Lokmat Sakhi >Social Viral > सगळ्यात मोठं तोंड असलेल्या महिलेचा 'असा' फोटो पाहून लोकांची बोलती बंद, गजब टॅलेंट...

सगळ्यात मोठं तोंड असलेल्या महिलेचा 'असा' फोटो पाहून लोकांची बोलती बंद, गजब टॅलेंट...

Viral Photo : सामंथा रामस्डेल असं या महिलेचं नाव असून ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. पण आता जो फोटो पोस्ट केलाय तो बघून लोक अवाक् झाले आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:55 IST2025-03-22T17:53:16+5:302025-03-22T17:55:25+5:30

Viral Photo : सामंथा रामस्डेल असं या महिलेचं नाव असून ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. पण आता जो फोटो पोस्ट केलाय तो बघून लोक अवाक् झाले आहेत. 

World biggest mouth's Samantha Ramsdell photo goes viral | सगळ्यात मोठं तोंड असलेल्या महिलेचा 'असा' फोटो पाहून लोकांची बोलती बंद, गजब टॅलेंट...

सगळ्यात मोठं तोंड असलेल्या महिलेचा 'असा' फोटो पाहून लोकांची बोलती बंद, गजब टॅलेंट...

Viral Photo : कधी सोशल मीडियावर जगातील सगळ्यात उंच महिलेची चर्चा रंगली असते, तर कधी सगळ्यात कमी उंचीच्या महिलेची. कधी सगळ्यात लांब केस असलेल्यांची तर कधी सगळ्यात लांब नखे असलेल्यांची. पण सध्या सोशल मीडियावर जगातील सगळ्यात मोठं तोंड (World biggest mouth) असलेल्या महिलेची चर्चा सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे सगळ्यात मोठं तोंड असल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड या महिलेच्या नावे आहे. सामंथा रामस्डेल (Samantha Ramsdell) असं या महिलेचं नाव असून ती नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते. पण आता जो फोटो पोस्ट केलाय तो बघून लोक अवाक् झाले आहेत. 

अमेरिकेत राहणाऱ्या या 34 वर्षीय महिलेचे 3.8 मिलियन फॉलोअर आहेत. सध्या या महिलेने इटलीच्या फ्लोरेन्स ट्रिप दरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आहे.

सामंथा नावाच्या या महिलेच्या नावे 2.56 इंचापर्यंत तोंड उघडण्याचा आणि 4.07 इंच पसरवण्याचा रेकॉर्ड आहे. या महिलेचं तोंड सगळ्यात मोठं आणि सगळ्यात रूंद आहे. जो फोटो आता व्हायरल झाला आहे त्यात ती तोंडात एक वाईनची टाकल्याचं दिसत आहे. हा फोटो पाहून लोकांची तोंड बंद झाली आहे.

इन्स्टावर सामंथानं तिच्या हॅंडलवर हा फोटो शेअर केला असून लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. या फोटोला आतापर्यंत 42 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. एकानं या फोटोवर कमेंट की, 'तू तर क्वीन ऑफ माउथ आहे'. जास्तीत जास्त लोकांनी तिचं कौतुक केलं आहे.

डेली स्टारसोबत बोलताना सामंथा म्हणाली की, चांगलं वाटतंय की, ज्या गोष्टीवर आतापर्यंत माझी खिल्ली उडवली गेली ती बाब आता माझी शक्ती बनली आहे. लोक माझ्यावर वाईट कमेंट्स करतात, पण मला असेही भरपूर लोक भेटतात जे माझ्या या टॅलेंटचं कौतुक करतात आणि माझ्याकडे सकारात्मकतेने बघतात.

Web Title: World biggest mouth's Samantha Ramsdell photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.