भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल लग्नबंधनात अडकणार होते. पण काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. खरंतर लग्न हा फक्त एक कार्यक्रम नसतो. दोन मनांचा, दोन घरांचा, परंपरा आणि संस्कृतींचा मिलाफ.(Smriti Mandhana wedding news) लग्न ठरल्यानंतर हॉलची बुकिंग, कपडे, दागिने, आमंत्रण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण ऐन लग्नाच्या वेळी काही गडबड झाली आणि लग्न थांबलं तर असा प्रश्न कायमच अनेकांच्या मनात येतो.(Palash Muchhal wedding postponed) असंच काहीस स्मृती आणि पलाशसोबत झालं असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.(wedding insurance India) आनंदाच्या वातावरणात अचानक लग्न पुढे ढकलण्यात आलं आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.
लग्न पुढे ढकललं पण आधी झालेल्या खर्चाचं काय? असा प्रश्न आपल्या मनात आलाच असावा. पण यानंतर एक चर्चेत आलेली गोष्ट म्हणजे वेडिंग इन्श्युरन्सची. आतापर्यंत आपण भूकंप, आग, अपघात या इन्श्युरन्स बदल कायमच ऐकत आलो आहोत. सध्या देशभरात लग्नसराईची धूम सुरु आहे. आपलं लग्न सर्वांच्या लक्षात राहावं असं प्रत्येकाला वाटतं. साखरपुडा, मेहेंदी, संगीत ते विवाह सोहळा.. आजकाल सगळं आधीच प्लान केलं जातं. ज्यासाठी भरपूर पैसे देखील आपल्याला मोजावे लागतात. पण ऐनवेळी गडबड झाली तर पैसे पाण्यात जाणार नाही ना? अशी चिंता प्रत्येकाला सतावत असते. अशातच स्मृती आणि पलाशचे लग्न पुढे ढकल्यामुळे वेडिंग इन्श्युरन्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. पण वेडिंग इन्श्युरन्स म्हणजे काय? हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. याविषयी जाणून घेऊया.
हल्ली लग्नसमारंभात लाखो रुपयांचा खर्च केला जातो. पण लग्नात कोणत्याही अनपेक्षित कारणांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी लग्न विमा देखील खूप महत्त्वाचा आहे. हे एक प्रकारचं आर्थिक सुरक्षा कवच. जे लग्न समारंभ पुढे ढकलणे किंवा इतर कोणत्याही व्यत्ययामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून आपलं संरक्षण करते. तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमुळे होणारे नुकसान देखील यात कव्हर केले जाते.
यामध्ये अचानक लग्न समारंभ रद्द होणे, मालमत्तेचे नुकसान किंवा लग्न समारंभाशी संबंधित दुखापत किंवा मृत्यू यांचा समावेश असतो. वादळ, पाऊस, त्सुनामी, आग, भूकंप, पूर किंवा चक्रीवादळ सारख्या नैसर्गिक आपत्ती यामध्ये भरून मिळतात. यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागल्यास त्याची भरपाई आपल्याला मिळचे. तसेच या पॉलिसीमध्ये वधू किंवा वर यांच्या घरात गंभीर दुखापत, मृत्यू सारख्या घटना घडल्यास लग्न पुढे ढकल्यासदेखील विमा कव्हर मिळते. यामध्ये आपल्याला लग्नाचे कपडे हरवले, खराब झाले तर त्याचे देखील नुकसान होण्यापासून वाचवू शकतो.
वेडिंग इन्श्युरन्स हा एक प्रकारचा आर्थिक गुंतवणूक संरक्षण करतोच पण आपल्या कुटुंबाला देखील अनपेक्षितपणे तणावातून मुक्त करतो. ज्यामुळे हा खास क्षण आपल्याला व्यवस्थितरित्या एन्जॉय करता येतो.
