वयवर्षे ३३ आणि एका गोंडस मुलीची आई...पण आलिया भटला पाहिलं की आजही ती एखाद्या विशीतल्या नवख्या अभिनेत्रीइतकीच फ्रेश आणि फिट दिसते. आई झाल्यानंतरही आलिया आजही तितकीच स्लिम, फिट आणि एनर्जेटिक दिसते. रेड कार्पेट असो, चित्रपट असो किंवा एखादा कॅज्युअल लूक - तिच्या फिटनेस आणि ग्लोइंग स्किनची चर्चा नेहमीच होते. डिलिव्हरी नंतर इतक्या कमी वेळात आलियाने स्वतःला ज्या प्रकारे पुन्हा 'शेप'मध्ये आणलं, ते पाहून अनेकजणींना त्याचं आश्चर्यच वाटतं. पण हे केवळ नशिबाने झालं नाही, तर यामागे तिची प्रचंड मेहनत आणि शिस्तबद्ध लाईफस्टाईल आहे(alia Bhatt weight loss & fitness secret).
मातृत्वाची जबाबदारी सांभाळूनही आलिया भट इतकी स्लिम-ट्रिम कशी? सोशल मिडीयावर सध्या तिच्या फिटनेसचीच चर्चा आहे. अनेकांना वाटतं की आलिया फक्त महागडे फॅन्सी डाएट, जिम असं सगळं करत असेल...पण तिचं खरं सिक्रेट तिच्या रोजच्या जेवणात आणि घरगुती वर्कआऊटमध्ये लपलं आहे. आई झाल्यानंतरही तिने स्वतःचा फिटनेस ज्या पद्धतीने कायम ठेवला आहे, त्यामुळे अनेक महिला तिच्या फिटनेस सिक्रेटबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. 'राहा'ची आई झाल्यानंतरही आलियाचा ग्लो आणि तिचा फिटनेस लेव्हल कोणत्याही तरुण अभिनेत्रीला टक्कर देणाराच आहे. वर्कआऊटपासून ते डाएटपर्यंत आलियाने असे कोणते बदल केले ज्यामुळे आलिया इतकी सुंदर आणि फिट दिसते...ती दिवसभरात काय खाते? वजन संतुलित ठेवण्यासाठी कोणता व्यायाम करते? आणि व्यस्त (Alia Bhatt post pregnancy fitness) शेड्यूलमध्येही स्वतःला फिट ठेवण्यामागचं तिचं सिक्रेट नेमकं काय आहे? पाहूयात आलिया भटचा फिटनेस मंत्र...
'असं' ठेवते आलिया भट स्वतःला फिट...
१. आलियाला साधे भारतीय घरगुती जेवणच जास्त आवडते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिला खूप जास्त सॅलॅड खाण्याची फारशी आवड नाही. तिच्या रोजच्या आहारात प्रामुख्याने वरण, भात आणि पालेभाज्यांचा समावेश असतो.
२. आलिया साध्या गव्हाच्या पोळीऐवजी अधिक आरोग्यदायी पर्याय निवडते. ती कधी नाचणीची भाकरी तर कधी ज्वारीच्या भाकरी खाणं पसंत करते. यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात आणि वजन संतुलित राखण्यास मोठी मदत होते.
कच्चा कांदा आरोग्यासाठी 'वरदान' की आजारांना 'आमंत्रण'? रिसर्च सांगतो कुणी खावा कुणी टाळावा...
३. आलियाच्या डाएटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती साखरेपासून पूर्णपणे लांब राहते. तिच्या मते, जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यास आरोग्य आणि फिटनेस या दोन्हीसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.
४. आलिया भट हिने गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःला 'क्लीन ईटिंग'ची म्हणजेच स्वच्छ आणि पोषणयुक्त आहार घेण्याची सवय स्वतःला लावून घेतली आहे. तिच्या आहारात प्रामुख्याने हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. या प्रकारच्या डाएटमध्ये ताजी फळे, भाज्या, हलके कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर यांचा उत्तम समतोल राखला जातो. शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहावी, यासाठी ती सकाळी फायबर आणि प्रथिनांनी युक्त नाश्ता घेण्याला पसंती देते. 'क्लीन ईटिंग'चा अर्थ केवळ कमी खाणे असा नसून, शरीराला फायदेशीर ठरेल आणि सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळतील असा आहार घेणे हा आहे.
रणरणत्या उन्हातही घर राहील थंडगार पाहा १० टिप्स - वीजबील येईल कमी, घर राहील ठंडाठंडा - कूलकूल...
५. अनेकांना वाटते की फिट राहण्यासाठी गोड खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे, पण आलियाचा विचार थोडा वेगळा आहे. ती गोड पदार्थ पूर्णपणे सोडण्याऐवजी ते मर्यादित प्रमाणात खाण्यावर भर देते. तिच्या आहारात 'लो-कार्ब' आणि कमी कॅलरीज असलेल्या डेझर्ट्सचा (गोड पदार्थ) समावेश असतो. हे पदार्थ चवीलाही उत्तम असतात आणि आरोग्यावरही त्यांचा विपरीत परिणाम होत नाही. यामुळे गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होते आणि फिटनेसमध्ये अडथळाही येत नाही.
६. आलिया वेळोवेळी शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर काढण्यासाठी 'डिटॉक्स ज्यूस' पिणं अधिक पसंत करते. यामध्ये ती काही दिवस फक्त फळांचा आणि भाज्यांचा ताजा रस पिण्यावर भर देते. या ज्युसमध्ये असणारी पोषक तत्वे शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करतात, ज्यामुळे शरीर हलके आणि ताजेतवाने वाटते.
मुलगी 'राहा'च्या जन्मानंतर आलियाचे वजन थोडे वाढले होते. मात्र, वजन कमी करण्यासाठी तिने कोणताही कडक डाएट फॉलो केला नाही. तिने केवळ घरगुती पौष्टिक जेवण आणि शिस्तबद्ध लाईफस्टाईलवर लक्ष केंद्रित केले. तसेच, 'ब्रेस्टफीडिंग'मुळे शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास नैसर्गिकरित्या मदत झाली, ज्यामुळे तिचे वजन हळूहळू कमी होत गेले. अवघ्या ३ महिन्यांत आलियाने सुमारे १६ किलो वजन कमी केले. स्वतःला उपाशी न ठेवता, केवळ योग्य आहार आणि निरोगी सवयींच्या जोडीने फिट राहता येते, याचे आलिया भट हे उत्तम उदाहरण आहे.
