सतत वाढत जणार वजन पाहून आपल्यापैकी अनेकींना त्याच फारच टेंन्शन येत. बरेचदा खूप प्रयत्न किंवा अनेक उपाय करून देखील वजन काही केल्या कमी होतंच नाही. जिम, डाएट, योगा यांच्यासारखे अनेक उपाय करुन वजन कमी करु पाहतो. वाढणारे वजन कोणत्याही महिलेसाठी चिंतेचा विषयच असू शकतो. शरीराच्या कोणत्याही भागावर साठलेली चरबी आपला संपूर्ण लूक खराब करते आणि शरीराला बेढब करते. इतकंच नाही तर वाढलेल्या वजनामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका देखील वाढतो(Ayurveda Approved Fat Burning Foods for Quick Weight Loss).
आपले वजन वाढू लागताच, आपण एकतर खाणे पूर्णपणे थांबवतो किंवा क्रॅश डाएटिंग सुरू करतो, जेणेकरून लवकर वजन कमी होईल. यामुळे काही काळासाठी वजन कमी झाल्यासारखं वाटतं, पण ते पुन्हा वाढतं आणि शरीरावर नकारात्मक परिणामही होतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते असे करणे योग्य नाही. यामुळे नक्कीच वजन कमी होते, पण ते पुन्हा वाढू शकते आणि आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, वेटलॉस करण्यासाठी आपण घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करू शकतो. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत जे लठ्ठपणा अगदी सहज कमी करू शकतात. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर करत, वेटलॉस करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
वेटलॉस करण्यासाठी आहारात करा 'या' खास ५ पदार्थांचा समावेश...
१. जवं (बार्ली) :- आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, जवं म्हणजेच बार्ली वेटलॉस करण्यास अतिशय फायदेशीर ठरते. जवाची खिचडी किंवा भाकरी देखील तयार करुन रोजच्या जेवणात खाऊ शकता. जव पचायला हलके असतात, कफाचे प्रमाण कमी करते. चयापचय क्रियेचा वेग सुधारते यामुळे पचनक्रिया देखील व्यवस्थित कार्य करते.
२. ताक :- तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दुपारच्या जेवणानंतर जिरे आणि काळीमिरी पूड मिसळून ताक पिणे देखील वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. यामुळे पचनक्रियेचे कार्य व्यवस्थित राहते. वॉटर रिटेन्शन म्हणजेच शरीरात पाणी साठण्याचे प्रमाण कमी होते. याचबरोबर, ताक शरीरातील चरबी जाळण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
३. मध :- सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर पाण्यात १ चमचा मध मिसळून प्यावे. मधामध्ये फॅट जाळणारे अनेक गुणकारी गुणधर्म आढळतात. आहारात मधाचा समावेश केल्याने यामुळे सतत काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा (क्रेव्हिंग्ज) आणि जडपणा कमी करते. चयापचय क्रियेचा वेग सुधारण्यास मदत करते.
ऑफिसात एकाच जागी बसून मान, पाठ, कंबर आखडली? नॅपकिनचा १ भन्नाट उपाय - दुखणं गायब, मिळेल आराम...
४. आलं आणि सैंधव मीठ :- जेवणापूर्वी सैंधव मीठासोबत आल्याचा एक तुकडा चावून खावा किंवा आलं थेट अन्नपदार्थामध्ये शिजताना घालून खावे. यामुळे पचनअग्नी तीव्र होतो. चयापचय क्रियेचा वेग सुधारतो. विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात. पोट फुगणे, गॅस,अॅसिडिटी यांसारख्या समस्या दूर होतात.
५. त्रिफळा पावडर :- वेटलॉससाठी रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास कोमट पाण्यात १ चमचा त्रिफळा पावडर मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे पचनक्रिया आणि आतड्यांची हालचाल सुधारते. इतकेच नाही तर वजन देखील सहजपणे कमी होते.
