lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > केस पांढरे झाले, खूप गळतात- वाढही खुंटली? केसांच्या सगळ्या समस्या सोडविणारा १ खास उपाय

केस पांढरे झाले, खूप गळतात- वाढही खुंटली? केसांच्या सगळ्या समस्या सोडविणारा १ खास उपाय

Homemade Oil For Hair Problems: पांढऱ्या केसांचं टेन्शन विसरा, केस वाढतील झटपट आणि गळणंही होईल बंद... त्यासाठी करून बघा हा एक खास घरगुती उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2024 02:14 PM2024-02-27T14:14:09+5:302024-02-27T14:14:52+5:30

Homemade Oil For Hair Problems: पांढऱ्या केसांचं टेन्शन विसरा, केस वाढतील झटपट आणि गळणंही होईल बंद... त्यासाठी करून बघा हा एक खास घरगुती उपाय.

How to make bhringraj oil at home, just 1 solution for all hair problems like hair fall, gray or white hair and dandruff | केस पांढरे झाले, खूप गळतात- वाढही खुंटली? केसांच्या सगळ्या समस्या सोडविणारा १ खास उपाय

केस पांढरे झाले, खूप गळतात- वाढही खुंटली? केसांच्या सगळ्या समस्या सोडविणारा १ खास उपाय

Highlights या तेलाने आठवड्यातून २ वेळा डोक्याला मालिश करा. केसांच्या बाबतीतल्या सगळ्याच समस्या कमी होतील.  

हल्ली प्रत्येकाच्याच केसांच्या समस्या खूप वाढल्या आहेत. काही जणांचे केस कमी वयात पांढरे होत आहेत, तर काही जणांच्या केसांची वाढच खुंटली आहे. केस गळणे, डोक्यामध्ये कोंडा होणे हा त्रासही अनेकांना आहेच. केसांच्या या सगळ्या समस्या सोडवायच्या असतील तर हा एक घरगुती उपाय करून पाहा. यामध्ये आपण केसांसाठी भृंगराज तेल कसं तयार करायचं ते पाहणार आहोत (How to make bhringraj oil at home). तेल तयार करण्याची ही पद्धत अतिशय सोपी असून या तेलाच्या नियमित वापरामुळे केसांच्या सगळ्याच समस्या कमी होण्यास मदत होईल. (just 1 solution for all hair problems like hair fall, gray or white hair and dandruff)

 

भृंगराज तेल घरी तयार करण्याची पद्धत

भृंगराज तेल घरी कसं तयार करायचं याची पद्धत mucherla.aruna या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला भृंगराज वनस्पतीची पानं साधारणपणे २ वाट्या, कढीपत्त्याची पानं साधारणपणे अर्धी वाटी एवढी लागणार आहेत. 

लग्नसराईसाठी १ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या सुंदर- डिझायनर घागरा, बघा ३ स्टायलिश पर्याय

त्याशिवाय १ वाटी खोबरेल तेल, २ वाट्या तिळाचं तेल, पाव वाटी कॅस्टर ऑईल, १ टेबलस्पून कलौंजीची पेस्ट असं सगळं साहित्य लागणार आहे.

सगळ्यात आधी तर भृंगराजची पानं आणि कढीपत्त्याची पानं खलबत्त्यात टाकून कुटून घ्या किंवा मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करून घ्या. तसेच कलौंजीचीही वेगळी पेस्ट करून घ्या.

 

यानंतर कढईमध्ये खोबरेल तेल आणि तिळाचं तेल टाकून गरम करायला ठेवा. तेल थोडं गरम झालं की त्यात कढीपत्त्याची पानांची आणि भृंगराजच्या पानांची पेस्ट तसेच कलौंजीची पावडर टाका. 

फक्त ५ पदार्थ खा- वय झालं तरी त्वचा सुरकुतणार नाही, त्वचेवरची चमक वाढतच जाईल

या तेलाला २ ते ३ चांगल्या उकळ्या आल्या की गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. तेल जेव्हा थोडं कोमट असेल तेव्हा त्यात कॅस्टर ऑईल टाका आणि सगळं तेल पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्या.

थंड झाल्यावर हे ते काचेच्या बरणीत भरा आणि २ दिवस उन्हामध्ये ठेवा. त्यानंतर या तेलाने आठवड्यातून २ वेळा डोक्याला मालिश करा. केसांच्या बाबतीतल्या सगळ्याच समस्या कमी होतील.  


 

Web Title: How to make bhringraj oil at home, just 1 solution for all hair problems like hair fall, gray or white hair and dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.