Join us

मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:56 IST

Naomie Pilula : एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र लोकांनी सेल्फी पाहून तिची खिल्ली उडवली आणि खूप ट्रोल केलं.

सोशल मीडियावर विविध गोष्टी या व्हायरल होत असतात. अशीच एक गोष्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. झांबियाच्या नाओमी पिलुला हिने काही दिवसांपूर्वी आपला एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र लोकांनी सेल्फी पाहून तिची खिल्ली उडवली आणि खूप ट्रोल केलं. नाओमी वकील आहे. या ट्रोलिंगनंतर ती थोडीशी दुखावली गेली पण खचली नाही. तिने सकारात्मक राहण्यावर आणि स्वतःवर प्रेम करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मोठा निर्णय घेतला. 

नाओमी पिलुलाने नॅचरल केस आणि ग्लोईंग स्किन दाखवण्यासाठी हॅपी मंडे सेल्फी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. पण कौतुकाऐवजी युजर्सनी तिच्या दिसण्याची, विशेषतः नाकाची खिल्ली उडवली. ट्रोलर्सना न जुमानता नाओमीने आपला आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. तिने स्पष्ट केलं की तिच्या नाकावरून बोलणं हे काही नवीन नाही, कारण तिला अशाच प्रकारच्या अनेक कमेंट आल्या आहेत, ज्यामुळे ती कधीही खचली नाही.

ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना, नाओमी म्हणाली की, "मला माहित आहे की, माझ्यात असलेल्या सर्वात वादग्रस्त वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे माझं नाक. ते माझ्या वडिलांसारखं आहे. त्यामुळे मी ते का काढून टाकू? ते योग्य नाही. एके दिवशी मी उठले आणि आरशात पाहिलं आणि म्हणाले, मला मी जशी दिसते तशीच आवडते. कारण मी आता अशा एका टप्प्यावर पोहोचले आहे जे कोणीही काढून घेऊ शकत नाही कारण त्यांनी मला ते दिलेलं नाही."

"मला एक कमेंट आली ज्यामध्ये राइनोप्लास्टी करण्याचा प्रयत्न करण्याबद्दल काहीतरी सांगितलं होतं. मला अनेक वाईट कमेंट आल्या होत्या कारण मला लोक स्पष्टपणे सांगत होते, तू कुरूप आहेस आणि तू इंटरनेटवर असण्यास पात्र नाहीस." पण यानंतरही नाओमीने या सर्व गोष्टीचा अत्यंत हिमतीने सामना केला. तिने आपला फोटो डिलीट करण्यास स्पष्ट नकार दिला.  

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल