Next

चला जाऊयात पेंच व्याघ्र प्रकल्पात | Pench Tiger Reserve | Pench Tiger Reserve Nagpur | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:22 PM2021-10-20T12:22:52+5:302021-10-20T12:23:23+5:30

मॉन्सून संपण्याच्या वाटेवर आहे आणि यातच वन्य प्रेमींसाठी एक आनंदाची बाब आहे.. कारण पावसाळयात साधारणतः ३ महिने जंगलातील कोर झोन टुरिस्ट करीता बंद असतात.. तर बफर झोन मधूनच प्रवेश करता येतं.. मात्र ३ महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर अखेर जंगलातील कोर झोन चे द्वार १ ऑक्टोबर पासून उघडले आहेत...... आणि त्यातच आमची सवारी निघाली पेंच व्याघ्र प्रकल्पात.. खास वाघाला पाहण्यासाठी घनदाट जंगलातून जात असतांना अचानक वाघ समोर यावा आणि अंगावर रोमांच उभे राहावेत, या देखण्या-रुबाबदार प्राण्याला डोळ्यात साठवून घ्यावं आणि हा थरारक अनुभव गाठीशी घेऊन, समृद्ध वनपर्यटनाचा आनंद उपभोगून आपण घरी परतावं असा अनुभव देणारं राज्यातील वाघोबांचं आणखी एक गाव म्हणजे “पेंच व्याघ्र प्रकल्प” पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प २५७.२६ चौ.कि.मी क्षेत्रात विस्तारला आहे. १९७५ साली महाराष्ट्र शासनाने हे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आणि फेब्रुवारी १९९९ मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाचा अधिकृत दर्जा मिळाला.