Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डाएट करताय पण पोटभर जेवल्याचा आनंदच नाही, चिडचिड होते? तुमचं डाएटच तुम्हाला मारतंय कारण..

डाएट करताय पण पोटभर जेवल्याचा आनंदच नाही, चिडचिड होते? तुमचं डाएटच तुम्हाला मारतंय कारण..

डाएट करुन तुम्ही स्वत:चा छळ करता, जेवण ही शिक्षा वाटते? मग तुमचं  काहीतरी भयंकर चुकतं आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 17:55 IST2025-05-08T17:47:17+5:302025-05-08T17:55:00+5:30

डाएट करुन तुम्ही स्वत:चा छळ करता, जेवण ही शिक्षा वाटते? मग तुमचं  काहीतरी भयंकर चुकतं आहे..

Are you on a diet but not feeling the joy of eating your fill? Are you feeling irritable? Your diet is killing you because... | डाएट करताय पण पोटभर जेवल्याचा आनंदच नाही, चिडचिड होते? तुमचं डाएटच तुम्हाला मारतंय कारण..

डाएट करताय पण पोटभर जेवल्याचा आनंदच नाही, चिडचिड होते? तुमचं डाएटच तुम्हाला मारतंय कारण..

Highlightsसतत ऑनलाइन ऑर्डर करून जंक फूड खाणं ही समस्या तरुणांमध्ये तर मोठी आहे.

- नेत्रा परदेशी (आहारतज्ज्ञ)

आपल्या आवतीभोवती इतकी डाएटची चर्चा असते सतत की जो तो तेच बोलतो. कुणी आनंदाने जेवतं का हल्ली, असा प्रश्न पडावा इतके डाएट प्रयोग लोक स्वत:वर करतात. दरवर्षी ६ मे रोजी आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस साजरा करण्यात येतो. तो ही नुकताच झाला. पण मुळात डाएट इतकं आवश्यक असताना डाएट करुच नका हे सांगणारी ही चळवळ नेमकी का आहे?

Embrace Yourself : Reject Diet Culture, Love You ही यंदा थीम आहे.
याचा अर्थ असा की नव्या सोशल मीडियाच्या जगात आपण दिसतो कसे, जाड की बारीक? आपलं वजन याचा लोकांना इतका ताण येतो की फिट राहण्यासाठी योग्य आहार न घेता खाण्यापिण्याचे वाट्टेल ते प्रयोग करतात. त्यामुळे ते फिटही होत नाहीत आणि आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारतही नाही. मुख्य म्हणजे आपलं वाढलेलं किंवा कमी झालेलं वजन इतरांना कसं दिसतं, ते काय म्हणतात यावर आपल्याला स्वत:विषयी चांगलं किंवा वाईट वाटतं. त्यातच  खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हल्ली लठ्ठपणा, डायबेटिस, केस पांढरे होणे ते हाडं ठिसूळ होणे असे आजार तारुण्यातही होतात. शारीरिक क्षमता कमी आणि सतत ऑनलाइन ऑर्डर करून जंक फूड खाणं ही समस्या तरुणांमध्ये तर मोठी आहे.

त्यामुळे आपल्या आहाराचा योग्य विचार करायलाच हवा. साधं, घरचं, लोकल, पारंपरिक खाणं हे उत्तम. पण तसं न करता डाएटच्या नावाखाली पावडरी नि स्मूदी सॅलेडचा ओव्हरडोस सस्टेनेबल लाइफस्टाइल होऊ शकत नाही. आहार ही आपली जीवनशैली बनायला हवी.

सुरू कधी झाला?

आंतरराष्ट्रीय नो डाएट डे हा पहिल्यांदा १९९२ रोजी साजरा करण्यात आला होता.
ब्रिटिश महिला मेरी इव्हान्स यांनी या दिवसाची सुरुवात केली होती.
मेरी इव्हान्स स्वतः एनोरेक्सियासारख्या आजाराने ग्रस्त होत्या.
मेरी इव्हान्सने डायट ब्रेकर नावाची संस्था सुरू केली.
तिच्या संस्थेमार्फत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय नो डाएट डे आयोजित करण्यात आला.
हे सारं म्हणजेच स्वत:चा स्वीकार. अन्न खाऊन आपल्याला आनंद होणं, तृप्ती वाटणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण मन मारुन जगणार असू तर काय मजा..

 

Web Title: Are you on a diet but not feeling the joy of eating your fill? Are you feeling irritable? Your diet is killing you because...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.