Join us  

गॅसचा वापर न करता करा ३ वेट लॉस टेस्टी स्नॅक्स डिशेस; पोट होईल सपाट-शरीर दिसेल सुडौल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2024 5:46 PM

3 Healthy Snacks Recipe for Weight Loss, Without using Gas : चमचमीत खाऊनही वजन घटेल, पाहा झटपट बनणारे ३ हेल्दी स्नॅक्स डिशेस..वेट लॉस करणं झालं चविष्ट

तुम्हाला वजन कमी करायचं आहे का? पण व्यायाम करण्यास वेळ आणि डाएट करण्यात अडचण येतात का? काही केल्या तोंडाचा ताबा सुटतो का? बऱ्याचदा आपण वजन कमी करण्यासाठी व्यायाम व्यवस्थित करतो, पण डाएटकडे पुरेपूर लक्ष केंद्रित करण्यात अडचण निर्माण होते (Weight Loss Snacks). आवडते पदार्थ दिसताच आपण तो पदार्थ दाबून खातो. ज्यामुळे केलेला व्यायाम आणि वजन कमी करण्याचं ध्येय भंग होते (Fitness).

खरंतर काहींना चटपटीत खाल्ल्याशिवाय जमतच नाही. ज्यामुळे वेट लॉस करण्यात अडचण निर्माण होते (Weight Loss Dish). जर आपल्याला चटपटीत पण हेल्दी पदार्थ खाऊन वेट लॉस करायचं असेल तर, ३ पदार्थ न चुकता खा. विशेष म्हणजे हे पदार्थ गॅसचा वापर न करता तयार होतात. शिवाय काही मिनिटात तयार होतात(3 Healthy Snacks Recipe for Weight Loss, Without using Gas).

स्प्राउट्स सॅलॅड

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण नाश्त्यामध्ये स्प्राउट्स सॅलॅड खाऊ शकता. आपण यात मोड आलेले मूग, मेथी, मटकी, हरभरा, टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, मीठ, मसाले आणि शेंगदाण्यांचा वापर करून चटपटीत स्प्राउट्स सॅलॅड तयार करू शकता. खरंतर स्प्राउट्समध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट गच्च भरते, ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

रात्री 'या ' वेळी जेवण केले तर वजन घटणारच, वजन कमी करायचे तर पाहा जेवायची वेळ

ताक

ताक प्यायल्याने वजन लवकर कमी होण्यास मदत होते. ताकामध्ये काळे मीठ घालून प्यायल्याने चयापचय गती वाढते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी झपाट्याने कमी होते. विशेष म्हणजे ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. जे आरोग्यासाठी पुरेपूर फायदेशीर ठरतात.

जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे

पपई चिया सीड्स शेक

पपई चिया सीड्स शेक प्यायल्याने पोटातील चयापचय क्रिया गतिमान होतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. पपई पाचक एन्झाईम्सला प्रोत्साहन देतात. तर, चिया सीड्स आपल्या पचन क्रियांना गती देतात. दोन्ही गोष्टी एकत्र करून प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत करतात. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स