Join us
Daily Top 2Weekly Top 5

Womens Day 2026 : बायकांना नक्की काय हवं असतं, कशानं आनंद होतो? आयुष्यभर हव्या असतात ५ गोष्टी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 18:14 IST

Women's Day 2026: What do women really want, what makes them happy? 5 things they want throughout their lives : महिलांना नक्की हवं तरी काय? हे घ्या उत्तर.

एक औरतको आखिर चाहिए क्या ? गेल्या काही वर्षांत फारच गाजलेला हा डायलॉग तुम्हीही नक्कीच ऐकला असेल. महिलांना काहीही दिलं त्यांच्यासाठी कितीही केलं तर त्यांना ते पुरतच नाही असं म्हणून तिची खिल्ली उडवली जाते. पण प्रत्यक्षात पाहीलं तर खरंच महिलांना हवं तरी काय असतं ?  कधी या गोष्टीचा विचार केला आहे का? पैसालत्ता हवा असतो की कपडेलत्ते?  स्त्रियांना काय हवं असतं हे जाणून घेण्याची खरंच इच्छा असेल तर दिवसरात्र तुमच्यासाठी काम करणाऱ्या आईला विचारा काय हवंय तिचं उत्तर नक्कीच 'आदर' असं असेल. (Women's Day 2026: What do women really want, what makes them happy? 5 things they want throughout their lives..)हाच प्रश्न ताईला विचारला तर ती सांगेल 'संधी'. बायकोला विचारलं तर उत्तर मिळेल समान वागणूक. मैत्रिणीला विचारलं तर म्हणेल स्वातंत्र्य. खरंच एखाद्या स्त्रीला काय हवंय ते समजून घेणं एवढं अवघड असतं का?     

दिवसरात्र राबून काम केल्यावर जर घरात साधा सन्मान मिळत नसेल तर? एका बाईला हेच हवंय की कोणी आदर द्यावा आणि समजून घ्यावं. घरात किंवा नातेसंबंधात तिचे मत ऐकले जावे. तिला महत्व दिले जावे आणि तिच्या भावना समजून घेतल्या जाव्यात. एखाद्या महत्त्वाच्या चर्चे वेळी तिची भूमिका फक्त चहा करण्याची नसावी. क्षुल्लक वाटणारी ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. 

भावनिक आधार हा देखील खूप महत्त्वाचा असतो. अडचणीच्या वेळी कोणी तरी आपल्यासोबत उभे आहे, आपले बोलणे ऐकून घेत आहे, ही भावना महिलांना सुरक्षित आणि आनंदी ठेवते. अनेकदा मन मोकळे करून बोलता येणे हेच मोठे समाधान देणारे असते.

स्वतःसाठी वेळ मागणं म्हणजे अपराध असतो अशी महिलांची समजूत आहे. आयुष्य मनानुसार जगण्यासाठी अपराधी का वाटावं? असे विचार न करता बिनधास्त जगण्याची संधी हवी आहे महिलांना. आणि या संधी त्यांना कोणी देत नाही त्या स्वतः निर्माण करतात. 

एखाद्या गृहिणीला कौतुकाची थाप पुरेशी असते. घर सांभाळण्यासाठी आणि मुलांचे संगोपन करण्यासाठीच तर जॉब आणि करिअर सोडून घरालाच ती सर्वस्व मानते. ज्यांसाठी तो त्यांग केला त्यांच्याच नजरेत शून्य होऊन कसे चालेल? प्रेमाची अभिव्यक्ती देखील महिलांना आनंद देणारी असते. आजची भाजी अगदी सुंदर झाली आहे किंवा एखादा लहानसा गृहउद्योग सुरु करायला हरकत नाही अशी वाक्य ऐकण्याची इच्छा त्यांची नक्कीच असते. ती कौतुकाची थाप हवी आहे. महागडी भेटवस्तू देण्याऐवजी महिलांना या भावनिक भेटी देणं जास्त गरजेचं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Women's Day 2026: Respect, opportunity, equality – 5 things women desire.

Web Summary : Beyond material possessions, women crave respect, emotional support, equality, opportunity, and appreciation. Feeling valued, heard, and understood within relationships and society brings happiness and fulfillment.
टॅग्स :जागतिक महिला दिन 2026महिलासोशल व्हायरलमानसिक आरोग्य