Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > महिलांनी प्यायलाच हवे असे ४ ज्यूस, तब्येतीच्या सगळ्या तक्रारी राहतील कायम दूर

महिलांनी प्यायलाच हवे असे ४ ज्यूस, तब्येतीच्या सगळ्या तक्रारी राहतील कायम दूर

4 juices that women must drink : रोज एक ज्यूस प्या आणि शरीर सुदृढ ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2025 15:43 IST2025-01-19T15:41:06+5:302025-01-19T15:43:27+5:30

4 juices that women must drink : रोज एक ज्यूस प्या आणि शरीर सुदृढ ठेवा.

4 juices that women must drink | महिलांनी प्यायलाच हवे असे ४ ज्यूस, तब्येतीच्या सगळ्या तक्रारी राहतील कायम दूर

महिलांनी प्यायलाच हवे असे ४ ज्यूस, तब्येतीच्या सगळ्या तक्रारी राहतील कायम दूर

धावपळीच्या जीवनात रोज शरीरासाठी वेळ काढणे कठीण झाले आहे. शरीराला गरजेची असणारी जीवनसत्वे शरीराला मिळत नाहीत. खास करून महिला स्वत:च्या आहाराकडे व स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात.(4 juices that women must drink) घाईगडबड असली तरी शरीराला पोषण देणे महत्त्वाचे असते. अशा वेळी एखादा ज्यूस तयार करणे फार सोपे पडते. असे काही द्रव्य पदार्थ आहेत. जे शरीरासाठी पौष्टिक ठरतील. (4 juices that women must drink) तयार करा आणि पिऊन बघा.     

कोहळ्याचा ज्यूस
कोहळ्याचे फायदे बऱ्याच जणांना माहिती नाहीत. कोहळ्यात सी,बी१, बी३, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त आधी गुणधर्म असतात. कोहळे खाल्याने आजार दूर होतात. कोहळ शरीराला हायड्रेटेड ठेवते.(4 juices that women must drink) शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहण्यास मदत होते. याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वजन कमी करण्यासाठीही कोहळे चांगले.

काकडी पालक ज्यूस
काकडी व पालक यांच्या मिश्रणातून तयार केलेला ज्यूस महिलांसाठी फार पौष्टिक आहे. चेहर्‍यावरील मुरूम, पाळीच्या दिवसात येणारे पिंपल्स, आदींवरील रामबाण उपाय म्हणजे हा रस. चेहर्‍यावर असलेले सर्व प्रकारचे डाग या ज्यूसने नाहीसे होतील. केसांसाठी हा ज्यूस फार चांगला. पोटाच्या समस्या अगदी निघून जातील. काकडी पोटाला थंडावा पुरवते. ज्याने जळजळ कमी होते. पालकामुळे पचन व्यवस्था सुरळीत होते.   

बीट गाजर
डोळ्यांसाठी गाजर फार चांगले. डोळ्यांचे लहान-सहान त्रास याने दूर होतील. बीट व गाजर हृदयासाठी उपयुक्त आहे. हृदयाचे कार्य नियमित करण्यात हा ज्यूस मदत करतो. जर नियमित याचे सेवन केले तर, शरीरातील स्फूर्तता वाढते. शरीराची ताकद वाढते. म्हणून डॉक्टर रुग्णांना हा ज्यूस प्यायला सांगतात. रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यातही मदत होते. रक्ताचे प्रमाणदेखील वाढते.

नारळ पाणी   
नारळ पाणी पोट भरलेले ठेवण्यास मदत करते. शरीर डिहायड्रेटेड होत नाही. वजन कमी होते. हृदयासाठी नारळ पाणी उपयुक्त असते. त्वचा व केस चांगले राहतात. किडनीचे आरोग्य चांगले राहते. रक्तातील साखरदेखील नियंत्रित राहते. व्यायामानंतर अनेक जण नारळ पाणी पितात. नारळ पाणी थकवा दूर करते. मन प्रसन्न करते. पचन क्षमता नारळ पाण्याने चांगली राहते. 

Web Title: 4 juices that women must drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.