ठळक मुद्देआपल्या सौंदर्याची पूजा करायची असेल तर भक्तीभावानं इथंही नारळ वापरायला विसरू नका!

सखी ऑनलाइन टीम

काही शुभकार्य असली की आपण आधी नारळ वाढवतो. कलश पुजतो. भाजी-आमटीला वाटणघाटण करण्यासाठी, गोडाचे पदार्थ तयार करण्यासाठीही नारळ हवंच. मात्र देवाची करणी, नारळात पाणी आणि तेच चेहर्‍यावर सौंदर्य आणी अशी नवीन म्हण तुम्हाला सांगितली तर? हे खरंय! पण नारळाचा फक्त स्वयंपाकापुरताच उपयोग नसतो. सौंदर्योपचारातही नारळ खूप उपयुक्त ठरतं.  त्वचा, केस आणि संपूर्ण शरीरासाठी नारळ अत्यंत गुणकारी ठरतं. त्यामुळे आपल्या सौंदर्याची पूजा करायची असेल तर भक्तीभावानं इथंही नारळ वापरायला विसरू नका!
एका नारळाचे हे घ्या अनेक सौंदर्य उपचार..


1. नारळाचा उपयोग क्लिनर, टोनर आणि मॉश्चरायझर म्हणून सहज  करता येतो.  नारळात त्वचेला उपयुक्त फॅटी अ‍ॅसिड आणि इ जीवनसत्त्वं असतं. नारळ  त्वचेतील आर्द्रता साठवून त्वचा ओलसर ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे आपली त्वचा तरूण -तजेलदार होते. तेव्हा चेहर्‍याला मस्त नारळपाणी लावा. मलईचा हात फिरवा. चेहरा तुकतुकीत दिसणारच! 

 


2. गोरं व्हायचंय?
 मग महागडय़ा क्रीमच्या आधी जरा घरातलं नारळ हातात घ्या.  किसलेला किंवा खवलेला नारळ, चार ते पाच भिजवलेले बदाम, हळकुंडाचा तुकडा आणि लिंबू हे जिन्नस घ्या.  नारळ, बदाम आणि हळकुंड एकत्र वाटून घ्या/ या मिश्रणाला हातानं पिळून त्यातला रस काढा. तो गाळणीनं किंवा पातळ सुती कापडानं गाळून घ्या.  या द्रावणात लिंबाचे  दोन ते तीन थेंब टाका. आता या पाण्यानं चेहरा आणि मानेला हलक्या हातानं मसाज करा. थोड्या वेळानं चेहरा गार दुधानं धुवून टाका. आणि नंतर चेहर्‍यास कापसाच्या बोळ्यानं छान गुलाब पाणी लावा. नियमित करा, रंग उजळू शकतो. 


3. मऊ मस्त त्वचेसाठी


 एक कप किसलेला नारळ, अर्धा कप ओटमील पावडर, दोन चमचे मध आणि दोन चमचे ग्लिसरीन घ्या. किसलेलं नारळ वाटून दूध काढा. त्यात ओटमील पावडर, मध आणि ग्लिसरीन टाकून मऊ पेस्ट करा. ही पेस्ट संपूर्ण चेहरा आणि मानेला लावा. पाच मिनीटानंतर चेहरा ताकानं धुवावा. नंतर  थोडं गुलाबपाणी पाण्यात टाकून त्या पाण्यानं चेहरा धुवा. 

 

* ‘तरूण’ दिसायचंय ?
तरुण दिसावं असं कुणाला वाटत नाही? पण आपली त्वचा वय सांगतेच. ती त्वचा तरुण दिसण्यासाठी पाऊण कप नारळाचं दूध, दोन चमचे खोबर्‍याचं तेल आणि पाऊण कप पपईचा गर घ्या. सर्व साहित्य एकत्र करा. तयार झालेलं मिश्रण हलक्या हातानं मसाज करत चेह-याला लावा. थोड्या वेळानं नारळाच्याच दुधानं चेहरा धुवून. शेवटी  गार पाण्याचे शिपके मारा. त्वचा तरुण झाल्याचं तुम्हालाच कळेल!

Web Title: wanna look young? use coucount. kitchen remedy- homemade , natural face pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.