बॉलीवूड स्टार आमीर खानने नुकतंच खूप वजन घटवलं आहे. त्याने तब्बल १८ किलो वजन कमी केलं आहे, असं म्हणतात. त्यामुळे तो आधीपेक्षा खूप जास्त फिट आणि ॲक्टीव्ह दिसत आहे. खरं तर त्याच्या वेटलॉसमागे खरं कारण आहे ते त्याचं मायग्रेनचं दुखणं. मायग्रेनचा त्रास हा काही तासांसाठी भयानक वेदना देणारा असतो. आणि तो केव्हा उफाळून येईल हे सांगताच येत नाही. आमीरसुद्धा मायग्रेनमुळे खूप वैतागला होता. तो त्रास कमी करण्यासाठी त्याच्या फिटनेस ट्रेनरने त्याला ॲण्टीइन्फ्लामेटरी डाएट करण्याचा सल्ला दिला (Amir Khan loses 18 kg weight by anti inflammatory diet). हे डाएट केल्यामुळे त्याचा मायग्रेनचा त्रास तर कमी झालाच पण जबरदस्त वेटलॉसही झाला. हे डाएट नेमकं काय असतं आणि त्यात काय करायचं ते पाहा..(what is anti inflammatory diet?)
आमीर खानने केलेलं ॲण्टी इन्फ्लामेटरी डाएट
बॉलीवूड हंगामाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमीर खानने सांगितलं की वजन कमी झालं असलं तरी वेटलॉस हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वजन कमी केलेलं नाही. त्यामागे मायग्रेनचं कारण होतं. खरंतर त्या कारणासाठीच आपण डाएट करता होतो.
गुलाबाच्या छोट्याशा रोपालाही येतील भरपूर कळ्या, सोपा घरगुती उपाय- जादू झाल्यासारखं बहरेल रोप
आहारतज्ज्ञ सांगतात की सतत झोप अपुरी होणे, आहारात साखरेचं किंवा गोड पदार्थांचं प्रमाण खूप असणे, दारूचे अतिसेवन, प्रोसेस्ड फूड जास्त प्रमाणात खाणे यामुळे शरीरातून काही केमिकल्स तयार होतात. त्यांच्यामुळे इन्सुलिन आणि लेप्टीन या हार्मोन्सच्या कामात अडथळा येतो आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढते, वजन वाढते. शरीरावर येणाऱ्या या सुजेलाच आपण इन्फ्लेशन म्हणताे. म्हणून ती कमी करण्यासाठी ॲण्टी इन्फ्लामेटरी डाएट करण्याचा सल्ला दिला जातो.
आता हे डाएट नेमकं काय असतं ते पाहूया.. आहारतज्ज्ञ सिमरन चोपडा सांगतात की शरीरावरची सूज कमी करण्यासाठी कॉटनसीड, ग्रेपसीड, सुर्यफूल, सोयाबीन यांचे तेल खाणं टाळायला हवं.
केळी खाल्ल्याने खरच लहान मुलांचा कफ, सर्दी वाढते का? आजारी मुलांना केळी देत असाल तर....
प्रोसेस्ड फूड, शुगर असणारे वेगवेगळे ड्रिंक्स, बेकरी पदार्थ, डीप फ्राय पदार्थ यांच्यापासून दूर राहायला हवं. लोणी, चीज, दही, साय असे फुल फॅट डेअरी प्रोडक्ट्स किंवा फुल फॅट दूध घेणंही टाळावं. हे पदार्थ आहारातून वगळले तर आपोआपच शरीरावरची सूज कमी होण्यास मदत होते. फिटनेस वाढतो. आमीर खाननेही हेच केलं.
Web Summary : Aamir Khan lost 18 kg following an anti-inflammatory diet to combat migraines. This diet avoids processed foods, sugary drinks and full-fat dairy, reducing body inflammation and promoting weight loss, as suggested by his trainer.
Web Summary : आमिर खान ने माइग्रेन से लड़ने के लिए एंटी-इंफ्लेमेटरी डाइट का पालन करके 18 किलो वजन कम किया। इस डाइट में प्रोसेस्ड फूड, शर्करा युक्त पेय और फुल-फैट डेयरी से परहेज किया जाता है, जिससे शरीर की सूजन कम होती है और वजन घटाने में मदद मिलती है।