Viral Video : आजकाल फोन ही एक मोठी गरज झाली आहे. पण फोनचे साइड इफेक्ट्सही भरपूर असतात. लोक सामान्यपणे फोन पॅंट किंवा शर्टच्या खिशात ठेवतात. पण हे किती घातक ठरू शकतं याचं एक उदाहरण दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. ज्यात एक महिला सुपरमार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करताना दिसत आहे. तेव्हा अचानक तिच्या पॅंटच्या खिशात ठेवलेल्या फोनला आग लागते. ही घटना ब्राझीलमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. महिलेच्या पॅंटच्या खिशात ठेवलेल्या मोटोरोला मोटो ई 32 फोन फुटल्यानं आग लागली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे.
फोन कसा फुटतो?
आजकाल स्मार्टफोनमध्ये जास्तीत जास्त लिथियम-आयर्न वापरलं जातं. सोबतच यात इलेक्ट्रोड सुद्धा वापरलं जातं. जेणेकरून फोन योग्य पद्धतीनं चार्ज व्हावा. पण यात जेव्हा काही गडबड होते तेव्हा बॅटरीमधील रासायनिक संतुलन बिघडतं. ज्यामुळे फोनमध्ये स्फोट होतो.
फोन गरम होऊ देऊ नका
फोन फुटण्याचं दुसरं कारण म्हणजे फोन गरम होणं. जर फोन खाली पडून तुटला. तर अशा स्थितीत फोनच्या आतील बॅटरी सुद्धा बिघडते. त्याशिवाय जर फोन जास्त वेळ उन्हात राहिला किंवा कोणत्या मॅलवेअरमुळे त्यावर जास्त दबाव येत असेल तर यामुळे बॅटरी खराब होऊ शकते. ज्यामुळे त्यात स्फोट होतो.
काय कराल उपाय?
तसेच बॅटरी काळानुसार खराब होणंही याचं एक कारण आहे. जसजशी बॅटरी जुनी होते, ती अधिक खराब होते. ज्यामुळे बॅटरी फुगते. अशात बॅटरीवर अधिक दबाव पडतो आणि बॅटरी फुटते. फोन जास्त वेळ उन्हात ठेवू नका. तसेच बॅटरी जास्त वेळ चार्ज करणं टाळा. जुनी झालेली बॅटरी बदलून घेऊ शकता.