Join us

Zara Lizard Choker : 'छिपकली कौन पहनता है?' Zara चा २ हजाराचा नेकलेस पाहताच लोकांनी दिल्या भन्नाट रिएक्शन, पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 16:44 IST

Zara Lizard Choker : पोस्ट केल्यानंतर ही क्लिप लगेचच व्हायरल झाली आहे आणि 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

फॅशनच्या नावावर लोक काय शोधून काढतील त्याचा  काही नेम नाही. सोशल मीडियावर सध्या पाली  (Lizard) सारखा दिसणारा जाराचा (Zara) नेकलेस व्हायरल होत आहे. सुरतची सोशल मीडिया इन्फ्लुएंसर गोपाली तिवारीनं या स्टोरच्या आत जाऊन या नेकलेसचा (Lizard Choker)  फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या संदर्भातील एक रिलसु्द्धा तिनं इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये तिनं  अशा वस्तू कोण वापरतं असं म्हटलंय तर कौन सी लड़किया हैं जो ये चिपकलियां पहनती हैं." असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे. 

पोस्ट केल्यानंतर ही क्लिप लगेचच व्हायरल झाली आहे आणि 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या खास गोष्टी पाहून लोकांनाही तितकेच आश्चर्य वाटल्याचे दिसते. गोपालीने पोस्ट केलेल्या रीलच्या टिप्पण्या विभागात, एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले की, "हे पाहून मला भीती वाटते." दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, "हे खरोखरच भयानक आहे...."

मांजरीनं व्यक्त केली ताजं दूध पिण्याची इच्छा; मालकाची सुपर फास्ट डिलिव्हरी पाहून तुम्हीही कराल कौतुक

जर तुम्हाला अशा विचित्र अॅक्सेसरीज घालण्याची आवड  असेल आणि तुमच्या कलेक्शनमध्ये या ज्वेलरीचा समावेश करायचा असेल तर Lizard armbands आणि lizard chokers Zara India च्या वेबसाइटवर हे दागिने खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आर्मबँडची किंमत 1,790 रुपये आहे, तर  चोकरची किंमत 1,990 रुपये आहे.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया