Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट खूपच सुटलंय? चपाती बनेल फॅट कटर; कणकेत 'हा' पदार्थ मिसळून करा-भराभर घटेल चरबी

पोट खूपच सुटलंय? चपाती बनेल फॅट कटर; कणकेत 'हा' पदार्थ मिसळून करा-भराभर घटेल चरबी

Add This Items While Kneading The Dough For Weight Loss : वजन कमी करण्याासाठी फक्त पोळीतील बदल पुरेसा नाही. त्यासोबतच योग्य आहार आणि नियमित व्यायामही महत्त्वाचा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 21:22 IST2025-08-18T21:02:58+5:302025-08-18T21:22:25+5:30

Add This Items While Kneading The Dough For Weight Loss : वजन कमी करण्याासाठी फक्त पोळीतील बदल पुरेसा नाही. त्यासोबतच योग्य आहार आणि नियमित व्यायामही महत्त्वाचा आहे.

Add This Items While Kneading The Dough Fiber Protein Will Increase For Weight Loss | पोट खूपच सुटलंय? चपाती बनेल फॅट कटर; कणकेत 'हा' पदार्थ मिसळून करा-भराभर घटेल चरबी

पोट खूपच सुटलंय? चपाती बनेल फॅट कटर; कणकेत 'हा' पदार्थ मिसळून करा-भराभर घटेल चरबी

तुम्ही रोज खात असलेली पोळी अधिक पौष्टिक बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यास मदत करण्यासाठी काही सोप्या गोष्टी पिठात मिसळता येतात.ज्यामुळे तुमच्या रोजच्या जेवणात आरोग्यवर्धक बदल घडून येईल. वजन कमी करण्यासाठी चपाती खाऊ नका असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल पण चपाती रोज खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. कसं ते समजून घेऊ. (Add This Items While Kneading The Dough Fiber Protein Will Increase For Weight Loss)

पिठात काय मिसळावे?

पोळीचं पीठ मळताना त्यात फक्त गव्हाचं पीठ न घेता, त्यात इतर धान्यं आणि प्रथिनंयुक्त पदार्थ मिसळा. असं केल्याने पोळीतील फायबर (तंतूमय पदार्थ) आणि प्रथिनांचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे ती पचायला हलकी होते आणि पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. यामुळे भूक कमी लागते आणि आपोआपच वजन कमी व्हायला मदत होते. (Ref)  चपाती करताना  काही पदार्थांचा वापर केल्यास अधिक पौष्टीक होण्यास मदत होईल आणि लगेच पचेल.

चपातीला पौष्टिक कसं बनवायचं?

जवस

जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पिठात एक ते दोन चमचे जवसाची पूड मिसळल्यास पोळी अधिक आरोग्यदायी बनते.

नाचणी

नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतं. गव्हाच्या पिठात थोडं नाचणीचं पीठ मिसळल्याने पोळीची पौष्टिकता वाढते.

चणे

भाजलेल्या चण्याचं पीठ (सत्तू) गव्हाच्या पिठात मिसळल्यास प्रथिनांचं प्रमाण वाढतं, जे स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक असतं.

ओट्स

ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचा फायबरचा प्रकार असतो, जो कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. ओट्सची पूड पिठात मिसळून पोळी बनवता येते.

मेथीची पाने

ताजी मेथी बारीक चिरून पिठात मिसळल्यास पोळीला एक वेगळाच स्वाद येतो आणि ती फायबरने परिपूर्ण होते.

'या' पोळ्यांचे फायदे काय आहेत?

अशा मिश्र पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने फक्त वजन कमी होत नाही, तर इतरही अनेक फायदे होतात.पचन सुधारते कारण फायबर जास्त असल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. पोट भरलेलं राहतं प्रथिनांमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा होत नाही. रक्तातील साखर नियंत्रित राहते: या पोळ्यांमुळे रक्तातील साखर हळू-हळू शोषली जाते, ज्यामुळे मधुमेहींसाठी त्या फायदेशीर ठरतात.

मोदक फाटतात-कडक होतात? उकड काढताना 3 गोष्टी करा, सुबक-मऊसूत, कळीदार होतील

वजन कमी करण्याासाठी फक्त पोळीतील बदल पुरेसा नाही. त्यासोबतच योग्य आहार आणि नियमित व्यायामही महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमच्या आहारात कोणताही मोठा बदल करायचा असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Web Title: Add This Items While Kneading The Dough Fiber Protein Will Increase For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.