Join us

Vat Pournima 2025: वटसावित्री पौर्णिमेचा उपवास करताना ४ चुका करणं कटाक्षाने टाळा, नाहीतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 16:54 IST

Vat Pournima 2025: वटसावित्री पौर्णिमेचा उपवास करणार असाल तर या काही गोष्टी लक्षात ठेवा..(avoid these 4 mistakes while doing Vat Pournima fast)

ठळक मुद्देउपवासाचा तसेच वटसावित्री पौर्णिमेच्या व्रताचा आनंदी मनाने लाभ घेता यावा म्हणून उपवास करताना ही काही पथ्ये नक्की पाळा.

वटसावित्री पौर्णिमेचं व्रत अनेक महिला मोठ्या हौशीने करतात. या दिवशी अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. तसेच बहुतांश महिला उपवासही करतात. एरवी अनेक जणींना उपवास करण्याची सवय नसते. त्यामुळे त्यांना एक दिवसाचा उपवास झाला तरीही दुसऱ्यादिवशी खूप गळून गेल्यासारखे होते. काही जणींना ॲसिडीटीचा भयंकर त्रास होतो. डोकं जड पडतं, पोट बिघडतं (how to do fast for Vat Pournima?). असं काहीही तुमच्या बाबतीत होऊ नये आणि उपवासाचा तसेच वटसावित्री पौर्णिमेच्या व्रताचा आनंदी मनाने लाभ घेता यावा म्हणून उपवास करताना ही काही पथ्ये नक्की पाळा.(avoid these 4 mistakes while doing Vat Pournima fast)

 

उपवास केल्यानंतर ॲसिडीटी, अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून..

१. ज्या दिवशी उपवास असेल त्यादिवशी चहा, कॉफी हे पदार्थ जास्त प्रमाणात घेणं टाळावं. या पदार्थांमुळे ॲसिडीटीचा त्रास होतो. त्याऐवजी पाणी मात्र भरपूर प्रमाणात प्या. 

मळ साचून मुलांची मान, हाताचे कोपरे काळे पडले? १ सोपा उपाय- ५ मिनिटांत मान होईल स्वच्छ

२. याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी सांगतात की उपवासाच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडं जास्त प्रमाणात पाणी प्या. तसेच  तेलकट, तुपकट पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाणेही टाळा. आपल्याकडे बऱ्याचदा उपवासाच्या दिवशी तेलकट, तुपकट पदार्थांचा पोटावर मारा केला जातो. त्यामुळेच दुसऱ्यादिवशी त्रास होतो. 

 

३. उपवास आहे म्हणून सकाळीच उपाशीपोटी फळं खाऊ नका. उपाशीपोटी फळं खाल्ल्याने ॲसिडीटी वाढते.

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

४. उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे असे पदार्थ खाणार असाल तर त्याच्यासोबत ताक नक्की प्या. ताक प्यायल्याने जड साबुदाणा पचायला सोपा जातो आणि त्रास होत नाही. अशा पद्धतीने जर उपवास केला तर त्यामुळे तुम्हाला उपवास करणं जड जाणार नाही. तसेच दुसऱ्यादिवशीही ॲसिडीटी, अपचन असे त्रास न होता एकदम फ्रेश वाटेल. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सवटपौर्णिमानवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४