Join us  

कमी वेळात बारीक व्हायचं? न चुकता '४' प्रकारचे पदार्थ नाश्त्याला खा; ढेरी घटेल - दिसाल फिट सुडौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2024 5:43 PM

4 Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight : पोटाचे टायर्स- वजन वाढतच असेल तर, नाश्त्यामध्ये काही बदल करून पाहा

चुकीच्या जीवनशैलीचा फटका सध्या सर्वांनाच बसत आहे (Weight Loss). वाढतं वजन, बॅड कोलेस्टेरॉल, मधुमेह, यासह गंभीर आजारांचा धोका वाढतो आहे. यामुळे तर हमखास वजन वाढते (Health Tips). वजन वाढलं की, आपलं शरीर गंभीर आजारांना आमंत्रण देते. त्यामुळे लोक वजन कमी करण्यास सुरुवात करतात (Fitness). वजन फक्त वर्कआउटवर नसून, डाएटवर देखील अवलंबून आहे. ज्यात सकाळचा नाश्ता अत्यंत महत्वाचं आहे.

सकाळचा नाश्ता हा सर्वात महत्त्वाचा आहार असल्याचे म्हटले जाते. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. नाश्त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे. जर आपल्याला टेस्टी आणि ज्याने वजन कमी होईल असे पदार्थ खायचे असतील तर, या '४' प्रकारचे वेट लॉस नाश्ता खा. वजन नक्कीच घटेल(4 Healthy Breakfast Foods That Help You Lose Weight).

कमी कॅलरीज असणारे ४ पदार्थ(Nashta For Weight Loss)

ढोकळा

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, 'काही लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता सोडून देतात. पण असं न करता आपण हेल्दी पदार्थ खाऊ शकता. ढोकळा हा नाश्ता ब्रेकफास्टसाठी उत्तम मानला जातो. ढोकळा हे वाफवलेले आणि आंबवलेले अन्न आहे जे पचन सुधारते आणि आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते. मुख्य म्हणजे चयापचय वाढवते. ज्यामुळे वजन कमी होते.

रोज खा व्हिटॅमिन ई असलेले ४ पदार्थ; हाडं- केस आणि त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो-आरोग्यही सुधारेल..

मूग डाळ डोसा

प्रोटीनयुक्त मूग डाळ चिला प्रत्येक ऋतूसाठी उत्तम आहे. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, आपण सकाळी मूग डाळ डोसा खाऊ शकता. नाश्त्याला मूग डाळ डोसा खाल्ल्याने आपल्याला दीर्घकाळ उर्जा मिळेल. शिवाय लवकर भूक लागत नाही.

भाजलेला चणा डाळ

भाजलेले हरभरे खाल्ल्याने आपल्याला आहारातील फायबर आणि प्रथिने मिळतात. हरभरा भूक शमवते. शिवाय वारंवार लागणारी भूक टळते.

बाई ग..खरेच नाकी नऊ आले! नोज पिन गेली नाकातून फुप्फुसात, ऑपरेशन करताना डॉक्टरही घाबरले आणि...

भेळपुरी

सायंकाळच्या नाश्त्यामध्ये आपण भेळपुरी खाऊ शकता. यात कुरमुरे, चणाडाळ, शेंगदाणे, आणि कांदा-टोमॅटो यांसारख्या आरोग्यदायी भाज्यांचा समावेश आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स आढळतात आणि खनिजे व इतर पौष्टीक घटक आढळतात. संध्याकाळचा नाश्ता असो किंवा दुपारच्या जेवणाआधी आपण भेळपुरी खाऊ शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स