X-ray for Skin Care : आजकाल सुंदर दिसण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची ब्यूटी प्रॉडक्ट वापरतात. कुणी सीरम लावतो, कोणी क्रीम, तर कोणी ठराविक स्किन केअर रूटीन फॉलो करतात, जेणेकरून त्वचा मुलायम आणि ग्लोइंग दिसावी. पण तुम्हाला माहिती आहे का की, साधारण 1930 च्या दशकात सौंदर्य आणि स्किन ट्रीटमेंटसाठी एक्स-रेचा वापर केला जात होता? त्या काळात याला आधुनिक विज्ञानाची देणगी मानले जात होते आणि लोक सुंदर दिसण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत होते.
तो काळ विज्ञानाच्या वेगवान प्रगतीचा होता आणि एक्स-रे हा एक चमत्कारी शोध मानला जात होता. त्यामुळे त्याचा वापर अनेक क्षेत्रात होऊ लागला. याच काळात ब्यूटी इंडस्ट्रीनेही एक्स-रेचा वापर सुरू केला. मात्र पुढे जाऊन हेच तंत्रज्ञान ब्यूटी इंडस्ट्रीसाठी श्राप ठरले.
त्या काळात असा समज होता की एक्स-रेमुळे त्वचेची खोलवर साफसफाई होते. यामुळे मुरूम, डाग-चट्टे आणि अनावश्यक केस कायमचे निघून जातात, तसेच त्वचा अधिक ग्लोइंग दिसते. त्यामुळे महिलाच नव्हे, तर अनेक पुरुषही क्लिअर आणि चमकदार त्वचेसाठी या उपचाराकडे आकर्षित झाले.
खासकरून चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी आणि अॅक्नेच्या उपचारासाठी एक्स-रे थेरपीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. अनेक महिला वर्षातून 15 पेक्षा जास्त वेळा या नुकसानकारक किरणांच्या संपर्कात येत होत्या, फक्त त्वचा सुंदर दिसावी यासाठी.
पण काही काळानंतर एक्स-रेच्या सतत संपर्कामुळे अनेक लोकांना स्किन कॅन्सर, ट्युमर यांसारखे गंभीर आजार होऊ लागले. त्या काळात डॉक्टर आणि तज्ज्ञांनाही एक्स-रेच्या दुष्परिणामांची पूर्ण कल्पना नव्हती. नंतर जेव्हा मोठ्या प्रमाणात लोक आजारी पडू लागले आणि काहींनी आपले प्राणही गमावले, तेव्हा वैद्यकीय क्षेत्र जागे झाले.
यानंतरच एक्स-रेच्या वापरावर कठोर नियम लागू करण्यात आले आणि सौंदर्य उपचारांसाठी त्याचा वापर बंद करण्यात आला. ही घटना आजही आपल्याला सांगते की, कोणताही ट्रेंड किंवा उपचार स्वीकारण्यापूर्वी त्याचे परिणाम समजून घेणे किती महत्त्वाचे आहे.
Web Summary : In the 1930s, X-rays were used for skin treatments, believed to cleanse deeply and remove blemishes. However, frequent exposure led to skin cancer and tumors. Many fell ill, some died, prompting regulations and ending its use for beauty.
Web Summary : 1930 के दशक में, एक्स-रे का उपयोग त्वचा उपचार के लिए किया जाता था, माना जाता था कि यह गहराई से सफाई करता है और दाग-धब्बे हटाता है। हालांकि, बार-बार संपर्क में आने से त्वचा कैंसर और ट्यूमर हो गए। कई बीमार पड़ गए, कुछ मर गए, जिसके बाद नियमों को लागू किया गया और सौंदर्य के लिए इसका उपयोग बंद कर दिया गया।