दसरा, दिवाळी, गौरी- गणपती असे मोठे सण असो किंवा मग घरात एखादे मंगलकार्य असो.. कोणतीही थोडी मोठ्या स्वरुपाची पूजा करताना विड्याची पानं आवर्जून लागतात. जेव्हा कलश स्थापना केली जाते तेव्हाही कलशामध्ये लावायला विड्याची पानं हमखास लागतात. म्हणजेच काय तर आपल्याकडे धार्मिक कार्यात विड्याची पानं अतिशय महत्त्वाची मानली जातात. कदाचित याचं एक कारण असंही असू शकतं की विड्याच्या पानांचे कित्येक आरोग्यदायी फायदे असून ते तब्येतीसाठी तसेच सौंदर्य खुलविण्यासाठीही खूप उपयुक्त ठरतं (amazing health benefits of eating betel leaf). ते फायदे नेमके कोणते ते पाहूया..(proper method of eating betel leaf)
विड्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे
१. विड्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी विड्याचं पान नियमितपणे खाणं उपयोगी ठरतं.
२. विड्याच्या पानांमध्ये असणारं पॉलीफिनॉल दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं.
चहा, कॉफी आणि लिंबूपाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? कोणत्या वेळी काय प्यावं, वाचा खास माहिती
३. याशिवाय विड्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्सही असतात, शिवाय त्यामध्ये ॲण्टीबॅक्टेरियल घटकही भरपूर प्रमाणात असतात.
४. सर्दी, खोकला, कफ असा त्रास कमी करण्यासाठीही लवंग, चुना, कात घालून विड्याचं पान खाणं फायदेशीर ठरतं.
५. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठीही विड्याचं पान उपयुक्त ठरतं. विड्याच्या पानांचा रस डोक्यावर चोळल्यानेही डोकेदुखी कमी होते.
विड्याचं पान खाण्याची योग्य पद्धत
१. पारंपरिक पद्धतीने विडा करून खाणे ही विड्याचं पान खाण्याची सगळ्यात उत्तम पद्धत आहे. विडा करताना आपण त्यामध्ये कात, चुना, बडिशेप, लवंग, वेलची, ज्येष्ठमध असे अनेक पदार्थ घालतो. त्यामुळे त्याची पौष्टिकता जास्त वाढते.
तेल न लावताही केस लगेचच ऑईली होतात? वाचा कारण- केस देतात बिघडलेल्या तब्येतीविषयी संकेत
२. जर सर्दी खूप जास्त प्रमाणात झाली असेल तर थोडासा अस्मानतारा घालून विड्याचं पान खाणं फायदेशीर ठरतं. किंवा मग मध आणि विड्याचं पान एकत्र करून खाल्ल्यानेही सर्दी कमी होते.
३. रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यामध्ये १ विड्याचं पान भिजत घाला. दुसऱ्यादिवशी सकाळी ते पान काढून पाणी पिऊन टाका. असं केल्याने पचनक्रिया सुधारते. जॉईंट पेनचा त्रासही कमी होतो असं म्हणतात.