वाढलेलं वजन कमी करणे म्हणजे अनेकांसाठी मोठे अवघड कठीण काम वाटते. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी बहुतेकदा आपण सर्वातआधी आपल्या आवडीचे पदार्थ खाणेच सोडून देतो. याचबरोबर, गोडधोड तसेच हाय कॅलरीज किंवा फॅट्सचे प्रमाण जास्त असलेलेच पदार्थ आपण खाणे टाळतो. आपल्यापैकी अनेकांसाठी डाएटींग किंवा आहारावर नियंत्रण ठेवणे म्हणजे, आवडते पदार्थ खाणे पूर्णपणे बंदच करणे असेच असते. परिणामी, काही दिवसांनी भूक आणि तो आवडीचा पदार्थ खाण्याचा मोह वाढतो आणि आपण आपला डाएटिंगचा विचार सोडून देतो(3 bite rule diet lose weight while eating favorite foods enjoy food without sacrifice).
वेटलॉस करताना, आपल्या आवडीचे पदार्थ खाणे टाळणे आणि रोज तेच तेच जेवण करणे जे काही कालांतराने खूप कंटाळवाणे आणि बेचव वाटू लागते. पण आता तुम्हाला तुमच्या जीभेचे लाड पुरवण्यासाठी आणि वजन देखील नियंत्रणात ठेवण्यासाठी आवडते पदार्थ खाणे सोडण्याची गरज नाही. यासाठी 'थ्री बाईट रुल' (The Three Bite Rule) ही एक अशी स्मार्ट युक्ती आहे, जी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ पूर्णपणे खाणे सोडण्याऐवजी, त्या पदार्थांचे फक्त तीनच घास खाण्याचा सोपा नियम शिकवते. वेटलॉस करण्यासाठी 'थ्री बाईट रुल' म्हणजे नेमकं काय आणि त्याचा फायदा कसा होतो ते पाहा...
'थ्री बाइट रूल' (Three Bite Rule) म्हणजे नेमका काय ?
'थ्री बाइट रूल' हा वेटलॉस करण्याचा एक असा उपाय आहे ज्यात आपण आवडते पदार्थ खाऊन, मन न मारता त्यांचा आनंद घेत खाऊ शकतो आणि वेटलॉस देखील करु शकतो. हा नियम विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना मिठाई, पेस्ट्री, बर्गर किंवा चिप्स यांसारखे पदार्थ खायला आवडतात. या नियमानुसार, तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ फक्त तीनच घास खाल्ले पाहिजे. तीन घास खाल्ल्याने तुम्हाला त्या पदार्थाची चव चाखता येते आणि तुमची खाण्याची तीव्र इच्छा पूर्ण होते.
चाळिशीनंतर वजन कमी करायचय? मग न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ पदार्थ नाश्त्यात हवेच - वेटलॉस होईल झरझर...
फक्त तीन घास खाल्ल्यामुळे जास्त कॅलरीज देखील इनटेक होत नाहीत, यामुळे तुमचे मन मारले जात नाही किंवा मूड खराब होत नाही, कारण तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ सोडण्याची गरज पडत नाही. तुम्ही तुमच्या आवडत्या पदार्थाची चव घेऊन तीन घासांवर थांबता, ज्यामुळे ओव्हरइटिंग होत नाही. थोडक्यात, हा रुल तुम्हाला तुमच्या आवडीच्या पदार्थांचा आनंद घेण्याची आणि त्याचवेळी वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
थ्री बाईट रुलचे कमालीचे फायदे...
Journal of Medical Internet Research यांनी केलेल्या वेगवेगळ्या संशोधनांमध्ये असे दिसून आले की, आपल्या जिभेवरील टेस्ट बड्स हे सुरुवातीच्या तीन - चार घासांमध्येच सर्वाधिक अॅक्टिव्ह होतात, ज्यामुळे आपल्याला अधिक चांगले वाटते. मिठाई, चॉकलेट्स, कोल्ड्रिंक्स, बर्गर यांसारखे हाय कॅलरीयुक्त खाद्यपदार्थ खूप लवकर कॅलरीज वाढवतात. परंतु, जर तुम्ही फक्त थ्री बाईट रुल फॉर्म्युला वापरला, तर आपल्या शरीरात जास्त कॅलरीज जात नाहीत आणि वजनही वाढत नाही. हा नियम आपली खाण्याची इच्छा पूर्ण करतो आणि त्याचवेळी कॅलरीज नियंत्रणात ठेवतो.
हिवाळ्यात आहारात हवेच असे ६ फूड - कॉम्बिनेशन! कडाक्याच्या थंडीतही राहाल हेल्दी, ठणठणीत...
जर तुम्हाला बर्गर खाण्याची खूप इच्छा झाली असेल, तर तुम्ही संपूर्ण बर्गर खाण्याऐवजी फक्त तीन घास खाऊन थांबा. यामुळे तुम्हाला बर्गरची चवही मिळेल आणि तुमची बर्गर खाण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. हे तीन घास तुम्ही खूप चावून - चावून, चघळून खाणे महत्त्वाचे असते. असे केल्याने कॅलरीज नियंत्रित राहण्यास मदत होते.
Web Summary : The 'Three Bite Rule' allows enjoying favorite foods in moderation, aiding weight control. Eat just three bites of cravings to satisfy desires without overeating. This method helps manage calories and prevents strict dieting, promoting a balanced approach to weight loss.
Web Summary : 'थ्री बाइट रूल' पसंदीदा भोजन का умеренно आनंद लेने की अनुमति देता है, जिससे वजन नियंत्रण में मदद मिलती है। लालसा को संतुष्ट करने के लिए केवल तीन बाइट्स खाएं बिना अधिक खाए। यह विधि कैलोरी का प्रबंधन करने और सख्त आहार को रोकने में मदद करती है, वजन घटाने के लिए एक संतुलित दृष्टिकोण को बढ़ावा देती है।