Join us  

पोह्यांवर लिंबू का पिळावं? बघा शास्त्रीय कारण- कोणते पदार्थ कशासोबत खावे याचे सुपर कॉम्बिनेशन्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 9:09 AM

5 Super Healthy Food Combinations: पोह्यांवर लिंबू पिळून खाण्याचे जसे अनेक फायदे आहेत, तसंच कोणते पदार्थ कशासोबत खाणं आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतं ते पाहा... 

ठळक मुद्देअसेच सुपरहेल्दी फूड कॉम्बिनेशन्स कोणकोणते आहेत ते पाहूया....

गरमागरम वाफाळते पोहे हा अनेक जणांचा आवडीचा नाश्ता. मराठी घरांमध्ये तर आठवड्यातून किमान एकदा तरी पोहे होतच असतील. गरमागरम पोहे म्हटलं की त्याच्यासोबत आठवते ती लिंबाची फोड. पोह्यांवर लिंबू पिळून खाल्लं की त्याची चव कशी आणखी खुलते. पण केवळ चव अधिक छान व्हावी, म्हणून पोह्यांवर लिंबू पिळत नाहीत. पोह्यांवर लिंबू पिळून खाल्ल्याने ते अधिक आरोग्यदायी होतात. पोह्यांमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असतं. जेव्हा आपण पोहे लिंबू पिळून खातो, तेव्हा पोह्यांमधील लोह शरीरात शोषून घेण्यासाठी लिंबामधलं व्हिटॅमिन सी मदत करतं आणि पोहे सुपरहेल्दी होतात (5 Super healthy food combinations). असेच सुपरहेल्दी फूड कॉम्बिनेशन्स कोणकोणते आहेत ते पाहूया.... (How to make food more healthy?)

 

कोणता पदार्थ कशासोबत खावा?

कोणता पदार्थ कशासोबत खाल्ल्याने तो आणखी पौष्टिक होतो, याविषयीचा एक व्हिडिओ dt.shwetashahpanchal या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

केस पांढरे झाले, खूप गळतात- वाढही खुंटली? केसांच्या सगळ्या समस्या सोडविणारा १ खास उपाय

१. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की योगर्ट आणि ड्रायफ्रुट्स हे नेहमी एकत्र करून खावेत. कारण योगर्टमधून आपल्याला प्रोटिन्स मिळतात तर फॅट्स आणि फायबर सुकामेव्यातून मिळते. त्यामुळे ते नाश्त्यासाठी एक कम्प्लिट फूड ठरते.

मूग, मटकी, चवळीला लवकर भुंगा लागतो- किडे होतात? १ सोपा उपाय- कडधान्य चांगलं टिकेल 

२. ग्रीन टी पिणार असाल तर त्यात नेहमी लिंबू पिळूनच घ्या. कारण ग्रीन टीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. आणि आपण जेव्हा त्यात लिंबू पिळतो, तेव्हा लिंबामधील व्हिटॅमिन सी ते ॲण्टीऑक्सिडंट्स शरीरात शोषून घेण्यासाठी मदत करतात.

 

३. हळदीमध्ये करक्युमिन नावाचे कम्पाउंड असते. जेव्हा त्याला मिऱ्यांमध्ये असणाऱ्या पेपरिन या कम्पाउंडची जोड मिळते, तेव्हा ते ॲक्टिव्ह होते. त्यामुळे हळद नेहमी काळ्या मिऱ्यांसोबत खावी किंवा तुपासोबत खावी.

पुन्हा एकदा "हम आपके है कौन"ची 'निशा' बनून आली माधुरी दीक्षित, कारण होतं खास...

४. चौथं सुपरहेल्दी कॉम्बिनेशन म्हणजे वरण भात. डाळींमध्ये लायसिन नावाचा घटक असतो. आणि भातामध्ये सल्फरयुक्त अमिनो ॲसिड असतं. हे दोन्ही घटक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ते प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत बनतात. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजना