Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्का शर्मा रोज खाते खिचडी, वेटलॉस आणि फिटनेससाठी करते भलतेच साधे प्रयोग कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2026 17:46 IST

Anushka Sharma Monotrophic Diet : Monotrophic Diet Helps Stay Fit : Monotrophic Diet For Fat Loss : जितकं साधं जेवण, तितकं आरोग्य छान! स्वतःला फिट आणि मेंटेन्ड ठेवण्यासाठी अनुष्का शर्माचे डाएट तुम्हीही सहज करु शकता.

बॉलिवूडची 'क्वीन' अनुष्का शर्मा सध्या तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फिटनेसमुळे जास्त चर्चेत असते. दोन मुलांची आई झाल्यानंतर स्वतःला पुन्हा त्याच फिट आणि ग्लॅमरस रूपात आणणे सोपे नसते, पण अनुष्काने ते करून दाखवले आहे. आपल्याला मुलबाळ झाल्यावर वाढलेलं वजन आणि व्यायामाचा कंटाळा यामुळे अनेकजणी हैराण असतात. अनुष्का शर्माकडे पाहिलं की, वाटते दोन गोंडस लेकरांची आई असूनही अनुष्का आजही विशीतल्या तरुणीसारखी फिट दिसते. झिरो फिगरपेक्षा हेल्दी असण्यावर विश्वास ठेवणारी अनुष्का नेमका कोणता डाएट फॉलो करते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. नुकताच तिने तिच्या डाएटमधील एका साध्या पण असरदार आशा उपायाचा खुलासा केला आहे. ती कोणत्याही फॅन्सी डाएट करण्यावर भर न देता चक्क आपल्या भारतीय परंपरेतील साध्यासुदी खिचडी आणि वांग्याची भाजी असेच नेहमीचे पदार्थ खाणे पसंत करते(Anushka Sharma Monotrophic Diet).

एका इव्हेंटदरम्यान अनुष्काने सांगितले की, “काहीवेळा मी रोज एकच पदार्थ खाते. एकदा तर मी सलग एक महिना खिचडी आणि वांग्याची भाजीच खाल्ली होती.” हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटू शकतं की इतकी मोठी सेलिब्रिटी असूनही अनुष्का दररोज एकच साधं जेवण कसं काय करू शकते?(Monotrophic Diet Helps Stay Fit).

दरम्यान, प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट आणि हेपेटोलॉजिस्ट डॉ. शुभम वात्स्य यांनी अनुष्काच्या या डाएटचं कौतुक केलं आहे. त्यांच्या मते, खिचडी आणि वांग्याच्या भाजीसारखं साधं आणि संतुलित जेवण गट हेल्थ सुधारण्यासाठी तसेच फॅट लॉससाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं. 

लग्नानंतर वर्षभरात नवराबायको जाडजूड का होतात? सुखी संसाराचे 'साईड इफेक्ट', ‘या’ कारणांमुळे बदलतो शरीराचा घेर...

प्रेग्नन्सीनंतर वजन कमी करणं आणि शरीर पुन्हा फिट ठेवणं अनेक महिलांसाठी आव्हानात्मक असतं, पण अनुष्काने हे अगदी सहज शक्य करून दाखवलं आहे. तिच्या फिटनेसचं सिक्रेट कोणतेही फॅन्सी डाएट किंवा फॅड फूड नसून, साधं, सात्त्विक आणि शरीराला पोषक असलेलं खास डाएट आहे. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये अनुष्काने तिच्या आहाराबद्दल काही खास सिक्रेट शेअर करत तिचा हा डाएट प्लॅन पुन्हा चर्चेत आला आहे. दोन मुलांची आई असूनही अनुष्का इतकी फिट कशी राहते, तिच्या डाएटमागचं सिक्रेट नेमकं काय आहे, ते पाहूयात... 

काय आहे 'मोनोट्रोपिक डाएट'? (What is Monotropic Diet?)

'मोनोट्रोपिक डाएट' म्हणजे अशी खाण्याची पद्धत, ज्यामध्ये काही काळासाठी फक्त एकाच प्रकारचे अन्नपदार्थ खाल्ले जातात. हे अन्नपदार्थ कोणत्याही स्वरूपात असू शकतात. जसे की, अनुष्का शर्माने महिनाभर फक्त खिचडी आणि वांग्याची भाजी खाल्लीहोती, त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या आवडीचे कोणतेही एक संतुलित जेवण ठराविक काळासाठी रोज घेऊ शकता. या डाएटचा मूळ उद्देश रोजच्या आहारात साधेपणा आणणे हा आहे. जेव्हा आपण रोज एकच पौष्टिक पदार्थ खातो, तेव्हा शरीरात जाणाऱ्या कॅलरीजवर नैसर्गिकरित्या नियंत्रण राहते. यामुळे अन्नाची निवड करताना होणारा गोंधळ कमी होतो आणि पर्यायाने वजन कमी करण्यास (Weight Loss) मोठी मदत मिळते.

जेवणानंतर विडा खाण्याची आजीआजोबांची पारंपरिक रीत कामाची, गॅस-अपचन-पित्ताचा त्रास टाळण्याचा हुकमी पत्ता...

महिलांना पुरुषांपेक्षा जास्त पगार देणारा जगातील एकमेव देश, कामाच्या वेळाही फ्लेक्झिबकल आणि सुविधा भरपूर...

बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी खूप गुंतागुंतीच्या डाएट प्लॅन्सच्या मागे धावत असतात. पण याउलट, अनेक आंतरराष्ट्रीय एथलीट आणि नामवंत सेलिब्रिटी हे त्यांच्या आहारात खूप जास्त विविधता न ठेवता, मोजकेच आणि ठराविक अन्नपदार्थ खाऊन स्वतःला फिट आणि हेल्दी ठेवतात.तज्ज्ञ डॉक्टरांनी खुलासा केला आहे की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या सेलिब्रिटींच्या शिस्तबद्ध आणि फिट शरीरयष्टीमागे हे 'सिंपल डाएट' हेच एक मोठे कारण आहे. रोजच्या जेवणात साधेपणा ठेवल्यामुळे शरीराला अन्नाचे पचन करणे सोपे जाते आणि अनावश्यक फॅट्स साठत नाहीत.

'मोनोट्रोपिक डाएट' आपल्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते. जेव्हा आपण हे डाएट फॉलो करतो, म्हणजेच दिवसातील प्रत्येक जेवणात किंवा पूर्ण दिवसभर फक्त एकाच प्रकारचे अन्नपदार्थ खातो, तेव्हा पचनक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होते. जेव्हा आपण एकाच प्रकारचे अन्नपदार्थ रोज खाता, तेव्हा 'पोर्शन कंट्रोल' करणे सोपे जाते. एकाच चवीचे अन्न खाल्ल्यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त खाणे टाळतो, ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होते. याच कारणामुळे, कमी कालावधीत फॅटलॉस करण्यासाठी हे डाएट अतिशय फायदेशीर ठरते. जर तुम्हालाही झटपट रिझल्ट हवा असेल, तर तुम्ही काही काळासाठी ही पद्धत नक्कीच फॉलो करू शकता. यासोबतच, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, कोणताही एकच अन्नपदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषक तत्त्वे पुरवू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर आपण हे डाएट फॉलो करणार असाल, तर तुमच्या शरीरातील 'मॅक्रो' आणि 'मायक्रोन्यूट्रिएंट्स' (प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे) यांच्या संतुलनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Anushka Sharma's weight loss secret: Simple khichdi diet revealed!

Web Summary : Anushka Sharma stays fit post-pregnancy by eating simple meals like khichdi. Experts praise this 'monotropic diet' for weight loss and gut health, emphasizing portion control and easy digestion. It involves eating one food for a while.
टॅग्स :वेट लॉस टिप्सअनुष्का शर्माफिटनेस टिप्सअन्न