही वरदान ठरतात. त्यामुळे केसांपासून हाडांपर्यंत भरभरून फायदे देणारं शिंगाड्याचं पीठ आपल्या आहारात असायलाच हवं.

रोजचे कपडे धुताना डिटर्जंटमध्ये 'हा' पदार्थ मिसळा, जुने कपडेही चमकतील नव्यासारखे..

त्यासाठी तुम्ही गव्हाचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ सम प्रमाणात एकत्र करून त्याच्या पोळ्या करू शकता. किंवा रात्रीच्या वेळी शिंगाड्याच्या पिठामध्ये वेगवेगळ्या भाज्या किसून घालायच्या आणि त्याचे पराठे करायचे, असंही करू शकता.. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने हे पीठ खा. पण त्याला फक्त उपवासापुरतंच मर्यादित ठेवू नका.. 

 

Web Title : इस आटे की रोटी खाएं, वजन नियंत्रित, बाल और त्वचा सुंदर!

Web Summary : वजन नियंत्रण, बालों और त्वचा के लाभों के लिए हफ्ते में दो बार सिंघाड़े के आटे का सेवन करें। फाइबर, विटामिन और खनिजों से भरपूर, यह पाचन में मदद करता है, ऊर्जा प्रदान करता है, हड्डियों को मजबूत करता है और बालों और त्वचा के स्वास्थ्य में सुधार करता है। गेहूं के आटे के साथ मिलाएं या विभिन्न तरीकों से सेवन के लिए सब्जी पराठे बनाएं।

Web Title : Eat This Flour Roti, Control Weight, Beautiful Hair and Skin!

Web Summary : Include chestnut flour (singhada atta) in your diet twice a week for weight management, hair and skin benefits. Rich in fiber, vitamins, and minerals, it aids digestion, provides energy, strengthens bones, and improves hair and skin health. Mix with wheat flour or create vegetable parathas for varied consumption.