Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > बॉस रागावतो-पगारही कमी म्हणून ऑफिसात ५ तास झोप काढली, तरुणीचा दावा-रोज ‘असंच’ करणार कारण..

बॉस रागावतो-पगारही कमी म्हणून ऑफिसात ५ तास झोप काढली, तरुणीचा दावा-रोज ‘असंच’ करणार कारण..

Women slept for 5 hours in the office, young woman claims - she will do 'the same' every day because... : पैसे कमी तर कामही कमी. तरुण मुलीचा दावा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 17:51 IST2026-04-13T17:48:41+5:302026-04-13T17:51:23+5:30

Women slept for 5 hours in the office, young woman claims - she will do 'the same' every day because... : पैसे कमी तर कामही कमी. तरुण मुलीचा दावा.

Women slept for 5 hours in the office, young woman claims - she will do 'the same' every day because... | बॉस रागावतो-पगारही कमी म्हणून ऑफिसात ५ तास झोप काढली, तरुणीचा दावा-रोज ‘असंच’ करणार कारण..

बॉस रागावतो-पगारही कमी म्हणून ऑफिसात ५ तास झोप काढली, तरुणीचा दावा-रोज ‘असंच’ करणार कारण..

वर्क लाइफ काय असते…? फक्त सकाळी उठून ऑफिसला जाणं, दिवसभर काम करणं आणि थकून परत येणं एवढंच का? की त्यामध्ये समाधान, योग्य मोबदला आणि स्वतःसाठी थोडा श्वास घेण्याचा वेळही असतो? आजकाल कामाचा ताण वाढला असं म्हणता येणार नाही कारण तो आधीही होता आणि पुढेही राहील. (Women slept for 5 hours in the office, young woman claims - she will do 'the same' every day because...)मात्र नव्या पिढीतील मुलं-मुली आधीच्या लोकांप्रमाणे मनाविरुद्ध जाऊन काम करणं किंवा ऐकून घेणं या विचारांना दुजोरा देताना दिसत नाहीत. त्यांचं वागणं अनेकांना खटकत तर काहींना योग्य वाटतं. असाच एक प्रकार चीनमध्ये घडला. 

एका मुलीने तिचा कामाच्या ठिकाणचा अनुभव सांगणारा व्हिडिओ पोस्ट केला आणि तो चांगलाच व्हायरल झाला. त्या तरुणीचे म्हणणे असे आहे की तिला कामाचा मोबदला फारच कमी मिळतो. काम जास्त आणि पैसे कमी. ऑफीसमध्ये असताना कोणत्यातरी कारणा वरुन तिच्या बॉसला मुलीचा राग आला आणि सगळ्यांसमोर त्याने तरुणीवर आवाज चढवला. त्या वादानंतर मुलीला राग आला आणि ती चक्क चालू ऑफीसमध्येच ५ तास झोपली. जेवढा मोबदला मिळतो तेवढंच काम करेन असं तिचं म्हणणं होतं. 

जेव्हा हा प्रकार बॉसला समजला तेव्हा त्याने मुलीला कामावरुन काढून टाकायची धमकी दिली. ऑफीसमध्ये असे वर्तन योग्य नाही असे म्हटल्यावर तिने मला राग आला होता आणि काय करावे सुचत नव्हते म्हणून मी झोपले असे सांगितले. मुलीने त्या व्हिडिओमध्ये मी जॉब सोडणार नाही माझ्या बॉसला तो कुठे चुकत आहे याची जाणीव करुन देईन. असे ही म्हटले. तिच्या वागण्याबद्दल अनेकांची विविध मतं आहेत. काहींना ती बरोबर वाटते तर काहींना तिचं वागणं चुकीचंही वाटतं. 

आजकाल मॅनेजर आणि नवीन तरुण भरती होणारे यांच्यामध्ये वाढणारे अनेक वाद आपण पाहत आहोत. जेन-झी मुलं-मुली एक्ट्रॉ वर्क, एक्ट्ऱॉ टाइम या सगळ्याचा विरोध करतात. कोण चूक कोण बरोबर हे परिस्थितीवरच ठरते मात्र सगळ्याच ऑफीसांमध्ये आजकाल असे वाद पाहायला मिळतात. त्या मुलीलाही अनेकांनी ट्रोल केल्यावर तिने म्हटले की एवढ्या कमी पैशांत घर चालवणं किती कठीण आहे हे समजल्यावर तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटणार नाही. शेवटी काम जेवढे केले तेवढा मोबदला तर हवाच ना?

Web Title : बॉस से नाराज़, कम वेतन से परेशान, महिला ऑफिस में 5 घंटे सोई।

Web Summary : चीन की एक महिला, अपने बॉस की डांट और कम वेतन से नाराज़ होकर, कार्यालय में पांच घंटे सो गई। उसने नौकरी छोड़ने से इनकार कर दिया, उसका लक्ष्य अपने बॉस को उनकी गलती का एहसास कराना और कम वेतन वाले श्रमिकों के संघर्षों पर प्रकाश डालना है।

Web Title : Upset with boss and low pay, woman sleeps 5 hours at work.

Web Summary : A Chinese woman, angered by her boss's scolding and low pay, slept for five hours at the office. She refuses to quit, aiming to make her boss aware of their mistake and highlighting the struggles of low-wage workers.