Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > "आईचे पाय दुखतात..."; चिमुकल्याने ६ महिने पैसे साठवले, वाढदिवशी मायेने घेतलं स्पेशल गिफ्ट

"आईचे पाय दुखतात..."; चिमुकल्याने ६ महिने पैसे साठवले, वाढदिवशी मायेने घेतलं स्पेशल गिफ्ट

एका ११ वर्षांच्या मुलाने असं काही काम केलं आहे, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 14:06 IST2026-01-26T14:04:25+5:302026-01-26T14:06:54+5:30

एका ११ वर्षांच्या मुलाने असं काही काम केलं आहे, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Young boy saves pocket money for 6 months to buy shoes for ₹2,000 on his mother's birthday: Social media melts | "आईचे पाय दुखतात..."; चिमुकल्याने ६ महिने पैसे साठवले, वाढदिवशी मायेने घेतलं स्पेशल गिफ्ट

"आईचे पाय दुखतात..."; चिमुकल्याने ६ महिने पैसे साठवले, वाढदिवशी मायेने घेतलं स्पेशल गिफ्ट

चीनच्या हेबेई प्रांतातील एका ११ वर्षांच्या मुलाने असं काही काम केलं आहे, ज्याने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मुलाने सहा महिने स्वतःचा पॉकेट मनी वाचवला आणि आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त तिला नवीन बूट गिफ्ट केले. मुलगा एका बुटांच्या दुकानात एक-एक युआनच्या नोटांचा ढीग घेऊन पोहोचला आणि दुकानदाराकडे आईसाठी बूट मागू लागला. या घटनेने सर्वच जण भावुक झाले.

मुलाने दुकानदाराला सांगितलं की, त्याची आई दररोज ऑफिसला जाताना जुने आणि झिजलेले बूट घालते, म्हणूनच तिला नवीन बूट घेऊन द्यायचे आहेत. आईचे पाय दुखतात, हे तिच्या वाढदिवसाचे गिफ्ट असल्याचंही त्याने सांगितलं. मे महिन्यापासून त्याने हळूहळू सुमारे २०० युआन (अंदाजे २,५०० ते ३,००० रुपये) वाचवले होते. त्याच्या छोट्या-छोट्या सेव्हिंगमधून त्याने हे मोठं गिफ्ट दिलं आहे.

लहान मुलाचं आपल्या आईप्रती असलेलं प्रेम आणि विचार पाहून महिला दुकानदार इतकी प्रभावित झाली की, तिने त्या बुटांवर खास डिस्काउंट दिला. अखेर मुलाने केवळ १०० युआन दिले. तिने त्याला सांगितलं की, "जर बूट आईला आवडले नाहीत तर ते बदलून मिळतील आणि उरलेले पैसे तू तुझ्याकडेच ठेव." तिने हा संपूर्ण क्षण व्हिडिओमध्ये कैद केला, जेणेकरून ती आपल्या मुलीला हा आदर्श दाखवू शकेल. हा व्हिडीओ ऑनलाइन शेअर करताच व्हायरल झाला असून त्याला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळत आहेत.

नेटकऱ्यांनी या मुलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी म्हटलं की, "आम्ही जर त्या आईच्या जागी असतो, तर हे बूट आयुष्यभर जपून ठेवले असते." काही लोकांनी महिला दुकानदाराने बूट मोफत द्यायला हवे होते असं म्हटलं, पण त्याला अनेकांनी विरोध केला. युजर्सचे म्हणणं होतं की, मुलाने स्वतःच्या पैशातून भेटवस्तू विकत घेणं हीच या कथेतील सर्वात मोठी सुंदरता आहे.

प्रसारमाध्यमांनी या मुलाशी (झांग) आणि त्याच्या आईशी संवाद साधला. आईने व्हिडिओमध्ये ते बूट घालून दाखवले आणि सांगितलं की, तिला या 'सरप्राईज'मुळे प्रचंड आनंद झाला आहे. तिने पुढे सांगितलं की, "मी मुलाला कधीही प्रत्यक्षपणे 'आई-वडिलांची सेवा करा' असं शिकवलं नाही, पण घरातील वृद्धांची काळजी घेताना मी त्याला नेहमी सोबत न्यायचे. कदाचित तिथूनच त्याने हे संस्कार नकळत आत्मसात केले असावेत."

Web Title : प्यार करने वाले बेटे ने माँ के लिए जन्मदिन पर जूते खरीदे।

Web Summary : चीन में एक 11 वर्षीय लड़के ने अपनी माँ के जन्मदिन के लिए नए जूते खरीदने के लिए छह महीने तक अपनी जेब खर्च बचाया, क्योंकि उसकी माँ के जूते पुराने हो गए थे। लड़के के प्रेम से प्रभावित होकर, दुकानदार ने छूट दी। लड़के के प्यार की सराहना करते हुए वीडियो वायरल हो गया।

Web Title : Loving son saves for months, buys mom birthday shoes.

Web Summary : An 11-year-old boy in China saved his pocket money for six months to buy his mother new shoes for her birthday, moved by her worn footwear. The shopkeeper, touched by his gesture, offered a discount. The video went viral, praised for the boy's love.