Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > तीन तिघाडा काम बिघाडा हे विसरा, '३-३-३ चा नियम' पाळा - वजन होईल कमी जबरदस्त वेगाने...

तीन तिघाडा काम बिघाडा हे विसरा, '३-३-३ चा नियम' पाळा - वजन होईल कमी जबरदस्त वेगाने...

Benefits Of 3-3-3 Weight Loss Rule : How To Do It : 3-3-3 weight loss rule : simple weight loss rule : वेटलॉससाठीचा '३-३-३ चा नियम' डेली रुटीनमध्ये समावेश करुन पहा, कसं होतंय झटपट वजन कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 13:54 IST2025-07-17T13:48:40+5:302025-07-17T13:54:58+5:30

Benefits Of 3-3-3 Weight Loss Rule : How To Do It : 3-3-3 weight loss rule : simple weight loss rule : वेटलॉससाठीचा '३-३-३ चा नियम' डेली रुटीनमध्ये समावेश करुन पहा, कसं होतंय झटपट वजन कमी...

Benefits Of 3-3-3 Weight Loss Rule & How To Do It 3-3-3 weight loss rule simple weight loss rule | तीन तिघाडा काम बिघाडा हे विसरा, '३-३-३ चा नियम' पाळा - वजन होईल कमी जबरदस्त वेगाने...

तीन तिघाडा काम बिघाडा हे विसरा, '३-३-३ चा नियम' पाळा - वजन होईल कमी जबरदस्त वेगाने...

सध्याच्या काळात वाढतं वजन ही एक मोठी समस्याच बनली आहे, जी अनेक आजारांना निमंत्रण देते. यासाठीच,  अनेकजण आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी (Benefits Of 3-3-3 Weight Loss Rule) वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स, एक्सरसाइज आणि वेटलॉसचे अनेक फंडे आजमावून पाहतात. परंतु, बरेचवेळा या डाएट पद्धती इतक्या कठीण असतात (simple weight loss rule) की त्या सातत्याने पाळणं कठीण होतं आणि हेल्दी वेट टिकवून ठेवणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, वजन कमी करणे म्हणजे सर्वात कठीण काम वाटते. परंतु वेटलॉससाठी काही अशा सोप्या आणि उत्तम ट्रिक्स आहेत, ज्या सहजपणे दीर्घकाळ पाळता येतात आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामध्येच ‘ ३-३-३ नियम’ (3 3 3 Rule) देखील सध्या खूप चर्चेत आहे. हा नियम फॉलो (3-3-3 weight loss rule) केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते, आणि त्याचबरोबर हा नियम आपल्या डेली रुटीनमध्ये सहजपणे दीर्घकाळासाठी सामावून घेतला जाऊ शकतो.

'डायटेटिक प्लेसच्या' संस्थापक आणि न्यूट्रिशनिस्ट साक्षी सिंह (Sakshi Singh, Founder and Nutritionist, Dietetic Place) यांनी onlymhealth.com ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात की, वजन कमी करण्यासाठीचा ‘३-३-३ नियम’ (3 3 3 Rule) एक साधा, परंतु परिणामकारक असा उत्तम उपाय आहे. हा नियम तुमचे डेली रुटीन, आहार, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईलवर आधारित आहे. हा साधासोपा आणि संतुलित नियम वजन कमी करण्यात मदत करतो.

वेटलॉससाठीचा '३-३-३ नियम' म्हणजे नेमकं काय?

१. दिवसातून ३ वेळा संतुलित आहार घ्या :- दिवसभरातून ३ वेळा संतुलित आहार घ्या. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण – या तिन्ही वेळेस नियमितपणे बॅलन्स डाएट पाळणं आवश्यक आहे. प्रत्येक जेवणात प्रथिने (Protein), फायबर (Fiber), कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) आणि हेल्दी फॅट्स (Healthy Fats) यांचा योग्य प्रमाणात समावेश केलेला असावा. यासोबतच जंक फूड किंवा अनहेल्दी स्नॅक्स टाळावेत आणि त्याऐवजी आरोग्यदायी पर्याय निवडण्याचा प्रयत्न करावा. 

तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी किती तासांनी पिणं योग्य? ‘इतक्या’ तासांनी प्यायल्यानं बिघडते तब्येत...

२. हायड्रेशन :- वजन कमी करण्यात हायड्रेशन म्हणजेच शरीरात पुरेसे पाणी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या वेटलॉस नियमातील दुसरा  '३' हायड्रेशनशी संबंधित आहे. या नियमानुसार, आपण दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३ बाटल्या म्हणजेच सुमारे ३ लिटर पाणी प्यावं. वजन कमी करण्यासाठी पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास (डिटॉक्ससाठी) मदत करतं, मेटाबॉलिझम (चयापचय) वाढवतं यामुळे भूकही कमी लागते. त्यामुळे दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे.

टाचांना मोठ्या भेगा पडल्या-पावसाळ्यात ठणकतातही? कच्च्या बटाट्याचा उपाय- भेगांसाठी खास मलम...

३. एक्सरसाइज :- वजन कमी करुन फिट राहण्यासाठी डाएट आणि हायड्रेशनसोबत शारीरिक हालचालही तितकीच गरजेची असते. त्यामुळे या '३-३-३' नियमातील तिसरा  '३' एक्सरसाईजशी संबंधित आहे. या नियमानुसार तुम्ही आठवड्यातून किमान ३ तास तरी फिजिकल अ‍ॅक्टिविटी करावी, म्हणजेच दररोज किमान २५ ते ३० मिनिटे एक्सरसाईज आवश्यक आहे. या वेळी तुम्ही वॉकिंग, योगा, डान्स, जिम किंवा घरच्या घरी तुम्हाला आवडणाऱ्या शारीरिक हालचाली करू शकता. नियमित व्यायाम केल्याने फक्त वजनच कमी होत नाही, तर शरीर देखील तंदुरुस्त राहते आणि शारीरिक ऊर्जा देखील वाढते.

वेटलॉससाठी '३-३-३ नियम फॉलो करण्याचे फायदे... 

१. दिवसातून ३ वेळा संतुलित आहार घेणे आणि नियमित एक्सरसाइज करणे हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतं. तसेच, पुरेसे पाणी प्यायल्यामुळे मेटाबॉलिझम वेगवान होतो, ज्यामुळे शरीरातील कॅलोरी अधिक प्रमाणात बर्न होतात.

२. योग्य वेळी आणि संतुलित आहार घेतल्याने वारंवार भूक लागण्याची समस्या कमी होते, त्यामुळे अनहेल्दी स्नॅक्स आणि खाण्याची अनावश्यक सवय टाळू शकतो. एवढंच नाही तर, पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे भूकही कमी लागते.

बिनपैशांचा घरगुती उपाय-‘या’ पांढऱ्या फुलांची जादू-चेहऱ्यावरचे ओपन पाेर्स करते गायब...

३. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक (टॉक्सिन्स) बाहेर टाकले जातात, तर दुसरीकडे, नियमित एक्सरसाइज आणि संतुलित आहारामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर अधिक कार्यक्षमतेने काम करतं.

४. नियमितपणे एक्सरसाइज केल्याने फक्त शरीर तंदुरुस्त राहतं असं नाही, तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो आणि तणाव कमी होतो. यासोबतच संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतं, ज्यामुळे एकाग्रता आणि मनःशांती वाढते.

Web Title: Benefits Of 3-3-3 Weight Loss Rule & How To Do It 3-3-3 weight loss rule simple weight loss rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.