Lokmat Sakhi >Social Viral > Yellow Stains On Crockery Set: क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्याचे ३ उपाय, जुन्या डिश दिसतील नव्यासारख्या स्वच्छ, चकचकीत

Yellow Stains On Crockery Set: क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्याचे ३ उपाय, जुन्या डिश दिसतील नव्यासारख्या स्वच्छ, चकचकीत

Remedies To Remove Stains on Crockery Set: फायबर किंवा काचेच्या क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा.. पिवळटपणा आलेल्या डिश स्वच्छ होऊन पुन्हा नव्यासारख्या चमकू लागतील. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 11:10 AM2022-05-20T11:10:25+5:302022-05-20T11:11:25+5:30

Remedies To Remove Stains on Crockery Set: फायबर किंवा काचेच्या क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्यासाठी हे काही सोपे उपाय करून बघा.. पिवळटपणा आलेल्या डिश स्वच्छ होऊन पुन्हा नव्यासारख्या चमकू लागतील. 

Yellow Stains On Crockery Set: 3 Ways To Remove Yellow Stains On Crockery Set, Old Dishes Will Look Like New, Clean, Shiny | Yellow Stains On Crockery Set: क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्याचे ३ उपाय, जुन्या डिश दिसतील नव्यासारख्या स्वच्छ, चकचकीत

Yellow Stains On Crockery Set: क्रॉकरी सेटवर पडलेले पिवळट डाग काढण्याचे ३ उपाय, जुन्या डिश दिसतील नव्यासारख्या स्वच्छ, चकचकीत

Highlightsहे काही सोपे उपाय करा आणि पुन्हा चमकवा तुमचा क्रॉकरी सेट..

हा अनुभव बहुतेक घरातल्या महिलांनी घेतलेला असतो. ३ ते ४ वेळा क्रॉकरी सेट वापरला की त्याच्या पांढऱ्याशुभ्र प्लेट्स, बाऊल यांच्यावर एक पिवळटपणाची (yello stains on glass or fiber utensils) झाक चढू लागते. दरवेळी वापरल्यानंतर आपण जेव्हा तो सेट धुवून ठेवतो, तेव्हा प्रत्येकवेळी त्याचा पिवळटपणा आणखीनच वाढलेला दिसतो. याचा अर्थ आपण स्वच्छतेच्या बाबतीत कुठे कमी पडतो आहोत, असा मुळीच नाही. प्लेट ज्या मटेरियलने तयार झाली आहे, त्याच्यावर रिॲक्शन होऊन ते डाग पडलेले असतात. कधीकधी हे डाग एवढे जास्त दिसू लागतात की मग आपला महागडा क्रॉकरी सेट पाहुण्यांसमोर काढण्याची लाज वाटू लागते.. म्हणूनच तर आता हे काही सोपे उपाय करा आणि पुन्हा चमकवा तुमचा क्रॉकरी सेट..(how to clean old dinner set?)

 

काचेच्या प्लेट स्वच्छ करण्याची योग्य पद्धत (proper method of cleaning crockery set)
जेवण झालं की लगेचच आपण काही प्लेट घासत नाही. मध्ये थोडा वेळ जातो. त्यामुळे मग आपण त्या प्लेट तशाच सिंकमध्ये ठेवताे आणि त्यावर पाणी टाकून ठेवताे. भांड्यांमध्ये पाणी टाकून ठेवण्याचा हा उपाय स्टीलची भांडी घासण्यासाठी योग्य आहे. पण असा प्रयोग फायबर किंवा काचेच्या प्लेट धुताना करू नका. जेवण झाल्यानंतर प्लेट सिंकमध्ये ठेवण्याआधी त्यातलं खरकटं अन्न काढून घ्या आणि त्या प्लेट टिश्यू पेपरने पुसून स्वच्छ करा. अशा स्वच्छ केलेल्या प्लेट मग पाण्यात भिजवून ठेवा आणि तासाभराच्या आता घासून घ्या. असं केल्यामुळे भांड्यांवर अन्नपदार्थांचे पिवळट डाग पडणार नाहीत.

 

जुनाट पिवळट डाग काढण्यासाठी उपाय
१. बेकींग सोडा (baking soda)

भांड्यांवरचे जुनाट डाग काढण्यासाठी बेकींग सोडा अतिशय उपयुक्त ठरतो. हा उपाय करण्यासाठी बेकींग सोडा आणि पाणी योग्य प्रमाणात घ्या. त्याची पेस्ट पिवळट डागांवर लावा. १५ मिनिटे तशीच राहू द्या. त्यानंतर घासणीने भांडी घासून काढा. गरम पाण्याने प्लेट धुवा. प्लेट धुतल्यानंतर लगेचच पुसून घ्या आणि कडक उन्हात १ ते २ तास ठेवून द्या. पिवळटपणा अजून कमी होईल. 

 

२. ब्लीच (bleach)
बाजारात मिळणारं ब्लीच पिवळटपणा काढण्यासाठी उपयुक्त ठरतं. यासाठी पाणी आणि ब्लीच २: १ या प्रमाणात घेऊन त्याचं ब्लीच सोल्युशन तयार करा. एका टबमध्ये पाणी घेऊन त्यात हे सोल्युशन टाका. त्यात रात्रभर भांडी बुडवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर ही भांडी साबण किंवा डिशवॉश लावून धुवून घ्या. 

 

३. लिंबू किंवा व्हिनेगर (lemon or vinegar)
लिंबू किंवा व्हिनेगर यांच्यापैकी एक घटक आणि पाणी हे देखील २: १ या प्रमाणात घ्यावे. हे मिश्रण प्लेटवर लावून ठेवा आणि त्यावर थोडेसे पाणी शिंपडून ठेवा. एक तासानंतर घासणीने घासून घ्या. प्लेट स्वच्छ पुसून कडक उन्हात १ ते २ तास वाळू द्या. डाग बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असतील. 
 

Web Title: Yellow Stains On Crockery Set: 3 Ways To Remove Yellow Stains On Crockery Set, Old Dishes Will Look Like New, Clean, Shiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.